Marathi fiction - Mrugjal- CH 2 भिरभिरती नजर

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Marathi fiction - Mrugjal- CH 2 भिरभिरती नजर


राजेश, त्याची बायको कमल, आणि त्याचे बाकीचे कॉलेजचे मित्र यांच्या गृपमधून ( Group ) प्रिया दुसऱ्या एका बायांच्या गृपमधे गेली तसा लॉनच्या ( Lawn ) प्रवेशद्वारातून विजय आत आला. त्याच्या सोबत त्याचे कुटूंब म्हणजे आई आणि बहिणही आली होती. त्याची आई म्हणजे एक जेमतेम शिकलेली वयस्कर बाई होती. आणि बहिण त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि स्वभावाने लाजाळू आणि अंतर्मुख होती. विजय आत आल्याबरोबर त्याची भिरभिरती नजर लॉनमधे इकडे तिकडे फिरु लागली. राजेशचं त्याच्याकडे लक्ष होतं. पण त्याला माहित होतं की त्याची भिरभिरती नजर कुणाला शोधत असावी. राजेश आपल्या गृपकमधील एका मित्राकडे पाहून गुढपणे हसला. तसं संपुर्ण गृपचं लक्ष विजयकडे गेलं. त्यांच्याही चेहऱ्यावर एक गुढ हास्य पसरलं. अजुनही त्याची भिरभिरती नजर इकडे तिकडे फिरत होती. त्याची भिरभिरती नजर इकडे तिकडे फिरत असतांनाच राजेशच्या गृपमधील एक मुलगा हात वर करुन म्हणाला -

"" इकडे... इकडे ये बाबा ... आम्ही इकडे आहोत...''

गृपमधील अजुन दुसरा मुलगा खोचकपणे त्याला म्हणाला, '' आणि ज्याला तु शोधत आहेस ते सत्कारमुर्ती राजेश इकडे आपल्या प्रतिक्षेत उभे आहेत''

विजयची भिरभीरती नजर नाईलाजानेच राजेशच्या गृपवर येवून थांबली आणि तो आपल्या आईला आणि बहिणीला घेवून राजेशच्या गृपकडे आला.

"" ये बाबा तुला शंभर वर्ष आयुष्य आहे... तुझ्याच गोष्टी चालल्या होत्या'' एकजण म्हणाला.

"" पण साल्या कधीतर टायमींग ( timing ) साधत जा'' एक जण त्याची फिरकी घेण्याच्या उद्देशाने म्हणाला.

"" का बाबा काय झालं? '' विजयने त्याचा रोख न उमजून विचारले.

"" अरे आत्तापर्यंत ती इथेच होती'' राजेश त्याच्या कानाशी जावून त्याच्या आईच्या तेथील उपस्थीतीचं भान राखून प्रियाकडे इशारा करीत हळूच म्हणाला.

विजयने राजेशने इशारा केला तिकडे चोरुन बघतले तर तिथे प्रिया उभी होती आणि तीही त्याच्याकडेच पाहात होती. दोघांचीही नजरा नजर झाली. दोघंही गालातल्या गालात गोड हसले. पण विजयला हा मित्राचा गृप सोडून लगेच तिच्याकडे जाणं, आणि त्यातल्या त्यात ती लेडीज गृपमधे उभी असल्यामुळे, योग्य वाटलं नाही. आणि तिलाही सगळ्या लेडीजला मधेच सोडून त्याच्याकडे येणं योग्य वाटलं नसावं.

'' हा माझा खास मित्र विजय'' राजेशने आपल्या पत्नीशी त्याची ओळख करुन दिली.

'' हो ... हो लग्नात तु ओळख करुन दिली होतीस... माझं लक्ष आहे'' राजेशची बायको म्हणाली.

'' आणि ही माझी आई... ही माझी बहिण शालीनी.'' विजय प्रझेट्सचा बॉक्स राजेशच्या हवाली करीत म्हणाला.

राजशने तो बॉक्स बाजुला असलेल्या त्याच्या एका मित्राच्या हवाली केला आणि त्याने विजयच्या आईला वाकुन नमस्कार केला. त्याचं पाहून त्याच्या बायकोनेही विजयच्या आईला नमस्कार केला.

'' सुखी रहा'' विजयची आई दोघांच्या डोक्यावर प्रमळपणे हात ठेवत म्हणाली.

"" वडीलांना नाही आणलंस?'' त्यांच्या गृपमधील एकजण म्हणाला.

त्या मित्राने तो प्रश्न विचारला तसा हसता खेळता गृप एकदम गंभीर झाला. कारण जवळपास सगळ्यांनाच माहित होतं की विजयचे वडील जवळपास नेहमीच दारुच्या नशेत असत आणि विक्षिप्तपणे वागत असल्याने तो त्यांना शक्यतो कुठेही नेणे टाळत असे. तसा तो बहिणीच्या लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे आणि तिला कुणातही मिसळणे आवडत नसल्यामुळे तिलाही क्वचितच कुठे नेत असे पण आज त्याने खास राजेशच्या आग्रहास्तव त्याच्या बहिणीला रिसेप्शनला आणले होते. तिच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त असे बरीच काही कारणं होती की तो तिला कुठे नेवू शकत नसे पण ती कारणं तो कुणाला सांगुही शकत नव्हता. पण कुणी आग्रहच केला तर तो तिच्या स्वभावाचं कारण पुढे करीत असे. राजेशने तसा विजयला आपल्या वडीलांना आणण्याचा आग्रहही केला होता. त्याने त्याच्या वडीलांनाही रिसेप्शनला येण्याची विनंती केली होती. ते हो ही म्हणाले होते. पण राजेशला माहित होतं की ते येणार नाहीत. किंवा ते जरी यायला तयार झाले तरी विजय त्यांना येवू देणार नाही.विजयनेही विचार केला की वडील आणि बहिणीपैकी एकाला जरी नेले तरी राजेशच्या आग्रहाचा मान राखण्यासारखे होते. म्हणून त्याने त्यातल्या त्यात सोईस्कर असा बहिणीला इथे आणण्याचा मार्ग पत्करला होता. वातावरण गंभीर झालेले पाहून राजेशला काही सुचत नव्हते की पुन्हा वातावरण नॉर्मल ( normal ) कसे करावे. विजयच्या वडीलांबाबत त्याच्या मित्रमंडळीत सर्वांनाच कल्पना असतांना जो कोणी तसं बोलला होता तो कदाचित अनभिज्ञतेने बोलला असावा किंवा जाणून बुजून खोचकपणे बोलला असावा याची राजेशला कल्पना होती.

'' आई इकडे ये .... हे बघ विजयची आई आणि बहिण... तुला खुप इच्छा होतीना त्यांना भेटण्याची'' शेजारुन जाणाऱ्या आपल्या आईला आवाज देत राजेशने वेळ मारुन नेली होती.

राजेशची आई तिथे आली. त्यांची सगळ्यांच्या ओळखीचा, नमस्काराचा सोपस्कार आटोपला तसे राजेशच्या आईने विजयच्या आईला आणि बहिणीला तिथून बाजुला नेवून एका लेडीजच्या गृपमधे नेले. त्याच गृपमधे प्रिया होती, तीने विजयच्या बहिणीकडे पाहून स्मित केले आणि विजयच्या आईला नमस्कार केला.



क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

10 comments: