Marathi Books - Black Hole CH-50 ती कुठे गेली?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous quotes -

No person can be a great leader unless he takes genuine joy in the successes of those under him.

---W. A. Nance


डॅनियल त्याच्या बेडरुममध्ये झोपला होता खरा. पण त्याला गाढ झोप लागलेली नव्हती. त्याची आपली झोपेत चूळबूळ सुरुच होती. अचानक तो दचकून झोपेतून जागा झाला. त्याने तसेच पडल्या पडल्या त्याच्या बेडरुमच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहाले. जवळ जवळ मध्यरात्र झाली होती. त्याने बेडवर त्याच्या बाजुला सुझानसाठी बघितले. पण तिथे सुझान नव्हती. त्याची उरली सुरली झोप उडाली होती. तो ताडकन उठून बसला आणि त्याने बेडरुममध्ये आपली शोधक नजर सगळीकडे फिरवली. सुझान बेडरुममधे कुठेच नव्हती. अटॅच्ड बाथरुमचा दरवाजासुध्दा बाहेरुन बंद होता. तो ताबडतोब बेडवरुन खाली उतरला आणि बेडरुमच्या बाहेर गेला. प्रथम त्याने सुझानला किचनमधे शोधले. ती तिथेही नव्हती.

कुठे गेली असेल ही?...

आणि इतक्या रात्री...

तो नंतर ड्रॉईंगरुममध्ये गेला. ती तिथेही नव्हती.

आतामात्र त्याला काळजी वाटायला लागली होती.

ही घराच्या बाहेर तर गेली नसावी?...

तो समोरच्या दाराजवळ गेला. समोरचे दार आतून उघडेच होते.

म्हणजे ती बाहेरच गेली असावी...

तो ताबडतोब तिला शोधत घराच्या बाहेर पडला. बाहेर अंगणात त्याने तिला शोधले. ती अंगणातही नव्हती. दूर कुठूनतरी कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता. सुझानही दिसत नव्हती आणि त्या हूरहूर लावणाऱ्या आवाजामुळे त्याला अजुनच बेचैन वाटत होते. तो अंगणातून पुढे जावून आवाराच्या गेटजवळ गेला. समोरचे गेट उघडून त्याने बाहेर डोकावून बघितले. त्याला एवढेही भान नव्हते की गेट आतून बंद होते म्हणजे ती बाहेर गेली नसावी. तरीही त्याने गेट उघडून बाहेर डोकावून बघितले. बाहेर रस्त्यावर अंधाराशिवाय काहीएक दिसत नव्हते. अचानक त्याला जाणवलेकी घराच्या गच्चीवर काहीतरी आहे. त्याने वळून बघितले. त्याला गच्चीवर सुझान एकटीच बसलेली दिसली. वर आकाशात पुर्ण चंद्र दिसत होता. आणि त्या चंद्राच्या उजेडात तिची पाठमोरी बसलेली आकृती त्याला दिसत होती. ती एकदम स्तब्ध आपल्या हातातकडे किंवा हातातल्या काहीतरी वस्तूकडे एकटक पाहण्यात गुंग होती असे भासत होते.

डॉनियल सावकाश, त्याच्या पावलांचा आवाज होणार नाही याची खबरदारी घेत हळू हळू गच्चीच्या पायऱ्या चढू लागला. पायऱ्या चढून गच्चीवर पोहोचल्यानंतर एका जागी तो स्तब्ध थांबला.

एवढ्या रात्री ही इथे एकटी काय करीत असावी?...

त्याला तिला कळू न देता बघायचे होते की ती काय करीत आहे. पुन्हा तो हळू हळू पावलांचा आवाज न होवू देता तिच्याकडे जावू लागला. अजूनही तिचा पाठमोरा भागच त्याच्या दृष्टीपथात होता. अजून समोर गेल्यानंतर त्याला तिचा समोरचा भाग दृष्टीपथात आला. तशी ती तिच्या गुढ विचारात गुंग दिसत होती, पण तिच्या हातात काहीतरी छोटी वस्तू आहे, जिच्यासोबत ती खेळत आहे असे त्याला जाणवले. त्याने अजून जवळ जावून बघितले. ती ज्या वस्तूसोबत खेळत होती तो 'तो' पारदर्शक खडा होता, जो तिने त्या वाड्याजवळून उचलून आपल्या सोबत आणला. ते पाहताच डॅनियलच्या चेहऱ्यावर तिच्याबाबतीत घोर चिंतेचे भाव दिसू लागले.


क्रमश:...


Famous quotes -

No person can be a great leader unless he takes genuine joy in the successes of those under him.

---W. A. Nance


Marathi kadambari, kadambari, marathi books, marathi literature, marathi sahitya, marathi wangmay, marathi vangmay, marathi mhani, marathi axioms, marathi proverbs, marathi quotes, marathi thoughts

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network