Literature on net - Madhurani - CH- 40 धब्बा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

-->Other marathi links

Literature on net - Madhurani - CH- 40 धब्बा
नेहमीप्रमाणे आजही दुपारी गणेश मोकळ्या वेळेत महादेवाच्या देवळात गेला. पण आज देऊळ सुनसान पाहून गणेशला आश्चर्य वाटलं. देवळात एकही पत्यांचा डाव नव्हता.
कदाचित आज गावात पोलीस आले असावेत...
गावात पोलीस आले की गावात पत्यांचे डाव बसत नसत. कुणी जर सापडलं तर पोलीस पकडून नेत किंवा पैसे घेऊन सोडून देत. इथे खेळण्यासाठीच पैशाची बोंब तिथे अजून पोलीसांना कुठून पैसे द्यायचे. नागपंचमीच्या दिवशी तर पोलीसांची दिवाळीच असायची. नागपंचमीच्या दिवशी तिकडे चावडीकडे चक्री, पत्ते असे जेवढे शक्य होतील तेवढे जूगाराचे प्रकार लोक खेळायचे. आणि त्या दिवशी तर हटकून पोलीस येत आणि भरपूर पैसे कमावून जात. जूगाराच्या बाबतीत, एवढं मागासलेलं गाव एवढं कसं काय समोर याचं गणेशला नेहमी आश्चर्य वाटायचं. एवढंच काय गावात तिकडे फलाटात मटक्याचाही अड्डा होता म्हणे. फलाट हा प्लॉटचा अपभ्रंश असावा. गणेश तिकडे अड्ड्यावर कधी गेला नव्हता पण इथे ना फोन ना इतर काही जलद दळ्णवळणाचं साधन मग इथे मटक्याचे नंबर कसे कळत असतील हेही कोडं त्याला कधी सुटलं नव्हतं.
आता देवळात आपली करमणूक पत्यांचा डाव तर नाही मग आता कुठे जायचं. दूपारी मधुराणीचं दूकान तर बंद रहायचं. दूपारी ती ओढ्यावर जात असे धूणं धुवायला. एकदा मधुराणीनंच त्याला सांगितलं होतं. गावातल्या बायका 4-4 5-5 जणींचा कळप करून ओढयावर धूणं धुवायला जात.
मग आपण ओढ्यावर जायचं का?...
पण तिथे सगळ्या बायकाच...
आपण काय करणार त्या बायकांत?...
अन् एखादीला जर काही शंका आली तर ती सगळ्या गावात आपली बोंब करेल...
दवंडी पिटवल्यासारखी...
बायका या बाबतीत फार वस्ताद असतात...
देवळापासून ओढा जवळच होता. इतका जवळ की कधी मोठा पूर जर आला तर देवळात पाणी घुसत असे.
पण गणेशला राहवेना. त्याला आता मधुराणीची कमीत कमी एक झलक तरी बघण्याची तीव्र इच्छा होवू लागली.
मग कसं करावं?...
जावं का?...
पण तसं नुसतं हात हलवत नको...
काहीतरी निमित्त करून गेलं पाहिजे...
काय निमित्त करता येइल?...
संडासला जाण्याचं निमित्त...
हे तर एकदम बेस्ट आहे...
कुणाला शंकाही येणार नाही...
गणेश ताबडतोब ऑफिसमध्ये परतला. पांडूला शेजारुन एक टमरेल भरुन आणायला सांगितलं. आणि टमरेल घेऊन तडक निघाला ओढ्याकडे.
" तिकडं वढ्यावर चालला व्हय?" पांडूने विचारले.
" हो.... का?" गणेशने विचारले.
" नाय मंग वढ्यावर काय जरुर हाय टमरेलाची" पांडू म्हणाला.
आता याला काय सांगावं?...
गणेशने बोलण्यासाठी तोंड उघडले. आणि मग काहीही न बोलता तो वळून सरळ ओढ्यावर निघाला.
पुलाकडे जाताजाता गणेशला एक चिखलातून भरुन उठलेली म्हैस रस्त्यात लागली. तो काळजीपूर्वक त्या म्हशीपासून सुरक्षीत अंतर राखून समोर गेला. त्याला आधीची एक म्हशीची गंमत आठवली. एक दिवस सकाळी सकाळी अंघोळ वैगेरे आटोपून स्वच्छ इस्तरीचे कपडे चढवून गणेश ऑफिसकडे निघाला होता. त्या दिवशी त्याला थोडा जास्त वेळ झाला होता. कुणी काही म्हणो किंवा नाही म्हणो गणेशला ऑफिसला वेळेवर जाणेच आवडत असे. वेळ झाल्यामुळे तो झपाझप आपली पावले टाकीत वेगाने चालू लागला. रस्त्यात त्याला एक म्हशीचा कळप लागला. दोघं म्हशीराखे त्या म्हशीच्या कळपाला कदाचित गावाच्या बाहेर चारायला नेत होते. म्हशीचा कळप एवढा होता की त्यामुळे सगळा रस्ताच जवळ जवळ बंद झाला होता. गणेश त्या म्हशीच्या कळपातून रस्ता काढत आपल्या ऑफिसकडे जाऊ लागला. अचानक एका म्हशीजवळून जातांना तिने चिखलात भरलेली शेपूट आपल्या अंगावर बसलेली माशी हाकलण्यासाठी जोरात हलवली आणि ती गणेश मधे आल्यामुळे त्याला लागली. त्याच्या शर्टवर एक मोठा नकाशा काढल्यासारखा धब्बा उमटला. गणेश एकदम गर्रकन ब्रेक लागल्यागत थांबला. तो रागाने कधी त्या म्हशीकडे तर कधी आपल्या शर्टवर पडलेल्या डागाकडे पाहत होता. गुराखे त्याची ती फसगत पाहून हसत होते. गणेश तसाच आपल्या खोलीकडे परत वळला होता - शर्ट बदलण्यासाठी.

to be continued...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network