Marathi books - Black Hole CH-43 स्फोट

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Valuable thoughts -

Lots of times you have to pretend to join a parade in which you're not really interested in order to get where you're going.

---Christopher Darlington Morley (1890-1957)


स्टॆला आणि जाकोब त्यांच्यासमोर पडून तूकडे होवून विखुरलेल्या खडकाकडे अजूनही भितीयूक्त आणि आश्चर्ययूक्त नजरेने पाहत होते. ते त्या धक्यातून सावरतात न सावरतात तोच त्या गुहेच्या अगदी टोकाला असलेल्या एका विहिरीत मोठा स्पोट झाला. त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. त्यांच्या शरीरातली एक एक पेशी भितीने शिथील झाली होती. एका मोठ्या खडकाचा आडोसा घेण्यासाठी ते एकीकडे धावले. पुर्ण गुहेत त्या स्फोटामुळे खडकाचे तूकडे इकडे तिकडे पसरले होते. काही तुकडे तर त्यांच्या अगदी समोर येवून पडले होते. ज्या विहिरीत स्फोट झाला होता आता तिथे विहिर राहाली नव्हती, फक्त खडकाचा एक मोठा ढिग उरला होता.

'' हे काय होत आहे?'' स्टेलाने भितीने आणि दम लागलेल्या स्थितीत विचारले.

'' चल लवकर... काहीतरी गडबड दिसते आहे... आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडायला पाहिजे...'' जाकोब म्हणाला.

एकमेकांचा हात हातात घट्ट पकडून ते 'exit' विहिरीकडे धावायला लागले.

'exit' विहिरीजवळ पोहचताच त्यांनी ताबडतोब धावता धावताच त्या विहिरीत उडी मारली.

'डी' लेव्हलवरुन स्टेला आणि जाकोब आता 'सी' लेव्हलच्या एका गुहेत जमिनीवर पडले होते. ते ताबडतोब उठून उभे राहालॆ.

'' चल लवकर उठ'' जाकोब उठता उठता तिचा हात धरुन तिला उठवत म्हणाला.

त्याने तिला उठून उभं राहण्यास मदत केली. आणि उठल्याबरोबर ते दोघंही 'सी' लेव्हलच्या 'एक्झीट' विहिरीकडे जोरात धावायला लागले. जाकोब तिचा हात आपल्या हातात धरुन, तिला जवळ जवळ ओढतच समोर धावत होता आणि स्टेला त्याच्या धावण्याच्या वेगाशी आपल्या धावण्याचा वेग जुळावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत धावत होती. जेव्हा ते जवळ जवळ 'एक्झीट' विहिरीजवळ पोहोचलेच होते, दुसरी एक विहिर 'सी2' मध्ये एक भयानक स्फोट झाला.

'' बघ... काळजी घे... त्या खडकांचे तुकडे आपल्याकडे येवू शकतात'' स्टेला धावता धावता म्हणाली.

तरीही न थांबता त्यांनी धावत धावत जावून 'एक्झीट' विहिरीत उडी मारली. ते 'एक्झीट' विहिरीत जवळ जवळ अर्ध्या अंतरापर्यंत पोहोचले असतील, तेव्हा त्याच लेव्हलची अजुन एक विहिर 'सी1' मध्येही भयानक स्फोट झाला होता.

जाकोब आणि स्टेला 'बी' लेव्हलच्या खडकाळ गुहेत खाली जमिनीवर पडले आणि त्यांच्या मागोमाग 'सी' लेव्हलच्या खडकाचे तुकडेही त्यांच्या अंगावर पडू लागले. जाकोबने स्टेलाचे शरीर आपल्या शरीराने झाकुन घेवून, तिचे रक्षण करण्यासाठी जणू आपल्या शरीराची ढाल केली होती.

थोड्या वेळाने एकमेकांना आधार देत, खडकांचे तुकडे बाजुला सारत, ते उठून उभे राहाले. त्यांना काही जखमा झाल्या होत्या पण त्या किरकोळच होत्या. उठल्याबरोबर त्यांनी आपल्या टॉर्चेसच्या उजेडात 'एक्झीट' विहिर शोधण्यासाठी आपली भिरभिरती नजर इकडे तिकडे फिरवली, तर त्यांना 'बी2' विहिरीत ते तिथे येण्याच्या आधीच विस्फोट होवून तो नष्ट झाल्याचे आढळले. त्या विहिरीच्या जागी फक्त एक खडकाचा ढीग उरला होता आणि खडकांचे तुकडे त्या गुहेत सर्वत्र विखुरलेले दिसत होते. त्या सर्वत्र विखुरलेल्या खडकाच्या ढिगांमधून ते 'एक्झीट' विहिरीकडे जाणारा रस्ता शोधू लागले. 'एक्झीट' विहिर तर त्यांना दिसत होती, पण मधे खडकाचे ढिग येत होते, जे ओलांडून त्यांना पलिकडे जायचं होतं. ते मधे येणाऱ्या एका खडकाच्या ढिगावर चढले. चढतांना तर व्यवस्थित चढले, पण दुसऱ्या बाजुने उतरतांना ते जवळजवळ घसरुन गलंगडत खाली पडू लागले. त्या खडकांतून रस्ता काढता काढता अचानक स्टेला जोराने किंकाळली.

'' काय झालं?'' जाकोबने विचारलं.

पाहतो तर तो जंगली कुत्रा एकाजागी खडकाच्या ढिगाऱ्याखाली चेंदून मृत्यूमुखी पडलेला होता. त्याचं रक्त सर्वत्र पसरलेलं होतं आणि आजुबाजुचे खडकही त्याच्या रक्ताने माखले होते.

ढिगाऱ्यावरुन घरंगळत खाली पोहचल्यानंतर, ते दोघंही ताबडतोब उठले, आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या जोराने 'एक्झीट' विहिरीकडे धावायला लागले. धावत ओरडत त्यांनी 'एक्झीट' विहिरीजवळ पोहचताच त्या विहिरीत उडी मारली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज कमी कमी होत होता. ते त्या विहिरीत साधारण मध्यावर पोहोचले असतील तेव्हा अचानक त्यांनी ज्या 'एक्झीट' विहिरीत उडी मारली होती त्याच विहिरीत एक भयानक स्फोट झाला.


क्रमश:...


Valuable thoughts -

Lots of times you have to pretend to join a parade in which you're not really interested in order to get where you're going.

---Christopher Darlington Morley (1890-1957)


Marathi Novels, Marathi books, Marathi sangeet, Marathi sangit, Marathi movie, Marathi chitrapat, Marathi sahitya, Marathi mati, Maharastra, Mumbai, Pune, Aurangabad, Nagpur, vidharbh, Sahitya

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 1. i read ur previous novels Adbhut nd Shunya..they were awesome but i like Blackhole more...it is superb...do keep on posting other novela as well...waiting for the newer post in this novel...nd WISH U ALL THE BEST FOR UR novel chosen for movie concept....

  ReplyDelete
 2. I read u r novel. it is awesome.
  waiting for Newer Post...Keep Posting And wish U All the Best

  ReplyDelete
 3. I read ur novels Adbhut,Shunya n now reading Blackhole.Khup chhan aahet.Mala Shunya jast avadale.Adbhut cha suspense jast real asata tar bara vatala asata.else nice.Keep posting more.waiting for more.All the best for your novel selected for movie concept.

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network