वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
कोपऱ्यावर उभा राहून गणेश सिगारेटचे दीर्घ झुरके मारू लागला. त्याला त्याच्या चित्ताला थोडी शांती लाभल्यासारखी वाटत होती. त्याच्या बाजूलाच अंधारात भिंतीच्या आडोशाला एक पोरांचा कळप सिगारेट ओढण्यात आणि गप्पा करण्यात गुंग होता. अंधाराचा फायदा घेऊन ते एखादया भूकेल्या लांडग्यासारखे मधुराणीच्या दुकानाकडेच पाहत होते. कदाचित इथे अंधार असल्यामुळे तिकडून हे लोक दिसत नसावेत. पण गणेश त्यांच्या बाजूलाच कोपऱ्यावर उभा असल्यामुळे त्याला सगळं दिसत होतं." ए राम्या जरा कनेक्सन देरे..." एकजण आपल्या तोंडात पेटविण्यासाठी सिगारेट ठेवून दुसऱ्याला म्हणाला.
दुसऱ्याने आपल्या तोंडातली पेटलेली सिगारेट त्याच्याजवळ दिली. त्याने ती पेटलेली सिगारेट आपल्या तोंडातल्या सिगारेटच्या टोकाला लावून दोनचार जोरात झुरके मारले आणि आपली सिगारेट पेटल्यावर त्याने राम्याला त्याची सिगारेट परत केली.
' कनेक्सन' समोरचा सगळा प्रकार पाहून गणेशला त्या शब्दाचे हंसू आले.
दीर्घ झुरके मारल्यामुळे गणेशची सिगारेट लवकरच संपली. त्याने पाकीटातून दूसरी सिगारेट काढून तिला आधीच्या सिगारेटच्या सहाय्याने पेटविले - म्हणजे कनेक्शन दिले. तो गालातल्या गालात हसला.
तेवढयात गणेशला कुणाचा तरी जोरजोरात ओरडण्याचा आणि भांडण्याचा आवाज आला.
" त्या ग्रामसेवकाच्या मायला... "
" मादर...द साला "
गणेशच्या नावानं कुणीतरी उध्दार करीत होता. त्याला एकदम धडकीच भरली. पहिल्याच दिवशी आपल्या नावाचा असा उध्दार ऐकून तो गोंधळून गेला. कदाचित आधीच्या ग्रामसेवकाच्या नावाने कुणीतरी शिव्या घालीत असावं असा त्याने विचार केला आणि ज्या दिशेने आवाज येत होता तिकडे पाहू लागला.
आधीच्या ग्रामसेवकाच्या नावानंच ओरडत असला पाहिजे तो...
नाहीतरी आधीच्या ग्रामसेवकाचं आणि गावकऱ्यांचं विशेष पटत नसल्याचं त्याच्या आजच्या बडबडीवरून तरी वाटत होतं... तिकडे समोर अंधार होता. कदाचित समोर बोळीच्या पलिकडे सरपंच्याच्या घराजवळ कुणीतरी भांडत असावं.
" साल्याचं झालं सुरू रामायण... " बाजूला उभ्या असलेल्या पोरांच्या घोळक्यातलं कुणीतरी बोललेलं गणेशला एकू आलं.
अजूनही ग्रामसेवकाच्या नावाने शिव्याची लाखोटी वाहल्या जात होती.
गणेशने विचार केला.
चला .... जाऊन तरी बघू काय भानगड आहे ते....
तो जिकडून शिव्यांचा आवाज येत होता तिकडे जायला लागला.
गणेशने बघितले की एक माणूस अंधारात उभा राहून ग्रामसेवकाच्या नावाने शिवीगाळ करीत होता. त्याने जरा जवळ जाऊन बघितले तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो सदा होता. सकाळी त्याचं सामान घेऊन त्याला सरपंचाकडे नेणारा सदा! त्याचा आपल्या डोळयावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या बोलण्याच्या ढबीवरून आणि हावभावाच्या तऱ्हेवरून असं जाणवत होतं की तो पिऊन टून्न झाला होता. गणेश त्याच्या दृष्टीपथात येताच त्याने आपला मोर्चा त्याच्याकडे ओळविला.
" हयो बगा ... हयो ग्रामसेवक ... सोताला काय समजतो... कोणी लाटसायेब लागून गेला ... याच्या मायला ... मले एस्टी स्टँडून सामान उचलाया सांगतो... मादर ..द. "
सरळ सरळ आपल्यावर शिव्यांचा वर्षाव होतांना पाहून प्रथम गणेश गोंधळला. त्याला आता कसे रिअॅक्ट करावे काही सुचत नव्हते. सदाचा त्याच्यावरचा शिव्यांचा वर्षाव सुरूच होता. आता मात्र गणेश सावरला. त्याचा रागाचा पारा आता वाढू लागला. त्या शिव्यांची तीव्रताच इतकी होती की त्याच्या तळपायाची आग मस्तकात भिनली. तो चवताळून सदाच्या दिशेने जायला लागला. त्याला आता त्याच्या कानशिलात मारण्याची घाई झाली होती. चालतांना रागाने त्याचं अंग पूर्ण गरम झाल्यासारखं जाणवत होतं. त्याचा चेहरा लाल झाला होता. ओठ थरथरत होते. हातपायसुध्दा थरथरत होते. एव्हाना तो रागाने सदाच्या पुढयात जाऊन पोहोचला होता. पण सदाच्या वागण्यात काही एक बदल नव्हता. त्याचे चवताळून जोरजोराने शिव्या देणे चालूच होते. त्याने मनाचा हिय्या केला. जे होईल ते होवो. आता मात्र याला चांगलं बदडायचं. एक जोरदार त्याच्या कानशिलात तो मारणार एवढयात मागून त्याच्या खांदयावर कुणाचा तरी हाथ विसावला. त्याने मागे वळून पाहिले. ते सरपंच होते.
" गणेशराव ... जरा इकडं बाजूला या "
सरपंच गणेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला एका बाजूला घेऊन गेले.
" आवो मघा ... सकाळीच जव्हा तुमी सांगितलं की यानं तुमाला माझ्या घरी आणलं ... तव्हाच मला शंका आली होती "
" का काय झालं ? " गणेशने गोंधळून विचारले.
" आवो हा सदया एकदा का पिला की त्याचा तोलच जातो... मंग त्याला काही समजत नाय... दिसभर मंग ज्याला भेटला त्याला शिव्या देत सुटतो "
" विचित्रच केस दिसते... " गणेश आपल्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाला.
" याचा काहीतरी बंदोबस्त का लावत नाही तुम्ही लोक... " तो पुढे रागाने म्हणाला.
" असं काय बोलता गणेशराव... तुमीच तर सकाळी म्हणाले होते की हा माणूस फार सज्जन दिसतो " सरपंच त्याची गंमत करीत म्हणाले.
" हो म्हणालो खरा ... पण एवढा सज्जन असेल असं मला नव्हतं वाटलं " गणेश जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.
क्रमश:...
You must be the change you wish to see in the world.
…Gandhi
tumhi kahanila kutha vegala valan deta tehi kalat nahi mast pudhe baghu waw
ReplyDeletechya mayala Sada chya. Pakka luccha nighala ki ho. Mi tycha pekatat lat ghalto mag sudharel lekacha
ReplyDeletetar sada asa ahe hoy. kahanitil ek ek patrache halu halu swabhav darshan chan prakare kele ahe
ReplyDelete