Marathi literature - Black Hole CH-48 तो खडा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous proverbs -

If all pulled in one direction, the world would keel over.

--- Yiddish proverb


'' काय तुम्ही डॉ. स्टिव्हन हॉल्स?'' जाकोबच्या तोंडून आश्चर्योदगार निघाले.

इतक्या वेळपासून त्यांच्या आजुबाजुला घूटमळत असणारा म्हातारा म्हणजे दूसरे तिसरे कुणी नसून ज्याने ती ब्लॅकहोल्स तयार केली होती तो जेष्ठ संशोधक डॉ. स्टिव्हन हॉल्स आहे याचे जाकोबला आश्चर्य वाटत होते.

'' पण तुम्ही असे नकारात्मक बोलाल अशी मला आशा नव्हती... तुम्ही एक संशोधक आहात... मला तर तुमचा फार अभिमान होता... मला माफ करा पण ... तुमच्या तोंडून असं नकारात्मक शोभत नाही...'' जाकोब म्हणाला.

जाकोबचा अजुनही विश्वास वाटत नव्हता की तो म्हातारा म्हणजे डॉ. स्टिव्हन हॉल्स असावा.

तेवढ्यात जाकोबचं लक्ष सुझान, डॅनियल, ब्रॅट आणि जमलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांकडे गेलं. ते एका घोळाक्यात जमा झाले होते.

जाकोब त्या घोळक्याकडे पाहत म्हणाला, '' हे संशोधन पुढे सुरु ठेवण्याचा काहीतर मार्ग असेल... मला काहीतरी केलंच पाहिजे... कारण मला माझ्यातला संशोधक स्वस्थ बसू देणार नाही...''

'' तुला वाटतं मी प्रयत्न केला नसेल?'' डॉ. स्टिव्हनने विचारले.

जाकोबने डॉ. स्टिव्हनकडे पाहाले न पाहल्यासारखे केले आणि तो त्या सुझान, डॅनियल आणि इतर लोकांच्या घोळक्याकडे जावू लागला. त्याने जवळ जावून बघितले तर ते लोक एकत्र जमून तिथे जमिनीवर काहीतरी पडले असावे त्याकडे निरखून पाहत होते. त्या घोळक्याकडे चालता चालता जाकोबच्या चेहऱ्यावर आता एक विजयी हास्य दिसू लागले होते. त्याचा चेहरा आनंदाने चमकू लागला होता. स्टेला जाकोबकडे आश्चर्याने पाहत होती. त्याच्या मनात काय चालले होते ते समजून घेण्याचा ती प्रयत्न करीत होती.

तेवढ्यात अचानक डॉ. स्टिव्हनने जोरात ओरडून जाकोबला ताकिद दिली,

'' जाकोब... थांब ... असं करु नकोस ... ते धोकादायक आहे''

कदाचित डॉ. स्टिव्हनला त्याच्या मनात काय चालले आहे याची कल्पना आली असावी.

जाकोब थांबायला तयार नव्हता. त्याने डॉ. स्टिव्हनला काहिच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त त्यांच्याकडे वळून पाहात तो गुढपणे गालातल्या गालात हसला.

स्टेलाला तर काहीच समजत नव्हते. ती गोंधळून कधी जाकोबकडे तर कधी डॉ. स्टिव्हनकडे पाहत होती.

जाकोब त्या जमलेल्या घोळक्याच्या अजुन जवळ गेला.

'' जाकोब थांब...'' डॉ. स्टिव्हन पुन्हा ओरडले.

पण जाकोब थांबायला तयार नव्हता. तो आता सुझानच्या जवळ गेला.

जाकोबने पुन्हा एकदा स्टेला आणि डॉ. स्टिव्हनकडे वळून बघितले. तो अजुनही गालातल्या गालात हसत होता.

स्टेलाला अजुनही जाकोबच्या मनात काय चालले होते आणि आता पुढे तो काय करणार आहे हे काही कळत नव्हते.

पण डॉ. स्टिव्हनला कदाचित त्याच्या मनात काय चालले आहे आणि आता तो पुढे काय करणार आहे हे सगळे कळले असावे.

'' नको असं नको करुस .... तिच्या जिवाला धोका आहे'' डॉ. स्टिव्हनने जाकोबला पुन्हा बजावले.

पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो हळू हळू सुझानच्या शरीरात प्रवेश करु लागला.

'' थांब जाकोब...'' डॉ. स्टिव्हनने शेवटचे बजावले.

पण जाकोब थांबायला तयार नव्हता. तो आता पुर्णपणे सुझानच्या शरीरात शिरला होता.

सुझान, डॅनियल, ब्रॅट आणि इतर पोलिस कर्मचारी घोळक्यात उभे होते आणि ते घोळक्याच्या मधे जमिनीवर पडलेल्या त्या हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या पारदर्शक खड्याकडे निरखून पाहत होते. तेवढ्यात स्टेला तिथे आली. त्या घोळक्यात घूसून तिने तो पारदर्शक खडा उचलण्याचा प्रयत्न केला. पण तो खडा तिच्या हातात येत नव्हता. तिचा हात पोकळ असल्याप्रमाणे किंवा तो खडा पोकळ असल्याप्रमाणे तिचा होत त्या खड्यावरुन फिरत होता पण तो खडा काही तिच्या हातात येत नव्हता. तेवढ्यात सुझान समोर आली. तिच्या शरीराच्या हालचाली आता संथ वाटत होत्या आणि ती सुस्त वाटत होती. तिने तो पारदर्शक खडा उचलला आणि ती त्या खड्याकडे जवळून एकटक पाहू लागली.


क्रमश:...


Famous proverbs -

If all pulled in one direction, the world would keel over.

--- Yiddish proverb


marathi library, Marathi publication, Marathi literature, Marathi sahitya, Marathi books, Marathi kadambari, Kadambari, marathi sahitya, Marathi vangmay, Marathi novels, Marathi cinema

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network