Marathi literature - Black Hole CH-41 विहिर 'D4'

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous quotes -

Don't say you don't have enough time. You have exactly the same number of hours per day that were given to Helen Keller, Pasteur, Michaelangelo, Mother Teresa, Leonardo da Vinci, Thomas Jefferson, and Albert Einstein.

--- H. Jackson Brown


बराच वेळ स्टेला आणि जाकोब एकमेकांच्या अलिंगणात बद्ध होते. तिला शेवटी कळले होते की जाकोब म्हणजेच तिचा गिब्सन आहे.

ती जाकोबच्या अलिंगणातून बाहेर आली आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेवून त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागली.

गिब्सनच्या आणि जाकोबच्या चेहऱ्यात सूतभरही साम्य नव्हते.

'' पण हनी, हे कसे काय झाले ?'' तीने त्याच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहत विचारले.

तिकडे बाहेर सुझान, डॅनियल, ब्रॅट आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी वाड्याचा कोपरा न कोपरा पिंजून काढला पण त्यांना स्टेला कुठेही दिसत नव्हती. ब्रॅटची अपेक्षा होती की आज त्याला गिब्सनही सापडेल. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे काही एक होत नव्हतं. ब्रॅट आता पुरता चिडला होता.

ठिक आहे गिब्सन सापडत नाही आहे पण आता ही स्टेला कुठे गेली?...

ती आकाशात नाहीशी झाली की तिला जमिनीने आपल्यात सामावून घेतले....

तो त्याचा राग त्याच्या साथीदारांवर चिड चिड करुन काढीत होता.

स्टॆला आणि जाकोब ज्या विहिरीच्या शेजारच्या दगडावर 'D4' असे कोरले होते, त्या विहिरीजवळ उभे होते. त्या दगडावर 'D4' च्या खाली 'धोका' असे लिहिलेले होते आणि त्याच्याखाली प्रिझमसारखी आकृती कोरलेली होती. जाकोबने त्या प्रिझमसारख्या आकृतीला स्पर्ष केला आणि तो स्पर्ष तो जाणीवेने अनुभवत तो म्हणाला,

'' हेच ते ब्लॅकहोल आहे जे या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे''

स्टेला त्याच्याकडे पाहत तो अजुन पुढे काय सांगतो याची वाट पाहू लागली.

जाकोब त्याची कहाणी सांगू लागला .....


.... गिब्सन जेव्हा 'D' लेव्हलला आला तेव्हा तो नवख्यासारखा आपल्या टॉर्चच्या प्रकाशात इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या हातातल्या कागदपत्रांचा संदर्भ घेवून तो हळू हळू चालत 'D4' विहिरीजवळ आला. त्याने वाकुन त्या विहिरीत डोकावून पाहाले. त्याने त्याच्या हातातले कागदपत्र विहिरीच्या बाजुला ठेवले आणि दोन पावलं मागे सरुन धावत येवून त्या विहिरीत उडी मारली.

गिब्सन एका दुसऱ्या खडकाळ गुहेत जमिनिवर पडला. आजुबाजुला पाहत, आपल्या जवळच्या टॉर्चचा प्रकाश गुहेत इकडे तिकडे फिरवित तो उठून उभा राहाला. त्याने त्याच्या समोर असलेल्या दगडाच्या भिंतिकडे पाहाले. तो त्या भिंतीजवळ गेला आणि त्याने त्या भिंतीवर एका ठिसूळ पांढऱ्या दगडाने लिहिले, ' वर्ल्ड इज ए मॅथेमॅटीकल एक्स्प्रेशन विच इज ए फन्क्शन ऑफ स्पेस ऍन्ड टाईम'

पुर्ण वाक्य लिहिल्यानंतर तो त्या शब्दांकडे निरखून पहायला लागला. त्याच्या लक्षात आले की ते शब्द ज्या क्रमाने लिहिले गेले होते त्या क्रमाने एक एक करुन त्या भिंतिवरुन नाहीसे होताहेत. त्याने गुहेत आजुबाजुला एक नजर फिरवली. त्याने आपल्या टॉर्चचा प्रकाशझोत इकडे तिकडे फिरवून त्या गुहेत 'Exit' विहिर शोधली आणि तो त्या विहिरीकडे चालायला लागला.

तो चालत होता आणि हळू हळू त्याच्या अंगावरचे कपडे नाहिसे व्हायला लागले....

नंतर त्याच्या हातातला टॉर्च नाहिसा झाला....

नंतर जे बदल होत होते त्याचा वेग वाढत गेला.

हळू हळू गिब्सनचे वय कमी होवू लागले....

इतके कमी की तो आता 7-8 वर्षाचा मुलगा झाला होता....

त्याचे वय अजून अजून कमी होवून त्याचे आता 4-5 महिण्याच्या बाळात रुपांतर झाले....

शेवटी तर तो पुर्णपणे नाहीसा झाला....

तो जिथे उभा होता तिथे आता काहीच उरले नव्हते....

नंतर तर ती सभोवतालची गुहाच हळू हळू नाहिशी होवू लागली....

एक क्षण असा आला की ती सभोवतालची संपुर्ण गुहा नाहीशी झाली...

.....

.....

अचानक जणू शून्यातून ती गुहा अवतिर्ण होवू लागली...

संपूर्ण गुहा अवतिर्ण झाल्यानंतर थोड्या वेळाने...अचानक तो जिथे उभा होता तिथे पुन्हा एक बाळ अवतिर्ण झाले.....

आणि आता हळू हळू त्या बाळाचे वय वाढू लागले.....

ते बाळ हळू हळू मोठे होवून त्याचे एका मुलात रुपांतर होवू लागले ....

तो मुलगाही आता हळू हळू वयाने वाढायला लागला.....

तो मुलगा आता हळू हळू वाढून त्याचे रुपांतर आता एका माणसात होवू लागले....

पण तो माणूस आता गिब्सन राहाला नव्हता.....

तो पुर्णपणे वेगाळा माणूस - जाकोब झाला होता.....

हळू हळू त्याच्या अंगावरचे कपडे परत आले,....

त्याच्या हातातला टॉर्चही परत आला.....

आता घडणाऱ्या घटनांची गति पुन्हा कमी झाली होती. जाकोबला त्याच्या समोर आता टॉर्चच्या उजेडात 'Exit' विहिर पुन्हा दिसायला लागली. त्याने बाजुच्या भिंतीकडे बघितले. त्या भिंतीवरही त्याने लिहिलेले शब्द हळू हळू अवतरु लागले -

' वर्ल्ड इज ए मॅथेमॅटीकल एक्स्प्रेशन विच इज ए फन्क्शन ऑफ स्पेस ऍन्ड टाईम'

जाकोब ते वाक्य पुर्णपणे त्या भिंतीवर अवतरण्याची वाटच पाहत होता. जसे ते वाक्य पुर्णपणे त्या भिंतिवर अवतरले, जाकोब त्याच्या समोर दिसणाऱ्या 'Exit' विहिरीकडे वेगाने धावायला लागला. विहिरीच्या जवळ पोहचताच क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब त्याने विहिरीत उडी मारली.


क्रमश:...


Famous quotes -

Don't say you don't have enough time. You have exactly the same number of hours per day that were given to Helen Keller, Pasteur, Michaelangelo, Mother Teresa, Leonardo da Vinci, Thomas Jefferson, and Albert Einstein.

--- H. Jackson Brown


Marathi novels, Marathi books, Marathi literature, Marathi sahitya, Marathi cinema, Marathi movies, Marathi songs, Marathi gani, Marathi poems, Marathi charolya, Marathi fiction, Marathi artwork

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. It's amazing..!!!!!!!!
    I liked this very much than Ad-bhut.And I'm eagarly waiting to know that what's next?

    ReplyDelete
  2. it's amazing..........how can i ge next story

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network