Marathi literature - Black Hole CH-40 तू कोण आहेस?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Precious thoughts -

When people are free to do as they please, they usually imitate each other.

--- Eric Hoffer (1902-1983)


वाड्याच्या समोर आता स्टेला आणि पोलिसांच्या गाड्यांच्या बाजुला अजून एक गाडी येवून उभी राहाली. त्यातून ब्रॅट घाई घाईने खाली उतरला आणि मागे न पाहताच त्याने आपल्या गाडीचे दार जोरात मागे ढकलून बंद केले. तो उतरताच त्याच्यासाठी थांबलेला पोलिस ताबडतोब त्याला सामोरा आला.

'' आपली टीम कुठाय? '' ब्रॅटने विचारले.

'' सर ते आत... वाड्यात गेले आहेत'' त्या पोलिसाने अदबीने उत्तर दिले.

ब्रॅट त्या वाड्याकडे निघत, त्या पोलिसाकडे न पाहता म्हणाला, '' चल''

ते दोघेही घाईघाईने वाड्यात शिरु लागले.

स्टेलाने आतील एका ब्लॅकहोलमध्ये पुन्हा उडी मारली. तिने उडी मारताच तो जंगली कुत्रा एका खडकाच्या मागुन तोंडात एक हाड घेवून चावत चावत त्या विहिरीजवळ आला. त्या हाडाला अजुनही कुठे कुठे मांस चिकटलेलं होतं. तो त्या विहिरीच्या काठावरुन ते हाड चावता चावता आत वाकुन, कदाचित स्टेलाला पाहू लागला.

स्टेला दुसऱ्या एका लेव्हलवरील खडकाळ गुहेत जमिनिवर पडली होती. ती ताबडतोब उभी राहाली. तेवढ्यात 'थड' एक अर्धवट खाल्लेलं कुठे कुठे मांस चिकटलेलं हाड तिच्या समोर येवून पडलं. भितीने दचकून तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. ती त्या हाडापासून दोन पावले मागे सरली.

वाड्याच्या समोर स्टेला आणि पोलिसांच्या जिपच्या बाजुला आता सुझानचीही कार येवून थांबली. त्या वाड्याकडे आणि आजुबाजुच्या परिसराकडे आश्चर्याने पाहत सुझान आणि डॅनियल कारमधून उतरले.

'' या अश्या भितीदायक ठिकाणी ती काय करीत असावी?'' डॅनियलने विचारले.

'' चल लवकर आत चल... आत्तापर्यंत ब्रॅटने तिला शोधले असेल.'' सुझान वाड्यात जाण्याची घाई करीत म्हणाली. सुझान समोर आणि डॅनियल मागे मागे असे दोघंही घाई घाईने वाड्यात शिरले.

स्टेला आत एका 'D' लेव्हलच्या गुहेत होती. ती आपल्या टॉर्चचा प्रकाश गुहेत चहुकडे फिरवीत होती. शेवटी तिच्या टॉर्चचा प्रकाशझोत एका विहिरीच्या शेजारी असलेल्या खडकावर येवून स्थिर झाला. त्या खडकावर 'D1' असं कोरलेलं होतं. स्टेला पुन्हा तिच्या टॉर्चचा प्रकाश आता त्या विहिरीच्या आजुबाजुला फिरवू लागली. तेवढ्यात ती दचकली, तिला जाकोब तिच्या एकदम पुढ्यात उभा असलेला आढळला. त्याच्या एका हातात एक मोठा सुरा होता आणि दुसऱ्या हातात एक खडक. जसा प्रकाश त्याच्या अंगावर पडला, तो हळू हळू स्टेलाच्या दिशेने चालू लागला. स्टेलाही न भिता त्याच्याकडे हळू हळू चालू लागली.

'' तू इथे काय करतेस?...'' जाकोबने तिला विचारले.

स्टेलाने एक अर्थपूर्ण दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकला आणि ती त्याच्याकडे पाहतच राहाली. हळू हळू तिचे डोळे पाणावू लागले होते.

'' तू कोण आहेस?'' स्टेलाचा गंभीर स्वर गुंजला.

जाकोब तिच्याकडे येता येता तिथेच थांबला.

'' सांग तू कोण आहेस?... मी तुला पुर्णपणे ओळखले आहे'' स्टेला म्हणाली.

जाकोबची त्याच्या हातातल्या सुऱ्यावरची आणि खडकावरची पकड आवळली होती. तो आता तिच्या अगदी समोर येवून तिच्या डोळ्यातले भाव समजण्याचा प्रयत्न करु लागला.

'' मला खात्री होती की एक ना एक दिवस तुला सत्य माहित होईलच ..'' जाकोब म्हणाला.

तो अजुन समोर येवून अगदी तिच्या चेहऱ्यासमोर उभा राहाला. त्याच्या हाताची सुऱ्यावरची आणि खडकावरची पकड ढीली होवून ते त्याच्या हातातून सुटून खाली पडले. तोही आता तिच्याकडे एका अर्थपुर्ण नजरेने पाहू लागला.

'' हनी... तू मला बरोबर ओळखलंस... हो मी गिब्सनच आहे... तुझा गिब्सन..'' तो आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवून म्हणाला. तो अजून जवळ जावून तिच्या डोळ्यात बघू लागला. ते आता इतके जवळ आले होते की त्यांना एकमेकांचे स्वाशोच्छवाससुध्दा जाणवत होते. एकदम आवेगाने दोघांनी एकमेकांना एक प्रदिर्घ आणि घट्ट मिठी मारली.


क्रमश:...


Precious thoughts -

When people are free to do as they please, they usually imitate each other.

--- Eric Hoffer (1902-1983)


Marathi, Marathi sahitya, Marathi literature, Marathi books, Marathi Novels, Marathi Art, Marathi art work, Marathi jyotish, Marathi bhasha, Marathi people, Maharastra, vidarbha, konkan

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network