Marathi Sahitya - Black Hole CH 52 जखमी सुझान

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous thoughts -

When all think alike, no one is thinking very much.

---Walter Lippmann (1889-1974)


एका जागी रस्त्याच्या कडेला अपघातामुळे चेपलेली सुझानची कार उलटी पडलेली होती. कारने एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला जोराची धडक मारली होती. धडक एवढ्या जोरात बसली होती की जिथे धडक लागली होती तेथील झाडाच्या बुंध्याच्या भागालाही जबर इजा झालेली दिसत होती. कारच्या ड्रायव्हीग सिटवर अजुनही जखमी अवस्थेत सुझान पडलेली होती. कारच्या दुसऱ्या बाजुला बसलेली स्टेलाची आकृती कारच्या बाहेर आली आणि मागच्या बाजुला बसलेली डॉ. स्टिव्हनची आकृती बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर ते जखमी अवस्थेत पडलेल्या सुझानजवळ गेले.

'' मी त्याला आधीपासूनच सांगत होतो... पण त्याने माझं काहीएक ऐकलं नाही'' डॉ. स्टिव्हन सुझानजवळ येत म्हणाले.

स्टेलाने वाकुन सुझानची नाडी तपासण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हातात तिचं मनगट येत नव्हतं. डॉ. स्टिव्हन तिच्या शेजारी उभं राहून गंमत बघितल्याप्रमाणे तिच्याकडे पाहत होते.

'' आता तुला तुझ्या सवयी बदलाव्या लागतील... इथे सगळे नियम वेगळे आहेत'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

मग स्टेलाने तिचा श्वास सुरु आहे की नाही हे निरखून बघितले.

'' थॅंक गॉड... तिचा श्वासोच्छवास तर सुरु आहे असं दिसत आहे'' स्टेला म्हणाली.

पण काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे ती इकडे तिकडे पाहत म्हणाली, '' पण जाकोब कुठे आहे?''

स्टेला आणि डॉ. स्टिव्हनने उठून उभे राहात इकडे तिकडे आपली नजर फिरवली. पण जाकोब कुठेही दिसत नव्हता. स्टेला आता कारच्या दुसऱ्या बाजुला जावू लागली.

'' त्याला आपण नंतर मागाहून शोधू शकतो... पण आधी हिला वाचवणे सगळ्यात महत्वाचे आहे'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

स्टेलालाही ते पटलं होतं. म्हणून ती परत सुझानजवळ आली. पुन्हा वाकुन ती तिला आधार देण्याचा प्रयत्न करु लागली. पण आपण तिला आधार देवू शकणार नाही हे लक्षात आल्यावर ती वळून डॉ. स्टिव्हनकडे पाहू लागली. तिला आपण सुझानला मदत करु शकत नाही याचं वाईट वाटत होतं. पुन्हा ती उठून उभी राहाली आणि मदतीसाठी इकडे तिकडे काही दिसते का ते शोधू लागली. पण आजुबाजुला कुणीच नव्हतं. सगळीकडे रस्त्यावर स्मशानवत शांतता आणि अंधार पसरलेला होता. ती आता रस्त्यावर समोर कुणी मदतीसाठी मिळतो का याचा शोध घेत चालू लागली. थोड्या वेळ चालल्यानंतर ती धावायला लागली. तिला माहित होतं की सुझानला जर वाचवायचं असेल तर आपल्याला घाई करावी लागेल. समोरही कुणी दिसत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि आगतिकता पसरायला लागली होती. तेवढ्यात एक कार भरधाव वेगात समोरुन येतांना तिला दिसली. तिने कार थांबविण्यासाठी हात केला. पण ती कार काही थांबली नाही. मग तिच्या लक्षात आले की आपण त्या कार ड्रायव्हरला दिसलो नसू. म्हणून ती जोरात त्या कारच्या मागे धावू लागली. धावता धावता तिच्या लक्षात आले की आपण या रुपात कितीतरी वेगात, हवेप्रमाणे हलके असल्याप्रमाणे धावू शकतो. धावता धावता तिने त्या भरधाव वेगाने धावणाऱ्या कारमधे प्रवेश केला. आणि मग तिने त्या ड्रायव्हरच्या शरीरात प्रवेश करुन सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली.

त्या ड्रायव्हरने आपली कार भरधाव वेगात अपघात जिथे झाला होता त्या जागेकडे दुर्लक्ष करीत समोर नेली होती. अपघाताच्या जागेपासून काही अंतरावर जाताच अचानक त्या ड्रायव्हरने आपली कार करकचून ब्रेक दाबुन थांबवली. नंतर आपली कार वळवून तो ड्रायव्हर जिथे अपघात झाला होता त्या जागेवर आला. आपली कार थांबवून ड्रायव्हर ताबडतोब आपल्या गाडीतून उतरला आणि सरळ सुझान जिथे जखमी अवस्थेत पडली होती तिकडे धावत गेला. ड्रायव्हरने त्या उलट्या कारचे समोरचे दार उघडून सुझानला बाहेर काढले. बाहेर काढून, उचलून त्याने सुझानला आपल्या कारच्या मागच्या सिटवर झोपवले. ड्रायव्हरने मागचे दार बंद केले आणि क्षणाचाही विलंब न लावता आपल्या ड्रायव्हींग सिटवर बसून आपली कार भरधाव वेगाने पळवली. हळू हळू पुसटशी स्टेलाची आकृती ड्रायव्हरच्या शरीरात दिसू लागली आणि डॉ. स्टिव्हनची आकृती सुझानच्या शेजारी, मागच्या सिटवर अवतरली.


क्रमश:...


Famous thoughts -

When all think alike, no one is thinking very much.

---Walter Lippmann (1889-1974)


Marathi thoughts, Marathi kadambari, Marathi blog, Marathi novels, Marathi books, Marathi publication, Marathi pustak, Marathi library, Marathi fiction, Marathi entertainment, Marathi lekh

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network