Famous quotes -
If a million people say a foolish thing, it is still a foolish thing.
---Anatole France [Jacques Anatole Thibault] (1844-1924)
त्या जुन्या वाड्यासमोर एक कार येवून थांबली. कारचं दार उघडलं अणि कारमधून घाई घाईने स्टेला उतरली. उतरल्याबरोबर जवळजवळ धावतच ती विहिरीकडे गेली. विहिरीजवळ येताच क्षणाचाही विलंब न लावता तिने विहिरीत उडी मारली.
थोड्याच वेळात वाड्याच्या समोर स्टेलाच्या कारच्या बाजुला पोलिसांची जीप येवून उभी राहाली. जीप थांबताच पोलिसांची एक हत्यारबंद तुकडी भराभर बाहेर पडली. उतरल्याबरोबर प्रथम त्यांनी स्टेलाला तिच्या कारमध्ये शोधले. ती कारमध्ये नव्हती. मग ते आजुबाजुला शोधू लागले.
त्यातल्या एका पोलिसाने ताबडतोब वायरलेसवर ब्रॅटला माहिती पुरवली, '' सर ती आत्ताच थोड्या वेळापुर्वी इथे एका वाड्यासमोर थांबली... याच रोडवर पुढे डाव्या बाजुला...''
तिकडून त्याला ब्रॅटने काही निर्देश आणि आदेश दिले आसावेत कारण तो मधे मधे,
'' यस सर...''
''सर''
''सर''
'' राईट सर''
'' यस सर''
असा म्हणत राहाला. जेव्हा तिकडून फोन कट झाला त्याने वायरलेसचे उपकरण आपल्या खिशात परत ठेवून दिले.
'' ती इथे तर कुठे दिसत नाही आहे'' त्यातला एक पोलिस म्हणाला.
'' ती नक्कीच या वाड्यात गेली असेल'' त्यातला एकजण त्या वाड्याच्या भिंतीकडे खालून वरपर्यंत विस्मयकारक आश्चर्याने पाहत म्हणाला.
'' चला लवकर... सगळेजण वाड्यात चला'' त्यातल्या एका वरिष्ठ पोलिसाने आदेश दिला.
'' आणि तयारीत रहा... आत अजुन कोण कोण आहे याची आपल्याला सध्या काहीच कल्पना नाही'' तो वरिष्ठ अधिकारी पुढे म्हणाला.
तो वरिष्ठ अधिकारी पुढे आणि त्याच्या मागे त्याची सगळी टीम वाड्याच्या दिशेने चालू लागली. काही अंतर चालताच तो वरिष्ठ अधिकारी एकदम थांबला आणि मागे वळून एका पोलिसाला म्हणाला,
'' तु इथेच बाहेर थांब... मि. ब्रॅट एवढ्यात येतीलच...''
'' यस सर'' तो पोलिस आज्ञाधारकपणे म्हणाला आणि तिथेच मागे थांबला.
बाकीची टीम त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मागे मागे त्या वाड्यात शिरु लागली.
स्टेला खाली खडकाळ गुहेत पडल्याबरोबर ताबडतोब उठली आणि आपला टॉर्च सुरु करुन त्याचा प्रकाशझोत गुहेत इकडे तिकडे फिरवू लागली. 'A1' विहिरीच्या जवळचा खडक दिसताच तिने आपल्या टॉर्चचा प्रकाशझोत तिथे स्थिर केला आणि घाई घाईने त्या विहिरीकडे जायला लागली. जाता जाता अचानक 'थड' असा भयानक आवाज झाला. ती दचकून भीतीने दोन पावले मागे सरली. पाहते तर तिच्या अगदी समोर एक खडकाचा मोठा तुकडा वरुन छतावरुन निखळून पडला होता.
हे असं कसं झालं?...
असं तर पुर्वी कधी झालं नव्हतं?..
ती वर छताकडे पाहत विचार करीत होती. छतावरतर काहीच नव्हतं. फक्त एक गड्डा दिसत होता, जिथून कदाचित तो खडकाचा तूकडा निखळून पडला होता.
क्रमश:...
Famous quotes -
If a million people say a foolish thing, it is still a foolish thing.
---Anatole France [Jacques Anatole Thibault] (1844-1924)
Marathi Novels, Marathi books, Marathi short stories, Marathi gosti, Marathi gost, Marathi kahani, Marathi story, Marathi entertainment, Marathi comedy, Marathi fiction, Marathi proverb,
No comments:
Post a Comment