Marathi vangmay - Black Hole CH-42 चेतना

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous proverbs -

One who sits between two chairs may easily fall down.

--- Proverb from Romania and Russia


जेव्हा जाकोब 'C' लेव्हलच्या गुहेत जमिनीवर पडला, त्याचे डोळे बंद होते. त्याच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती पण त्याच्या शरीरात सुक्ष्म पातळीवर हालचाल सुरु होती. त्याच्या शरीरातून एक चेतना बाहेर निघू पाहत होती. ती चेतना त्याच्या शरीरातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती, कारण ती चेतना गिब्सनची होती आणि ते शरीरतर वेगळंच होतं. खुप प्रयत्न केल्यानंतर एखादं रबर ताणावं तशी ती चेतना त्या शरीरातून बाहेर पडली. पण त्या चेतनेचे मुळ अजुनही त्या शरीरातच घुटमळत होते.

ती जाकोबच्या शरीरातून बाहेर पडलेली चेतना थेट तिथून निघाली ती स्टेलाच्या बेडरुममध्ये शिरली. स्टेला बेडरुममध्ये गाढ झोपेत होती. जशी ती चेतना तिच्याजवळ गेली, स्टेला घाबरन स्वप्नातून उठावी तशी उठली. त्याच वेळी त्या चेतनेचे जे मुळ तिकडे गुहेत जाकोबच्या शरीरात घूटमळत होते ते त्या चेतनेला आपल्याकडे ओढून घ्यायला लागले आणि ती चेतना बेडरुमधून खिडकीच्या मार्गे अदृष्य झाली.

जाकोबच्या शरीरात जे त्या चेतनेचे मुळ घुटमळत होते त्यामूळे ती चेतना जाकोबच्या शरीरात ओढल्या गेली आणि कायमची त्या शरीरात अडकून पडली, कारण दिसायला वेगळ्या स्वरुपाचं असलं तरी त्या शरीराचा कण कण त्या चेतनेचा होता. त्या शरीराच्या प्रत्येक कणांवर त्या चेतनेचा हक्क होता. अचानक त्या शरीराने - जाकोबने त्या गुहेत पडलेल्या अवस्थेत आपले डोळे उघडले ...


... 'D4' विहिरीच्या शेजारी उभं राहून जाकोब आपली आपबीती स्टेलाला सांगत होता. स्टेला आश्चर्याने त्याची कहाणी ऐकत त्याच्याकडे एकटक पाहत होती.

जाकोब त्या विहिरीच्या बाजुला असलेल्या खडकावर कोरलेल्या प्रिझम सारख्या आकाराला स्पर्ष करीत म्हणाला, '' जसं तुला माहित आहेच ब्लॅकहोल 'A3' मध्ये 15 मिनीट बाहेरचे हे आतल्या 1 तासाबरोबर असतात.. म्हणजे तिथे वेळ आपल्या वेळेच्या मानाने समोर धावतो..'' जाकोब आपला हात घड्याळीच्या दिशेने फिरवून दाखवीत म्हणाला.

त्याने त्याच्या टॉर्चचा उजेड आता दुसऱ्या एका विहिरीशेजारी असलेल्या खडकावर टाकला, ज्यावर 'D5' अशी कोरलेली अक्षरे दिसत होती.

'' आणि या 'D5' ब्लॅकहोलमध्ये वेळ उलटी धावते...'' जाकोब आपला हात घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवित म्हणाला.

जाकोब पुन्हा आपल्या हाताने 'D4' विहिरीच्या शेजारी असलेल्या खडकावर कोरलेल्या प्रिझमला हळूच स्पर्ष करीत म्हणाला, '' पण या 'D4' ब्लॅकहोलमध्ये वेळेचे परिमाण हे पुर्णपणे वेगळे आहे... इथे वेळ पुढे मागे ... दोलायमान होतो ...'' जाकोबने आपला हात एकदा घड्याळीच्या दिशेने आणि मग घड्याळाच्या विरुध्द दिशेने फिरवीत म्हटले.

'' दोलायमान होतो म्हणजे?'' स्टेलाने विचारले.

'' म्हणजे तिथे वेळ एखाद्या पेंडूलम सारखी मागे पुढे धावते...'' जाकोब आपला हात पेंडूलमसारखा मागे पुढे करीत म्हणाला.

स्टेला अजुनही जाकोबकडे आश्चर्याने एकसारखी पाहत होती. तिच्या त्या आश्चर्याने विस्फारलेल्या डोळ्यात आता प्रेमाचा अंशही दिसायला लागला. जाकोबही तिच्या नजरेत अडकून तिच्याकडे प्रेमाने बघायला लागला. ते पुन्हा एकदा एका घट्ट अलिंगणात बद्ध झाले.

'' पण इतके दिवस तू मला हे सगळं का सांगितलं नाहिस?'' स्टेलाने विचारले.

ते अजुनही आलिंगनबद्ध होते.

जाकोब आलिंगणातून बाहेर येत म्हणाला, '' आपला नवरा... तो ही एका पुर्णपणे वेगळ्या शरीरात... मला शंका होती की तू त्यावर एकदम विश्वास ठेवू शकली असतीस की नाही...''

त्याने तिचा हात आपल्या हातात घेवून थोपटला आणि पुढे म्हणाला, '' म्हणून मी तुला हे सगळं हळू हळू ... हे या गुहेतलं सगळं दाखविल्यानंतर, म्हणजे तुला ही टाईम, स्पेस आणि दुसऱ्या जगाची थिअरी पुर्णपणे कळल्यानंतर सांगण्याचं ठरविलं होतं''

आता ते हातात हात घेवून हळू हळू त्या गुहेत चालू लागले होते.

'' माझं मला माहित की मी हे तुझ्याशिवाय सगळे दिवस कसे काढू शकली... तुझ्याशिवाय आणि तरीही तुझ्यासोबत'' स्टेला म्हणाली.

'' मी तुझ्या भावना समजू शकतो... तरीही मला कुठेतरी वाटतच होतं की तु सत्य एक दिवस जाणशीलच'' जाकोब तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला.

तेवढ्यात 'धप्प' अचानक एक मोठा खडक त्यांच्या समोर येवून पडला. त्या खडकाचे पडल्याबरोबर तूकडे होवून इकडे तिकडे विखूरले होते. घाबरुन आणि दचकून ते दोन पावलं मागे सरकले.


क्रमश:...


Famous proverbs -

One who sits between two chairs may easily fall down.

--- Proverb from Romania and Russia


Marathi katha, Marathi stories, Marathi gatha, Marathi books, Marathi novels, Marathi vangmay, Marathi wangmay, Marathi sahitya, Marathi writtings, Marathi writers, Marathi movies, Marathi songs

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network