Marathi literature - Black Hole CH-51 अपघात

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Quote of the day -

No man or woman who tries to pursue an ideal in his or her own way is without enemies.

---Daisy Bates (1863-1951)


सुझान आणि डॅनियल बेडरुममध्ये गाढ झोपलेले दिसत होते. अचानक सुझान झोपेतच अस्वस्थ दिसायला लागली. तिची बेचैनी आणि चूळबुळ सुरु झाली. तिच्या सर्वांगाला दरदरुन घाम फुटला होता. काही घामाचे थेंब चेहऱ्यावरसुद्धा दिसायला लागले होते. अचानक चूळबूळ करता करता सुझानने दचकुन डोळे उघडले. ती उठून बसली.

तिला स्वप्नात एवढ्यात राहून राहून एका खडकाळ गुहेच्या विस्फोटाचे चित्र दिसत होतं...

वाड्याच्या समोर विस्फोट झाला होता तेव्हापासूनच तिला हे विचित्र स्वप्न दिसायला लागलं होतं....

खरं म्हणजे तेव्हापासूनच तिच्यात अमुलाग्र बदल झालेले तिलाही जाणवत होते....

पण ती काही करु शकत नव्हती आणि कुणाजवळ मोकळेपणाने बोलूही शकत नव्हती....

ती बेडवरुन खाली उतरली आणि बेडरुमच्या दाराकडे निघाली. तिने बेडरुमचे दार उघडले. तिच्या सगळ्या हालचाली एखाद्या यंत्रागत होत होत्या. जणू त्या हालचाली तिच्या स्वत:च्या नसून दुसरेच कुणीतरी तिला त्या हालचाली करण्यास भाग पाडत असावं असं वाटत होतं. बेडरुमच्या उघडलेल्या दारात उभं राहून तिने वळून एकदा डॅनियलकडे बघितले. कदाचित तो अजूनही गाढ झोपेत आहे की नाही याची तिला खात्री करायची होती. डॅनियल गाढ झोपेत होता.

मध्यरात्र उलटून गेली असावी. सुझानच्या घरासमोर सर्वत्र अंधार होता. रातकिड्यांचा किर्र किर्र असा आवाज येत होता. तेवढ्यात सुझानच्या घराचं समोरचं दार उघडलं आणि घरातून सुझान बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने समोरचं दार ओढून घेतलं आणि ती तिच्या कारकडे निघाली. बाहेर वातावरण भयावह वाटत होतं. दुरवर कुठेतरी कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. पण याचा सगळा सुझानवर काहीएक परीणाम दिसत नव्हता. ती न घुटमळता न अडखळता सरळ आपल्या कारकडे जात होती. ती कारजवळ पोहोचताच तिने कारचं दार उघडलं, आणि आत बसून दार ओढून घेतलं. कार सुरु करुन तिने रिव्हर्स गियरमध्ये पार्कीगच्या बाहेर काढली. कार रस्त्यावर येताच तिने आपली कार भन्नाट वेगाने दौडवली.

सुझान कार चालवत होती. तेवढ्यात स्टेलाची पुसटशी आकृती सुझानच्या शेजारच्या सिटवर अवतरली. तरीही सुझान आपली कार चालविण्यात मग्न होती. कारच्या मागच्या सिटवर आता डॉ. स्टिव्हनची पुसटशी आकृती अवतरली.

'' जाकोब, मी तुला पुन्हा बजावतो आहे... हे असं करु नकोस... ते धोकादायक आहे'' डॉ. स्टिव्हनच्या आकृतीने बजावले.

आता सुझानच्या शरीरात जाकोबची पुसटशी आकृती दिसायला लागली.

'' जाकोब... मला वाटते तु डॉ. स्टिव्हन काय म्हणतात ते ऐकायला पाहिजे'' स्टेलाच्या आकृतीने दुजोरा दिला.

'' नाही ... मी माझ्या निर्णयावर अगदी ठाम आहे'' सुझानच्या शरीरात दिसणारी जाकोबची आकृती पहिल्यांदाच बोलली.

तेवढ्यात अचानक समोरुन एक कार भन्नाट वेगाने अगदी सुझानच्या कारच्या समोर आली. हे सगळं एवढं अचानक झालं की सुझानला एक क्षण वाटून गेलं की त्यांची टक्कर होणार. पण तिने पटकन आपली कार डाव्या बाजुला वळवून टक्कर वाचविण्याचा प्रयत्न केला. आणि टक्कर वाचली सुध्दा. सुझान, स्टेला आणि डॉ. स्टिव्हनने टक्कर वाचलेली पाहून सुटकेचा सुस्कारा सोडला. पण हे काय? पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एकदम पुन्हा भिती आणि काळजी दिसायला लागली. सुझानच्या लक्षात आले की तिच्या कारची आता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या बुंध्याशी टक्कर होणार आहे. कारमधील सगळेजण एकदम जोरात किंचाळले. सुझानने जेवढं लवकर, जेवढ्या जोरात शक्य होईल तेवढ्या जोरात तिच्या कारचे ब्रेक दाबले. सुझानची कार आता बेकाबू होवून वेडीवाकडी इकडे तिकडे वळने घ्यायला लागली. आणि पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुसऱ्या झाडाच्या बुंध्याला जावून धडकली.


क्रमश:...


Quote of the day -

No man or woman who tries to pursue an ideal in his or her own way is without enemies.

---Daisy Bates (1863-1951)


Marathi literature, Marathi sahitya, Marathi man, Marathi shilpa, Marathi yatra, Marathi books, Marathi novels, Marathi bhasha, Marathi language, Marathi people, Marathi state, Maharastra state

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network