Fiction book - Mrugjal - Ch 18

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Fiction book - Mrugjal - Ch 18

Quote of the day: Some folks are wise and some are otherwise.
....Tobias Smollett

परिक्षेचे दिवस जवळ आले तसे वर्गातले काही जण जोमाने अभ्यासाला लागले तर काही जणांची चांगलीच तारांबळ उडाली होती. विजय, प्रिया आणि राजेशही जोमाने अभ्यासाला लागले.ते तारांबळ उडणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांचा आधीपासूनच रेग्यूलर आणि विजयच्या प्लॅनिंगप्रमाणे अभ्यास सुरु असल्यामुळे तो झालेला होता. आता फक्त आवश्यकता होती ती रिवीजनची. आणि मुख्य म्हणजे त्यांना जाणिव होतीकी बारावीचं वर्ष म्हणजे जिवनाला एक वळण देणारं वर्ष असतं.

बारावीची परिक्षा म्हणजे मोठी गंमत असते मुलांच्या कर्तुत्वाची खरी परिक्षा या परिक्षेच्या दिवसांतच होत असते. म्हणजे एरवी जे कर्तुत्व लपवण्यास वाव असतो तो यावेळी नसतो. या परिक्षेच्या निमित्ताने सगळ्यांना आपापली जागा कळत असते. एक दिवस अभ्यास करुन कंटाळा आल्यानंतर विरंगुळा म्हणून विजय, राजेश आणि प्रियांच्या गोष्टीत तो विषय निघालाच.

'' अरे शाम्या ड्रॉप घेणार आहे म्हणे'' राजेश म्हणाला.

'' चांगली पळवाट आहे... झाकली मुठ सव्वा लाखाची.. पण ती मुठ झाकुन झाकुन अशी किती दिवस झाकली राहाणार.. एक दिवस तरी पितळ उघडं पडणारं'' विजय म्हणाला.

'' अरे .. त्याचा अभ्यास झाला नसेल.. त्या दिवशी त्याचे वडील आले होते आमच्याकडे... म्हणत होते शामला यावेळी तब्येतीने हवी तशी साथ दिली नाही '' प्रिया

'' काय झालं त्याच्या तब्बेतीला... चांगले दंड दाखवत हल्यासारखा पोरींच्या मागे फिरत असतो की सगळा वेळ..'' राजेशने टोमणा मारला.

'' पण पुढच्या वर्षी मिरीट येणार आहे असे ठामपणे त्याचे वडील सांगत होते'' प्रिया म्हणाली.

'' काय लोक असतात .. आत्तापर्यंत कोणत्याही वर्गात त्याने कधीही 60 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले नाहीत... अन आता डायरेक्ट मिरीट येणार आहे..'' राजेश उपाहासाने म्हणाला.

'' खरं म्हणजे यात पालकांचंच चुकतं... आपल्या मुलाची कुवत ओळखुन त्याच्याकडून तेवढीच अपेक्षा ठेवावी'' विजय म्हणाला.

'' मग तुला माझ्यात किती कुवत वाटते?'' प्रिया त्याची लगट करीत म्हणाली.

'' कुवत ही पालकांनी ओळखायची असते... मित्रांनी नाही... '' विजय तिची गंमत करीत म्हणाला.

'' मी सांगतोना तुला मेडीकलला नक्कीच ऍडमिशन मिळेल... विजयचा तर प्रश्नच नाही ...वाजणार आहे ते फक्त माझंच... ऍग्रीकल्चरला जरी ऍडमिशन मिळाली तरी पुष्कळ झालं'' राजेश निराशेने म्हणाला.

'' आता हे बघ.. हा स्वत:ला नेहमी किती कमी लेखतो... राजा हाच तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे'' विजय म्हणाला.

'' अरे तुच तर म्हणाला ... आपण आपली कुवत ओळखुन असावं.. '' राजेश म्हणाला.

'' आपण आपली नाही म्हणालो .. आपल्या पालकांबद्दल बोललो मी...'' विजय म्हणाला.

'' बरं जाऊदे... अजुन कोण कोण ड्रॉप घेणार आहे?'' राजेशने पुन्हा तोच विषय काढला.
मग प्रियाकडे पाहत पुढे म्हणाला, '' आतल्या गोटातली खबर काय म्हणते?''

त्याचा इशारा मुलींमध्ये काय चर्चा सुरु आहे याकडे होता.

'' ते परिक्षा सुरु झाल्याशिवाय समजणार नाही... कारण पोरी जरा अश्या बातम्या शक्य तेवढ्या लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात... मुलांसारख्या छातीठोकपणे सगळीकडे सांगत मिरवत नाहीत... आणि ड्रॉप घेणं म्हणजे काय फार कठिण गोष्ट आहे ?... एक पेपर ड्रॉप केला की झाला ड्रॉप...'' प्रिया म्हणाली.

'' तु तर एवढ्या सहजतेने म्हणतेस .... असं तर नाही ना की तुझाही ड्रॉप घ्यायचा विचार आहे?'' विजय गमतीने म्हणाला.

'' बघूया'' प्रिया खांदे उडवित म्हणाली.

'' ए वेडाबाई... खरं बोलते की काय?'' विजय म्हणाला.

ती एवढ्या सहजतेने म्हणाली की विजयला एक क्षण तिच्या मनात ड्रॉपबद्दल तर विचार घोंगावत नाहीत असं वाटून गेलं.

'' अरे नाही.. तु असल्यावर मला ड्रॉप घ्यायची काय गरज.. तसा तुझ्यामुळे माझा अभ्यासही तसा चांगलाच झाला आहे'' प्रिया म्हणाली.

'' अभ्यास हा कुणामुळे कुणाचा होत नसतो... तो ज्याचा त्यालाच करावा लागतो'' विजय म्हणाला.

'' नाही पण तुझ्या प्लानींगनुसार जर आम्ही चाललो नसतो तर कदाचित आमची आता तारांबळ उडाली असती बघ...'' प्रिया.

'' हो प्रिया ... हे मात्र तुझं एकदम बरोबर आहे... अभ्यास करण्यापेक्षा तो कसा करावा हे फार महत्वाचं असतं'' राजेश.

'' अरे काही नाही... जिवनात सगळ्या लढाया ह्या आपल्या आपल्यालाच लढायच्या असतात... हे ज्याने ओळखलं तो जिवनात समोर जात असतो'' विजय.

'' प्रिया... आजकाल तुला नाही वाटत हा जरा जास्तच फिलॉसॉफरसारखा बोलतोय'' राजेश म्हणाला.

'' अरे फिलॉसॉफरच आहे तो...'' प्रिया अभिमानाने बोलल्यासारखी म्हणाली.

'' ए त्या पिंकीचं अन संज्याचं काय चाललं असतं आजकाल?'' राजेशने आता आपला मोर्चा जरा नाजुक विषयाकडे वळवला. .

'' दोघं जरा जास्तच जवळ आलेले दिसतात... सोबत फिरतात काय.... बगिचात भेटतात काय..'' विजय म्हणाला.

'' अरे ते प्रेम करतात एकमेकांवर...'' प्रिया म्हणाली.

'' प्रेम ... कसलं डोंबलाचं प्रेम... आता परिक्षा तोंडावर आली असतांनाच कसं सुचतं त्यांना हे... समोर दत्त म्हणून परिक्षा उभी राहाली आहे आणि त्यांना आपली खरी जागा कळली असणार आता... जे वास्तविकतेला सामोरं जावू शकत नाहीत ते प्रेमासारख्या अश्या स्वप्नाळू दुनियेत रमतात... '' विजय म्हणाला.

'' पहा पुन्हा फिलॉसॉफर'' राजेशने हटकले.

'' याचं आणि प्रेमाचं काय वाकडं आहे काही कळत नाही.. प्रेमाचा विषय निघाला की हा त्याच्या विरोधात बोललाच पाहिजे...'' प्रिया म्हणाली.

'' जेव्हा स्वत: प्रेमात पडेल तेव्हाच याला प्रेमाचं महत्व कळेल'' राजेश म्हणाला.

'' वाट पहा... त्याची दुरदुरपर्यंत तरी काही शक्यता दिसत नाही'' विजय म्हणाला.

'' स्वत:वर एवढा ठाम विश्वास?'' राजेश.

'' जगात एकच तर गोष्ट असते ज्यावर आपण पुर्णपणे विश्वास ठेवू शकतो ... आणि ती म्हणजे स्वत:'' विजय.

'' हे मात्र तु बरोबर बोललास... स्वत:वर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडून काय विश्वासाची अपेक्षा करणार'' प्रिया.


क्रमश:...

Quote of the day: Some folks are wise and some are otherwise.
....Tobias Smollett

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. phar chhan aahe hi kadambari pudhache bhaag lavkar yeu det.

  ReplyDelete
 2. Pls post next chapter soon

  ReplyDelete
 3. rajesh yaar aapli ekach condition aahe abhyasachi...

  ReplyDelete
 4. मला वाचनाची खूप आवड आहे... आणि मला समजत नव्हते कि ती आवड कशी पूर्ण करावी मी नेत वर online book reading असे मी google वर SEARCH केले तेव्हा आपली site मिळाली आणि मी आता "मृगजळ" हि कादंबरी वाचत आहे आणि मला खरचं हि कादंबरी खूप आवडली आहे दररोज वेळ केव्हा मिळेल आणि मी केव्हा वाचेन असे होते...खरचं तुम्ही खूप चं लिहिता.....

  ReplyDelete
 5. Vijay bachke... premat padshil

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network