Marathi litearature - Black Hole CH-49 बुक स्टोअर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous saying -

The man who never makes a mistake always takes orders from one who does.

---Daisy Bates (1863-1951)


एका बुक स्टोअरमध्ये डॅनिययलने रॅकवरचे एक पुस्तक हातात घेतले आणि तो त्या पुस्तकाची पाने चाळू लागला. त्याच्या शेजारीच सुझान उभी होती. पण ती आपल्याच विचारात गुंग दिसत होती.

'' बघ... हे पुस्तक इंडियन रेसीपीजबद्दल आहे...'' डॅनियल पुस्तकाची पाने चाळता चाळता सुझानला म्हणाला.

'' हे बघ.. इथे इंडीयन करी तयार करण्याचा विधी दिलेला आहे... तुला करी आवडतेना?'' डॅनियल पुढे म्हणाला.

डॅनियल अजुनही पुस्तकाची पाने चाळत होता. जेव्हा त्याने पुस्तकातून आपली नजर हटवून बाजूला सुझानकडे पाहाले, तेव्हा त्याला आढळले की सुझान तिथे उभी नव्हती.

त्याने ते पुस्तक रॅकवर ठेवून दिले आणि तो शोधक नजरेने बुक स्टोअरमध्ये सुझानला शोधू लागला. त्या हॉलमध्ये तर ती दिसत नव्हती. म्हणून तो बाजुच्या दुसऱ्या हॉलमध्ये तिला शोधायला गेला. ती तिथेही नव्हती.

आता तर माझ्या शेजारी उभी होती...

एवढ्याश्या वेळात कुठे गेली असावी?...

बाजुला एक छोटीशी मॅगझीनची रुम होती. तिथे त्याने डोकावून बघितले. ती तिथेही नव्हती.

एवढ्यात तशीही ती विचित्रपणे वागत आहे...

भाऊही सापडला नाही आणि वहिणीही नाहीशी झाल्यामुळे असावं कदाचित...

हो तेव्हापासूनच ती जरा विक्षीप्तपणे वागत आहे...

आपल्याला एकट्याला इथे सोडून ती घरी तर निघून गेली नसावी?...

त्याच्या डोक्यात एक प्रश्न डोकावून गेला.

तो घाईघाईने दुकानाच्या बाहेर गेला. बाहेर आजुबाजुला बघितले. ती कुठेही दिसत नव्हती.

गाडीची चाबी तिच्या जवळच होती...

गाडी घेवून तर गेली नसावी?...

तो धावतच पार्कीग लॉटकडे निघाला. पार्कींग लॉटमध्ये पोहोचल्यावर बघतो तर त्याची गाडी जागच्या जागी होती.

गाडी जाग्यावरच आहे...

म्हणजे ती इथेच कुठेतरी असायला हवी ...

दुकानाच्या बाहेर तर नाही...

एकदा पुन्हा दुकानातच व्यवस्थित बघितले पाहिजे...

तो पुन्हा बुक स्टोअरमध्ये शिरला. एक एक रुम , एक एक हॉल बारकाईने बघायला लागला. ती कुठेही दिसत नव्हती. तेव्हा अचानक त्याच्या लक्षात आले की बुकस्टोअरला अजून एक फ्लोअर आहे.

कदाचित ती पहिल्या मजल्यावर गेली असेल...

तो पहिल्या मजल्यावर गेला. पहिल्या मजल्यावर तिन चार हॉल असावेत. तो एक एक हॉल शोधू लागला. तशी पहिल्या मजल्यावर ग्राहकांची संख्या तुरळकच होती. चारही हॉलमध्ये त्याने डोकावून बघितले. तिथे ती नव्हती.

कुठे गेली असावी ही?...

आता डॅनियलला काळजी वाटायला लागली होती. पहिल्या मजल्यावरुन खाली उतरण्याच्या आधी त्याने बाजुला एक छोटी पुस्तकांची रुम होती तिथे डोकावून पाहाले. त्याला ती तिथे एका कोपऱ्यात पाठमोरी उभी असलेली दिसली. त्याला हायसं वाटलं. त्याने तिच्या जवळ जावून बघितले. तीच्या हातात एक काळं कव्हर असलेलं पुस्तक होतं. आणि ती अक्षरश: त्या पुस्तकात गुंग होवून त्याची पानं चाळत होती.

'' हनी... तू इथे काय करीत आहेस?'' त्याने तिच्याजवळ जात विचारले.

'' मी किती घाबरलो होतो... '' तो पुढे म्हणाला.

तिने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ती अजुनही त्या पुस्तकात पुर्णपणे गुंतलेली दिसत होती.

'' सुझान ...'' डॅनियल तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचा खांदा हलवित म्हणाला.

सुझानने शांतपणे ते पुस्तक मिटले, समोरच्या रॅकवर ठेवले आणि डॅनियलकडे एक नजर टाकत ती पुढच्या रॅककडे चालायला लागली. डॅनियल आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. डॅनियलने तिने रॅकवर परत ठेवलेले पुस्तक बाहेर काढले. त्याने पुस्तकाचे शिर्षक वाचले. शिर्षक होते - ' ब्लॅक होल'


क्रमश:...


Famous saying -

The man who never makes a mistake always takes orders from one who does.

---Daisy Bates (1863-1951)


Marathi novels, Marathi books, Marathi proverb, Marathi mhani, Marathi gani, Marathi literature, Marathi sahitya, Marathi katha, Marathi gosti, Marathi stories, Marathi ring tone, Marathi sms, Marathi

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network