Marathi kathanak - Madhurani Ch - 41 ओढ्यावर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English
गणेश पुलावर पोहोचला. पुलाच्या उजव्या बाजूला जास्त खडकाळ होतं आणि अधे मधे बरच खोल असावं त्यामुळे उजवीकडे कुणी बाया दिसत नव्हत्या. उजवीकडे एका जागी पोरं पोहत होती. मधूनच एखादं भोंगळं पोरगं ओढ्याच्या काठावर असलेल्या उंच खडकावर चढत असे आणि तिथून पाण्यात उडी मारत असे. त्याने उडी मारली की बाकीची पोरं श्वास रोखून पाण्याच्या खाली लपत. ज्याने उडी मारली तो पाण्याखालूनच एखाद्या पोराला शितत असे आणि मग त्याचा डाव. तो ही तसाच ओढ्याच्या काठावर असलेल्या उंच खडकावर चढत असे आणि तिथून पाण्यात उडी मारत असे. पोरांचा खेळ छान चालला होता. पुलाच्या डावीकडे ओढा उथळ आणि सपाट होता. तिथेच उथळ पाण्यात गणेशला बायकांचा झुंड च्या झुंड कपडे धुतांना दिसला. त्या उथळ पाण्याच्या काठावर मोठमोठे दगड ठेवून बायका आपले कपडे जोरजोराने त्या दगडावर आपटत धूत होत्या. असे धपा धप दहा पंधरा तरी कपडे आपटण्याचे आवाज येत होते. त्यातच काही बायका कपडे आपटतांना 'सु... सु' असा तोंडाने आवाज करीत. ते सगळे आवाज गणेशला एका विशिष्ट सुरात गुंफल्यासारखे वाटत होते. त्या बायकांच्याच आजूबाजूला त्या बायकांची छोटी छोटी पोरं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत तर कधी पाण्यात छोटे छोटे दगड फेकत. त्यातलंच एक थोडं मोठं पोरग आडव्या हाताने त्या पाण्यात दगड फेकत असे आणि तो दगड मग एखाद्या बेडकाने उड्या माराव्या तसं पाण्यात उड्या मारल्यासारखा दिसत असे.
पुलावरून डाव्या बाजूला खाली ओढ्यात उतरता उतरता गणेशची भिरभिरती नजर त्या बायकांच्या कळपात मधुराणीला शोधू लागली. पिवळ्या साडीत त्याला मधुराणी दूर तिकडे ओढ्याच्या पलिकडच्या तिरावर दिसली. गणेशचा रस्त्याही ओढ्याला ओलांडून पलिकडच्या तिरावर जात होता. तो आपला पँट वर धरुन त्या उथळ पाण्यातून ओढा ओलांडू लागला. एका हातात टमरेल आणि दुसऱ्या हाताने पँट वर धरणे त्याला जड जात होते. रस्त्यात मध्ये मध्ये त्या उथळ पाण्यात पाय ठेवण्यासाठी दगड ठेवलेले होते. तर काही जागी ओढ्यातलाच खडक पाण्याच्या वर आलेला होता. एका खडकावर उभं राहून गणेशने टमरेल एका बाजूला ठेवले आणि तो आपला पँट वर खोसू लागला. पँट खोसता खोसता त्याला त्या उथळ पाण्यात गिरक्या घेणारे छोटे छोटे मासे दिसत होते. गुडघ्यापर्यंत पँट खोसून तो पुन्हा पाण्यात उतरला. पाण्यात उतरताच त्या खडकाजवळ आलेल्या मास्यांचा कळप भीतीने एकदम दूर पळून गेला. जसं जसं तो समोर जाऊ लागला पाणी थोडं खोल होतं. पुढे पुढे तर पाणी गुडघ्यापर्यंत होतं. तो शक्य तेवढे तळपाय उंचावून त्या पाण्यातून पुढे जाऊ लागला. एकदाचा तो पलिकडच्या तिरावर पोहोचला. न भिजण्यासाठी एवढे प्रयत्न करूनही त्याच्या खोसलेल्या पॅंटच्या कडा भिजल्याच होत्या. ओढ्याच्या पलिकडच्या तिरावर पोहोचताच त्याने पुन्हा आपले टमरेल एका दगडावर ठेवून आपला वर खोसलेला पँट खाली सोडला. त्याने पुन्हा एकदा मधुराणीकडे नजर टाकली. ती त्याच तिरावर धुणं धुत होती पण तिथून 100 एक मिटर दूर, इतर बायांच्या कळपापासून वेगळीच एकटी कपडे धूत होती. तिचं लक्ष इकडे गणेशकडे नव्हतं. गणेश टमरेल उचलून पुन्हा तिच्याकडे चालायला लागला.
जशी मधुराणी जवळ आली त्याने बघितले की ती अजूनही आपल्यातच गुंग अशी कपडे धूत होती. तीचं कुठेच लक्ष नव्हतं. धुणं धुतांना आपली साडी पाण्याने भिजू नये म्हणून तिने ती गुडघ्याच्या बरीच वर पर्यंत खोसलेली होती त्यामुळे तीचा मांड्यापर्यंतचा भाग दिसत होता. गणेश तिचा मांसल, नितळ, पिवळसर गोरा मांड्यापर्यंतचा भाग प्रथमच पाहत होता. आणि कपडे आपटतांना तिचा घुसळणारा ब्लाउजच्या गळ्यातून डोकाऊ पाहणारा उरोजांचा भाग त्याला वेडं करून सोडत होता. तो मंतरल्यासारखा तिच्याकडे चालत होता. तो अगदी तिच्या जवळ जाऊन पोहोचला तशी तिला चाहूल लागली असावी. तिने कपडे आपटणं थांबवून वर तोंड करून गणेशकडे बघितलं. गणेशची अन् तीची नजरानजर होताच तिने पटकन हसून लाजल्यासारखं करून आपली वर खोसलेली साडी सोडली आणि आपला पदर नीट केला. तो आला म्हणून आपण असं केलं असं न दाखवत तिने बाजूच्या बादलीतले ओले कपडे घेतले आणि ती ते पिळू लागली. पिळतांना तिरप्या नजरेने हसत हसत ती गणेशकडे पाहत होती. गणेश तिच्या जवळ येऊन थबकला. दोन क्षण कुणीच काही बोललं नाही. मग गणेशच काहीतरी बोलायचं म्हणून बोलला " अच्छा इथे येत असते तू कपडे धुवायला"
" काय करणार तुमच्या शहरातल्यासारखा नळ थोडाच हाय इथं" ती कपडे पिळता पिळता एका हाताने आपल्या चहऱ्यावर आलेले केस सारखे करीत म्हणाली. गणेश अजूनही तिथे थांबून एकटक तिच्याकडे पाहत होता. एकदम भानावर येऊन त्याने आपली नजर चहुकडे फिरविली. बाकीच्या कपडे धुणाऱ्या बाया खोचक नजरेने त्याच्याकडे पाहत आहेत असे त्याला वाटले म्हणूने तो पुढे चालू लागला.
इथं थांबनं काही बरं नव्हे...
थोडं पुढं गेल्यावर चालता चालता त्याने एकदा वळून मधुराणीकडे बघितले. ती तो पिळलेला कपडा बाजूला रेतीवर वाळू घालत होती. तरीही तीची तिरपी नजर मधून मधून त्यालाच हेरत होती.
खरंच एवढी सुंदर. धडाडीची मधुराणी चूकीच्या ठिकाणी पडली...
किंवा चूकीच्या ठिकाणी जन्माला आली...
ती आज शहरात असती तर कुठल्या कुठे राहाली असती...
काय एखाद्याचं नशिबचं....
गणेश चालता चालता विचार करीत होता. तिथून बरेच दूर निघून गेल्यावर पुन्हा एकदा त्याने वळून बघितले. ती पुन्हा आपली साडी गुडघ्याच्या वरपर्यंत खोसून कपडे जोरजोराने समोरच्या दगडावर आपटत होती. पण तो आता बराच दूर निघून आला होता. त्याला मधुराणी तेवढी स्पष्ट दिसत नव्हती. ती आता पुन्हा कपडे धुण्यात गुंग दिसत होती. कदाचित तिरप्या नजरेने आपल्याकडेच पाहत असावी.

क्रमश:


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. Next chapter please...

    Tumchya kadambaricha vishay, theme ajun clear nahi zali.. But keep it up... U r d same writer of E-Love which was quite touchy... So we wait more quality writing from U.

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network