Inspirational thoughts -
If you can imagine it, you can achieve it; if you can dream it, you can become it.
William Arthur Ward
एक पोलिसांची गाडी येवून एका सायबर कॅफेसमोर थांबली. गाडीतून एक इन्स्पेक्टर एका चार पाच हवालदारांच्या टीमला लीड करत समोर चालू लागला. ते हवालदार त्याच्या पुढील आदेशाची वाट पाहत त्याच्या मागे मागे चालू लागले. इन्स्पेक्टर सायबर कॅफेत घूसला आणि त्याच्या मागे चार हवालदारही आत घूसले. प्रथम ते रिसेप्शन काऊंटरवर थांबले. रिसेप्शन काऊंटरवरील स्टाफ एकदम इतक्या पोलिसांना पाहून कावरा बावरा होवून उठून उभा राहाला.
'' यस सर... '' त्या स्टाफच्या तोंडून कसेबसे निघाले.
इन्स्पेक्टरने त्याच्याशी काहीही न बोलता त्याच्या समोर ठेवलेले लॉग रजिस्टर उचलले आणि आपल्या समोर घेवून ते बघू लागले.
'' काय झाले साहेब?'' तो स्टाफ पुन्हा हिम्मत एकवटून कसाबसा बोलला.
इन्स्पेक्टरने नुसते रागाने त्याच्याकडे पाहाले तसा तो चूपचाब बसला. इन्स्पेक्टर लॉगबुकमधील एक एक एन्ट्री बारकाईने बघू लागले. एका जागी इन्स्पेक्टरचं रजीस्टरवरुन धावतं बोट आणि त्याची बारीक नजर थांबली. त्या एन्ट्रीच्या नावाच्या जागी 'विवेक सरकार' असे लिहिले होते. इन्स्पेक्टर गालातल्या गालात हसला. त्याला ब्लॅकमेलरची सगळी खबरदारी घेवूनही तो आता पकडल्या जाणार या गोष्टीचं कदाचित हसू येत असावं. इन्स्पेक्टर त्या एन्ट्रीच्या समोरची सगळी माहिती वाचत म्हणाला,
'' सतरा नंबर कुठे आहे?''
'' या माझ्यासोबत मी तुम्हाला तिकडे घेवून जातो'' तो स्टाफ इन्स्पेक्टरला एकीकडे घेवून जात म्हणाला. तो सायबर कॅफे स्टाफ पुढे पुढे आणि इन्स्पेक्टर आणि चार हवालदार त्याच्या मागे मागे चालत होते.
चालता चालता एका जागी थांबून त्या स्टाफने एका बंद कॅबिनचा दरवाजा उघडला. सगळे पोलिस आता गुन्हेगाराला पकडण्याच्या तयारीत होते. पण कॅबिन उघडताच जेव्हा त्यांनी कॅबिनच्या आत बघितले, त्यांचे चेहरे आश्चर्याने उघडे ते उघडेच राहाले. कारण कॅबिन रिकामी होती. कॅबिनमधिल कॉम्प्यूटर सुरु होता पण कॅबिनमधे कुणीच नव्हतं. इन्स्पेक्टरने चारी हवालदारांना कॅफेमधे चारही बाजूस त्या गुन्हेगाराला शोधण्यास पाठविले.
इन्स्पेक्टर आणि चारही हवालदारांनी बराच वेळ सगळा कॅफे आणि कॅफेचा आजुबाजुचा परिसर धुंडाळला. पण त्यांच्या काहीच हाती लागले नाही. गुन्हेगार आता त्यांच्या तावडीत सापडणार नाही याची खात्री होताच इन्स्पेक्टरने मोबाईल लावला,
'' सर आय थींक वुई आर लेट बाय फ्यू सेकंड्स ... हि हॅज एस्केप्ड... आय ऍम सॉरी... आम्ही त्याला पकडू शकलो नाही''
इन्स्पेक्टर कंवलजीत मोबाईलवर बोलत होते आणि त्यांच्या आजुबाजुला अंजली, शरवरी आणि ते दोन कॉम्प्यूटर एक्स्पर्टस उत्सुकतेने काय झालं ते एकण्याचा प्रयत्न करीत होते.
'' शिट ... एस्केप्ड... '' इन्स्पेक्टर म्हणाले.
आणि एक क्षण काहीतरी विचार केल्यासारखं केल्यानंतर ते मोबाईलवर म्हणाले,
'' आता एक काम करा... तिथून त्याचे फिंगर प्रिट्स घ्या... ज्या कॉम्प्यूटरवर तो बसला होता त्याचे फोटोग्राफ्स घ्या... ऍन्ड सी द हिस्ट्री लॉग ऑफ द कॉम्प्यूटर''
'' यस सर '' तिकडून आवाज आला.
इन्सपेक्टरने मोबाईल डिस्कनेक्ट केला आणि निराशेने ते अंजलीकडे पाहत तिला काय बोलावे याची जुळवाजुळव करु लागले.
'' द ब्लडी बास्टर्ड हॅज एस्केप्ड...'' ते म्हणाले.
पण त्त्यांच्या हावभावांवरुन खोलीत उपस्थित सगळेजण हे आधीच समजून चूकले होते.
क्रमश:...
Inspirational thoughts -
If you can imagine it, you can achieve it; if you can dream it, you can become it.
---William Arthur Ward
Marathi library of books novels, Marathi fiction books ebooks, Free download of marathi books, Marathi new books on internet, read marathi on internet, Marathi free entertainment, Marathi song album
No comments:
Post a Comment