Marathi kadambari - Novel - ELove : CH-16 आधार

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous quotes

Man is constantly in search of something unknown, and when he feels, he got it, probably he is in love.

--- Unknown


हॉटेलचा सुईट जसजसा जवळ येवू लागला एका अज्ञात भावनेने अंजलीच्या हृदयाची गती वाढू लागली. एका अनामिक भितीने जणू तिला ग्रासले होते. विवेकही जरी तिच्या मागे मागे चालत होता पण त्याला त्याच्या श्वासांची गति विचलीत झालेली जाणवत होती. अंजलीने हॉटेलच्या सुईटचा दरवाजा उघडला आणि आत गेली.

विवेक दरवाजातच अडखळल्यासारखा उभा राहाला.

'' अरे येकी आत ये ना'' अंजली त्यांच्यात निर्माण झालेली एक, असहजता एक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

'' बस '' अंजली त्याला बसण्याचा इशारा करीत म्हणाली आणि तिथे कोपऱ्यात ठेवलेला फोन उचलण्यासाठी त्याच्या शेजारीच बसली.

अंजलीने विवेकच्या शेजारी ठेवलेला फोन उचलण्यासाठी हात समोर केला आणि म्हणाली, '' काय घेणार थंड की गरम''

फोन उचलता उचलता अंजलीच्या हाताचा पुसटसा स्पर्ष विवेकला झाला होता. त्याचं हृदय धडधडायला लागलं. अजलीलाही तो स्पर्श सुखावह आणि हवाहवासा वाटला होता. पण चेहऱ्यावर तसं काहीही न दाखविता तीने ऑर्डर देण्यासाठी फोनचा क्रेडल उचलला.

फोनचा नंबर डायल करण्यासाठी तिने दुसरा हात समोर केला. यावेळी त्या हाताचाही विवेकला स्पर्ष झाला. आतामात्र विवेक स्वत:ला रोखू शकला नाही त्याने अंजलीने फोन डायल करण्यासाठी पुढे केलेला हात हळूच आपल्या हातात घेतला. अंजली त्याच्याकडे पाहून लाजून गालातल्या गालात हसली. तिला तो हात त्याच्या हातातून सोडवून घेववेना. जणू तो हात सुन्न झाला होता. त्याने आता तो तिचा हात घट्ट पकडून ओढून तिला आपल्या आगोशात घेतले होते. सगळ कसं पटापट घडत होतं आणि ते अंजलीलाही हवंहवसं वाटत होतं. तिचं अंग अंग गरम झालं होतं आणि ओठ थरथरायला लागले होते. विवेकनेही आपले गरम आणि अधीर झालेले ओठ तिच्या थरथरत्या ओठांवर टेकवले. अंजलीचे एक मन म्हणत होते प्रतिकार करावा, पण दुसरे मन तर विद्रोही होवून सर्व मर्यादा तोडू पाहत होते. तो तिच्यावर हावी होत होता आणि तिची जणू त्राण गेल्यागत अवस्था झाली होती. विवेकने तिला पटकन आपल्या मजबुत आगोशात उचलून बाजुच्या बेडवर घेतले. तिला त्याच्या त्या उचलण्यात एक आधार देण्याची पुरुषी आणि हक्काची जाणीव दिसली की तिही काही प्रतिकार करु शकली नाही. किंबहुना तीच्याजवळ प्रतिकार करण्याची शक्तीच उरली नव्हती.

तिला त्याचा तो प्रश्न आठवला '' अंजली माझ्याशी लग्न करशील?''

आणि तिचे उत्तर आठवले, '' मी थोडीच नाही म्हणाले''

तिला आता त्याच्या बाहुपाशात एक सुरक्षीततेची जाणीव होवू लागली होती. तिही आता त्याच्या प्रत्येक भावनांना साद घालीत प्रतिसाद देत होती.

'' विवेक आय लव्ह यू सो मच'' तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

'' आय टू'' विवेक तिच्या गळ्याचे चुंबन घेत जणू तिच्या कानात म्हणाला.

हळू हळू त्याचा मजबुत पुरुषी हात तिच्या नाजूक शरीराशी खेळायला लागला. आणि तीही एखाद्या वेलीसारखी त्याला बिलगून जणू तिच्या भावी आयुष्याचा आधार त्याच्यात शोधत होती.

' हो मीच तुझ्या भावी आयूष्याचा आधार ... साथीदार आहे' या हक्काने आता तो तिच्या अंगावरचे एक एक कपडे काढू लागला.

' हो मीही आता सगळं तुला अर्पण करुन तुझ्या स्वाधीन करते आहे...' या विश्वासाच्या भावनेने अंजलीही त्याच्या अंगावरचे एक एक कपडे काढायला लागली.

अंजली अचानक दचकून झोपेतून जागी झाली. तिने बेडवर शेजारी बघीतले तर तिच्या शेजारी विवेक निर्वस्त्र अवस्थेत चादर अंगावर पांघरुन गाढ झोपी गेलेला होता. पण झोपेतही त्याचा एक हात तिच्या निर्वस्त्र अंगावर होता. इतक्या दिवसांत रात्री अचानक वाईट स्वप्नातून जागी झाल्यानंतर तिला प्रथमच त्याच्या हाताचा एक मोठा आधार वाटला होता.


क्रमश:..


Famous quotes

Man is constantly in search of something unknown, and when he feels, he got it, probably he is in love.

--- Unknown


Marathi books, Marathi novels, Marathi sahitya, Marathi quotes, Marathi words, Marathi dictionary, Marathi phrases proverbs, Marathi literature, Marathi library, Marathi katha, Marathi stories

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network