entertainment headline entertainment humongous entertainment
विजय आणि त्याचे मित्र ज्या दिशेने आवाज येतो आहे याचा अंदाज घेवून धावतच एका खोलीसमोर येवून पोहोचले. त्या खोलीतून अजूनही ओरडण्याचा आवाज येत होता. त्यांच्या मागे अजुनही बरेच लोक धावत आले होते. बरं झालं त्या अनुभवी वयस्कर लोकांनी अजूनही येवू पहाणारी लोकांची गर्दी ( crowd ) खालीच थोपवून धरली होती. नाहीतर अजुनच गोंधळच झाला असता आणि अनर्थही कदाचित. विजयने त्या रुमचा ( room ) दरवाजा ढकलून बघितला. पण तो आतून बंद होता. काही जण दरवाजा ठोठावयाला (knock) लागले. पण विजयजवळ तेवढा वेळ नव्हता. आणि वेळच अशी होती की तो कितीही संयमी असला तरी तो संयम या वेळी काही कामाचा नव्हता. त्याने त्याच्या एक दोन मित्रांना घेवून त्या दरवाज्यावर एकाच वेळी जोरदार धडक मारली तसा दरवाजाची आतली कडी ( Latch ) तुटून दरवाजा उघडला.
दरवाजा उघडला तसा विजयचे मित्र आणि त्यांच्या मागोमाग आलेले लोक एकाच वेळी खोलीत शिरुन तिथे गर्दी करु लागले. आतलं दृष्य ( scene ) पाहून विजयला आपल्या बहिणीला तिथे आणण्याचा पश्चाताप झाला होता. तर बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर, कुणाच्या चेहऱ्यावर भितीचे, कुणाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. आत एका कॉटवर ( cot / bed ) विजयची बहिण शालीनी एकटीच तडफडत होती आणि ओरडत होती. जणू कुणी अदृष्य व्यक्ती तिच्यावर जबरदस्ती करीत आहे अशी ती ओरडत होती. विजय आणि त्याचे मित्र आत आले तरी तिचं ओरडणं आणि किंचाळणं सुरुच होतं.
"" हलकट मेल्या ... सोड मला'' ती ओरडत होती.
विजय तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसा तिने तो झटकून दूर सारला. विजयचे मित्र आणि बाकीचे लोक गोंधळून मागे दूरच थांबले. विजयने आता तिच्या दोन्ही खांद्यांना धरुन तिला हलवले.
खोलीत आलेले सगळे जण कधी आश्चर्याने शालीनीकडे तर कधी विजकडे पाहत होते.
"" शालीनी... शुध्दीवर ये ... कुठाय बघ कुणीच नाही तिथे''
""विजू ... तो बघ तो नालायक ... माझ्यावर जबरदस्ती करतो आहे''
समोर कुणीच नव्हते. आत आलेल्या लोकांना तो सगळा प्रकार काय आहे काहीच कळत नव्हते. विजयने पुन्हा एकदा आपल्या बहिणीच्या खांद्यांना धरुन जोरजोराने हलवले. तेवढ्यात विजयची आई तिथे पोहोचली होती.
"" काय झालं बाळा?'' विजयच्या आईने तिला जवळ घेतले तशी ती ओक्साबोक्सी तिच्या कुशीत रडायला लागली.
"" आई बघ तो नालायक... मला फुस देवून आणलं त्यानी...''
"" बरं बरं बाळा ... आपण त्याला पोलिसात ( police / cops ) देवू'' विजयची आई शालीनीला थोपटत तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होती.
"" मी म्हटलंच होतं ... तिला घेवू नको म्हणून... प्रोग्रॅमचा ( program ) बट्याबोळ तर झालाच .. अन हे नसले ते धींडवडे निघाले ते वेगळेच '' विजय चिडून त्याच्या आईला म्हणाला.
तोपर्यंत प्रियाही तिथे पोहोचली होती. तिने विजयच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत केले आणि राजेशला त्याला बाहेर घेवून जाण्यास सांगितले. प्रियाही आता शालीनीच्या डोक्यावर हात फिरवीत ( sooth ) तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती.
"" औषध ( Medicine ) सुरु नाही का आजकाल?'' प्रियाने विजयच्या आईला दबक्या आवाजात विचारले.
"" काय सांगू पोरी ... ती घेतच नाही'' विजयची आई रडवेली होवून म्हणाली.
आत आलेल्या लोकांमधे आता तो विचित्र प्रकार पाहून चर्चा ( discussions ) सुरु झाली.
"" इथे तर कुणीच नाही... मग ती का ओरडत होती''
'' भूताटकीचा प्रकार तर नाही''
'' नाही काहीतरी भानामती किंवा मंत्रातंत्राचा प्रकार दिसतो''
'' काहीतरी अंधश्रध्देच्या गोष्टी करु नका शामराव ... तुम्ही इतके शिकले सवरलेले''
'' अहो इथे शिकण्या सवरण्याचा काही सबंध नसतो... मला सांगा याला भूताटकी नाही तर काय म्हणायचं... बघा ती पोरगी इथे येते आणि दरवाजाची कडी आपोआप आतून बंद होते '' शामराव म्हणाले,
काही जणांच्या नजरेत तिच्याबद्दल कुत्सीत तिरस्कार होता तर काही जणांच्या नजरेत तिच्याबद्दल सहानुभूती होती.
"" अरे वेडी आहे ती... दरवाजाची कडी तिनेच लावली असणार'' त्यातल्या त्यात समजदार एकजण म्हणाला.
"" वेडी नाही ... बिचारीला भास ( holucinations ) होत असावेत''
"" अहो असं काय बोलताय ....भास होतात म्हणजेच वेडीच की''
हे सगळं ऐकून विजयची आई चिडली होती.
"" प्लीज ( Please ) थोडं बाहेर होता का?'' प्रियाने तेथील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
तरी कुणी हलायला तयार नव्हते तेव्हा विजयची आई आधीच चिडलेली होती, ती ओरडली,
"" मेल्यांनो जरा बाहेर व्हाकी ... जरा तिला हवातर लागू द्या .. बघा किती घामेजली आहे माझी पोर''
ती ओरडल्याबरोबर तिही वेडीच असावी या अविर्भावात तिच्याकडे पाहात लोक चूप झाले आणि हळू हळू खोलीतून बाहेर पडू लागले.
क्रमश: ( continued... ) ....
It's really great suspence......pls post another blog
ReplyDeletebapre utsuktela vegala valan aale
ReplyDeleteplz post next blog as soon as possible,don't chk our patience,we r desp waiting.
ReplyDeletekhup bhyanak hot sare
ReplyDelete