Marathi books world - Madhurani CH-57b तो म्हातारा कोण?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi books world - Madhurani CH-57b तो म्हातारा कोण?


मग भाषणांची झड सुरु झाली. मधुराणीसोबत स्टेजवर गेलेले नेते अधाश्यासारखे भाषणांवर भाषणं ठोकत होते. जसा त्यांना हा चांगलाच चान्स मिळाला होता. भाषण सुरु असतांना मधेच एखाद्या वाक्यावर मधुराणीचेच कार्यकर्ते टाळ्या वाजवत. आणि त्यांनी टाळ्या वाजविल्या की मग लाजेखातर का होईना बाकीची पब्लीक टाळ्या वाजवत असे. ते टाळ्या वाजविणारे कार्यकर्ते सुध्दा त्यांना नेमुन दिलेल्या कामाचाच भाग म्हणून की काय मधे मधे न चूकता टाळ्या वाजवत आणि मग बाकी पब्लीकही टाळ्यांचा कडकडाट करीत असे. भाषणांच्या फैरीवर फैरी चालू होत्या. मधुराणीचे भाषण मानाच्या स्थानावर म्हणजे सगळ्यात शेवटी होते.
गणेशरावला तेच ते रटाळ त्या लोकांची भाषणं ऐकण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते. त्यांनी एक जांभाळी देत आपल्या आजूबाजूच्या लोकांवर एक नजर फिरविली. तिकडे एका जागी त्यांना एक म्हातारा ओळखीचा असल्यासारखा वाटला. गणेशराव आठवण्याचा प्रयत्न करु लागले की या माणसाला आपण कुठे पाहाले?. त्या माणसाचे लक्षही गणेशरावकडे गेले. त्यांची नजरानजर झाली. पण त्याने चटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. गणेशराव आता त्या माणसाच्या जवळ जायला लागले. त्या माणसाने तिरप्या नजरेने गणेशरावला आपल्याकडे येतांना पाहले. एव्हाना गणेशराव त्या माणसाच्या शेजारी जाऊन त्याच्याकडे पाहत त्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न करु लागले.
" तुम्हाला कुठेतरी पाहल्यासारखे वाटते...? " गणेशरावने प्रश्नार्थक नजरेने पाहत त्या माणसाला विचारले.
" गणेशरावनं तुमी?..." त्याने विचारलेे.
" हो .... पण आपण कोण?" गणेशरावने विचारले.
" म्या उजनीचा..." तो म्हातारा म्हणाला.
भराभर एकामागे एक अशी दिवंगत स्मृतीतील चित्र गणेशरावच्या डोळ्यासमोरुन गेली आणि त्यांना मग उलगडा झाला...
अरे हा तर मुकीचा बाप....
पांडूरंग ... नाही पांडूरंग तर मुक्याचा बाप...
हा बहुत्येक रघुजी...
" हो ... हो... आता ओळखलं मी तुम्हाला" तो आपली अजून ओळख देण्याच्या आधी गणेशराव पटकन म्हणाले.
" कसं काय बरं आहे?" गणेशरावने त्याची विचारपुस केली.
" हो... बरंच मनायचं... दोन टायमाचं खायला प्यायला भेटते ... आजून काय फायजे ... आमच्यासारख्या गरीब माणसास्नी" तो एक सुस्कारा टाकत म्हणाला.
गणेशरावला ज्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा होती ते उत्तर गणेशरावला मिळालं नव्हतं.
म्हणून अजून स्पष्टपणे गणेशरावने विचारले, " कसं काय चाललं तुमच्या मुलीचं?"
" मुलीचं?" तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.
" म्हणजे... मुकीचं" गणेशराव अजून स्पष्टपणे म्हणाले.
गणेशरावला मुकीचं नाव माहित नव्हतं. सगळा गाव तिला मुकी या नावानेच ओळखत असे.
त्याने एक आर्त नजर गणेशरावकडे टाकली. आणि तो स्तब्धपणे स्टेजकडे पाहू लागला. कदाचित तो आपल्या भावना लपविण्याचा प्रयत्न करु लागला.
गणेशराव विचार करु लागले.
आपण चूकीचा प्रश्न तर नाही ना विचारला?...
उगीच आपण बिच्याऱ्याच्या दुखत्या रगीवर हात ठेवला...
" माफ करा... मला काही कल्पना नव्हती म्हणून मी आपलं सहजच विचारलं..." गणेशराव त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाले .
पुन्हा त्या म्हाताऱ्याने गणेशरावकडे पाहिले. यावेळी गणेशरावला त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या दिसल्या.
तो पुन्हा स्टजकडे पाहत म्हणाला, "' सायेब ... तिचं नशिबच खोटं... दुसरं काय..."
आता हा विषय सुरु केला ही चूकच केली ...
पण मधे असा सोडलेला बरं दिसणार नाही....
" का? काय झालं...? " गणेशरावने विचारले.
" त्या भोसडीच्या मुक्यानं लगीन केल्यावर आमी तिला ... दुसरा नवरा पाहून देला होता..." त्याचा बोलतांना गळा भरुन आल्यासारखा वाटत होता.
मुकीचा बाप थोडा थांबला. गणेशरावही तो पुढे काय सांगतो याची वाट पाहू लागले.
" तिचं लगीनबी ठरीवलं होतं... म्या आमचं शेतबीत इकून चांगल्या बक्कम हूंड्याची यवस्था केली होती... पर..." तो म्हातारा म्हणाला.
गणेशच्या डोक्यात सगळ्या शक्यता डोकावून गेल्या...
पण...
पण काय झालं?...
त्या नवऱ्या मुलानेसुध्दा तिचा अव्हेर केला की काय?...
" पर ... जसं तिलं कळलं तसं तिनं अन्नपाणी सोडून देलं.. 15 दिस तिनं अन्न नाय घेतलं का पाणी नाय पिलं... ज्या दिशी तिचं लगीन ठरीवलं होतं त्याच्या आदल्या दिशीच ती गेली ... आमाला सोडून गेली ... सुटली बिचारी...." तो म्हातारा आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाला.
" काय? गेली? ... सोडून गेली?... " गणेशराव आश्चर्याने म्हणाले.
पुढे गणेशरावला त्या म्हाताऱ्याला काहीच विचारण्याची हिम्मत झाली नाही. तो म्हातारा अजूनही स्टेजकडे पाहत होता. कदाचित आपल्या अनावर झालेल्या भावना लपवीत.
बिचारी मुकी...
खरोखर तिचं खूप प्रेम असावं त्या मुक्यावर...
असं लोकांनी त्यांच्या प्रेमाच्या आड यायला नको होतं....
तसा त्यांना काय अधिकार होता?....
गणेशरावने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. थोपटल्यासारखे केले. आणि ते तिथून जड पावलांनी निघून गेले.
क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. khop chan aahe madhurani
  kamle tar teche ek kalpana chitra dhkhwa jase techya rupache varnan kele aahe tyaprmane ..

  khop intersting aahe ha pan kadmbari ek secrial banu shakte chan

  ReplyDelete
 2. when will be the new post ??? waiting for it ...

  ReplyDelete
 3. sir ,
  bassssss ata dollaya tun pani ye ahe TI GAVAKADCHI MANSE ATHAUN kharach

  ReplyDelete
 4. bichari kiti bin nashibi hoti ti muki tine itk prem kel nd tyabadlyat tila kay milal.....

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network