Marathi Books - Black Holes CH-44 वाड्याच्या बाहेर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Thoughts -

To be absolutely certain about something, one must know everything or nothing about it.

--- Olin Miller


जसे जाकोब आणि स्टेला 'ए' लेव्हलच्या खडकाळ गुहेत खाली जमिनीवर पडले, ते ताबडतोब उठून उभे राहात धावायला लागले. कारण त्यांना माहित होते की आता त्यांच्याजवळ खूप कमी वेळ शिल्लक राहाला आहे. त्याचा पुरावा म्हणून की काय जसे ते 'ए1' विहिरीजवळून थोडेच समोर गेले असतील तेवढ्यात 'ए1' विहिरीतही भयानकरीत्या विस्फोट झाला. सर्वत्र खडकाचे तुकडे उडाले. काही खडकाचे तुकडे त्यांना लागले देखील. पण त्यांना थांबण्यासाठी किंवा कुठे लागले आहे हे बघण्यासाठी आता बिलकूल वेळ शिल्लक नव्हता. ते तश्याच जखमी अवस्थेत न थांबता आणि मागेही न पाहता धावत राहाले. त्यांना माहित होते की ही आता शेवटची लेव्हल, जी पार पाडली की ते सुखरुप बाहेर पडू शकतील. धावता धावता ते 'ए3' विहिरीजवळून गेले. आणि थोडेच दूर गेले असतील जेव्हा 'ए3' विहिरीतसुद्धा एक भयानक विस्फोट झाला. यावेळी ते त्या विहीरीच्या अगदी जवळ होते. त्यामुळे ते त्या स्फोटाबरोबर खडकांच्या तुकड्यांसोबत हवेत फेकल्या गेले. यावेळी त्यांना बरीच इजा झालेली होती. पण आता त्यांच्या आवाक्यात काहीही राहाले नव्हते. त्या स्फोटाचा जोर त्यांना जिकडे घेवून जात होता तिकडे ते हवेत खडकांसोबत उडत होते. त्यांना माहित होते की ते एकदा खाली पडले की त्यांना सर्वकाही खडकाळ असल्यामुळे भयानक इजा होणार. कदाचित ते त्या माऱ्यातून बचाउही शकणार नव्हते. पण जेव्हा ते खाली पडू लागले, त्यांच्या लक्षात आले की ते बरोबर 'एक्झीट' विहिरीच्या वरच आहेत. आणि खाली पडल्यानंतर ते बरोबर 'एक्झीट' विहिरीतच पडणार आहेत. एवढ्या भयानक स्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद चमकुन गेला. एकदा का त्या विहिरीत पडून ते बाहेर पडले की त्यांची या सर्व भयानक परिस्थितीतून सुटका होणार होती. ते हळू हळ खडकांच्या तुकड्यांसोबत 'एक्झीट' विहिरीत पडत होते. पडतांना त्यांना खडकाचे तुकडे लागुन इजाही होत होत्या. पण त्या इजांच्या वेदनेपेक्षा आपण थोड्याच वेळात या गुहेतून बाहेर पडणार आहोत हा आनंद वरचढ ठरत होता. आता ते अगदी 'एक्झीट' विहीरीच्या वर होते. तेवढ्यात जाकोबच्या मनगटावर जो एक चकाकणारा खडा बांधलेला होता तो, कदाचित खडकांच्या माऱ्यांमुळे त्याच्या हातातून निखळून खाली पडला. तो खडा त्या दोघांच्याही आधी त्या विहीरीत पडू लागला. आणि त्या खड्याच्या मागे आता जाकोब आणि स्टेलाही हळू हळू त्या विहिरीत पडू लागले. पण हे काय... ते जवळपास त्या 'एक्झीट' विहिरीत काही अंतरापर्यंत पोहोचले असतील तेवढ्यात त्या 'एक्झीट' विहिरीतच अचानक एक भयानक विस्फोट झाला. खडकांचे तुकडे सर्वत्र पसरले. ते खडकाचे तुकडे इकडे तिकडे पडून, आजुबाजुच्या खडकांवर आदळून आवाज येत होता. आणि ते सगळं झाल्यानंतर सर्वत्र शांतता आणि अंधार पसरला. वादळानंतरची भयानक शांतता आणि प्रखर उजेडानंतरचा जिवघेणा अंधार!

बाहेर त्या वाड्यात ब्रॅट, डॅनियल, सुझान आणि इतर पोलिस कर्मचारी अजुनही स्टेला आणि गिब्सनचा शोध घेत होते. त्यांना ते तर सापडतच नव्हते पण त्यांच्या काही मागमूसही लागत नव्हता. ब्रॅट त्याच्या सहकाऱ्यांवर सारखा चिडून रागाने ओरडत होता.

'इकडे बघा'

'तिकडे बघा'

असे निर्देश देत होता. त्याचे सहकारीही त्यांना शोधून थकले होते. तेवढ्यात त्यांना एका भयानक स्फोटाचा आवाज आला. काही क्षण तर त्यांना काहीच कळले नाही. वेड्यांसारखे ते सगळेजण आपापला जिव वाचवण्यासाठी सैरावैरा इकडे तिकडे पळत होते. शेवटी त्यांच्या लक्षात आले की स्फोट हा वाड्यात नसून वाड्याच्या बाहेर झालेला आहे. पण स्फोट एवढा मोठा होता की संपूर्ण वाडा त्या स्फोटामुळे हादरला होता. ते ताबडतोब वाड्याच्या बाहेर धावत आले. जेव्हा ते वाड्याच्या मुख्य दरवाजात येवून बाहेर पाहू लागले, ते स्तब्धतेने तिथे उभे राहून बाहेरचं दृष्य पाहत होते. बाहेर जिथे विहिर होती तिच्या आसपास आणि वाड्याच्या समोर सर्वत्र खडकांचे तुकडे पसरलेले होते. अजूनही वातावरणात स्फोटामुळे तयार झालेला धूळीचा ढग हळू हळू खाली बसतांना दिसत होता.


क्रमश:...


Thoughts -

To be absolutely certain about something, one must know everything or nothing about it.

--- Olin Miller


Marathi books, Marathi book, Marathi novels, Kadambari, Marathi sahitya, Marathi literature, Marathi publication, Marathi publication on net, Marathi on net, Marathi on internet, eMarathi

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network