Fiction Online - Mrugjal - Ch -17

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Fiction Online - Mrugjal - Ch -17

Quote of the day : Wisdom stands at the turn in the road and calls upon us publicly, but we consider it false and despise its adherents.
... Khalil Gibran

विजय समोर आला आणि दार उघडण्यापुर्वी तिथेच घुटमळल्यागत थांबला.
बाहेरुन राजेशचं दार वाजवणं सुरुच होतं.
विजयने प्रथम स्वत:चा दम लागल्यागत श्वासोच्छवास व्यवस्थीत करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने आपले केस व्यवस्थीत केले आणि मग दार उघडले.

दार उघडलं तसा राजेश चिडून म्हणाला, '' काबे इतका वेळ?''

'' अरे विज गेलेली आहे'' विजय म्हणाला.

'' ते मलाही दिसतं आहे... विज रस्त्यानेही नाही आहे... एकाला तर धडक बसता बसता वाचली'' राजेश म्हणाला.

विजय काहीच बोलला नाही.

'' अन प्रिया कुठे गेली? '' राजेश आत येत म्हणाला.

'' ती आत मेणबत्ती आणायला गेली आहे'' राजेश म्हणाला.

विजय जेवढं विचारलं तेवढंच बोलत होता ही गोष्ट राजेशच्या लक्षात आल्यावाचून राहाली नाही. पण त्याने तसे काहीच दर्शवीले नाही. तेवढ्यात आतून प्रिया मेणबत्ती घेवून बाहेर आली.

'' विज जावून तर तसा बराच वेळ झाला... इकडे विज आत्ताच गेली की काय?'' राजेशने प्रियाला विचारले.

राजेशच्या प्रश्नाचा रोख प्रियाच्या लक्षात आला होता.

'' नाही तसं नाही... इकडेही विज बऱ्याच वेळपासून गेली पण अंधारात मेणबत्ती सापडतच नव्हती'' प्रियाने उत्तर दिले.

तिही जेवढं विचारलं तेवढंच बोलत होती. राजेशला उशीर का झाला असं कुणीच विचारलं नव्हतं या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटत होतं आणि त्याला तिघांनमधे रोजचा मोकळेपणा दिसत नव्हता. एक विचित्र तणाव त्याला जाणवल्यावाचून राहाला नाही. पण त्यानेही जास्त खोदून विचारणे टाळले.

'' आता अभ्यास कसा करायचा?'' राजेशने विचारले.

'' मेणबत्तीवर करायचा अन काय...'' विजय आता जणू मोकळा बोलण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.
त्याचा जबरदस्ती मोकळा बोलण्याचा प्रयत्नही राजेशने हेरला होता.

'' कारे तु आज एखाद्या नाटकातले डायलॉग पाठ केल्यागत का बोलतो आहेस... '' राजशने विचारलेच.

'' काही तरी मुर्खासारखा बरळू नकोस'' आता मात्र विजय चिडला होता.

'' ठिक आहे ... ठिक आहे... नाटकातल्या डायलॉगसारखा नाही तर ...मग सिनेमातल्या डायलॉगसारखा का बोलतोस... पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे... नाही प्रिया'' राजेश म्हणाला.

'' कुठे.. काय... मी कुठे चिडतो आहे... आणि चिडलो असलो तर विज गेल्यामुळे चिडलो आहे... तु का एवढं मनाला लावून घेतोस.'' विजय.

'' मी कशाला मनाला लावून घेवू... माझं म्हणणं एवढंच आहे की तुझं वागणं जरा रोजच्यापेक्षा वेगळं वाटतय... हवं तर प्रियाला विचार...'' राजेश.

यावर विजय काहीच बोलला नाही. उलट पुस्तक घेवून मेणबतीच्या उजेडात अभ्यास करण्याचा प्रयत्न करु लागला.
आता विजय चुप बसल्यामुळे कदाचित राजेशचा मोर्चा आपल्याकडे वळेल या भितीनेकी काय प्रिया तिथून उठून आत जावू लागली.

'' आता तू कुठे जातेस?'' राजेशने अपेक्षेप्रमाणे तिच्याकडे मोर्चा वळवलाच.

'' नाही म्हटलं... एखादी अजुन मेणबत्ती किंवा दिवा बघते... ही एक मेणबत्ती पुरेशी नाही होणार तिघांना'' प्रिया म्हणाली.

'' मला वाटतं आपण विज येईपर्यंत ... अभ्यास करण्याएवजी गप्पा मारुया... काय कसं?'' राजेशने सुचवलं.

यावर प्रिया तिथेच घूटमळल्यासारखी थांबली.

'' इकडे परिक्षा तोंडावर आली आणि साहेबांना गप्पा मारण्याचं सुचतय'' विजयने टोमणा मारला.

'' अरे गप्पा म्हणजे अभ्यासाच्या ... तेवढेच एकमेकांचे डाऊटस क्लीअर होतील''

'' डाऊट्स... अभ्यास झाला असेल तर डाऊटस असतील ना... हे एक मात्र बरं आहे... नो स्टडी नो डाऊटस '' विजयने आता वातावरण अजुन मोकळं करण्यासाठी जोक्स चा आधार घेतला.

तेही राजेशने हेरलं होतं. कारण त्याचे सगळे प्रयत्न कसे सहज जाणवत नव्हते. जणू वातावरण मोकळं करण्यासाठी तो अगदी डिस्परेट जाणवत होता.
आणि तेवढ्यात विज आली. घरात, रस्त्यावर सगळीकडे उजेडच उजेड पसरला. दुर दुरपर्यंत विज आल्यामुळे लोकांच्या तोंडून निघालेले आनंद्वोग्दार ऐकू येत होते.

'' आली ... आली'' राजेशही अनायसच ओरडला.

पण विजय आणि प्रियापैकी विज आल्याची कुणीच काहीच प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.

'' कारे काही भांडला बिंडला की काय?'' शेवटी उजेडात त्यांचे चेहरे पाहून राजेशच्याने राहवल्या गेले नाही.

'' नाही कुठे काय?... '' प्रिया म्हणाली आणि त्याच्या नजरेला नजर देणं टाळत उगीच खोलीत घूटमळली.

'' भांडायला का आम्ही लहान आहोत.. आम्हाला तर वाटलं की तुच आपल्या भावाशी भांडला बिंडला की काय... आणि त्यामुळेच तुला उशीर झाला... '' विजय म्हणाला.

'' पण एक मिनीट... प्रिया जरा इकडे बघ'' त्याने खोलीत घूटमळणाऱ्या प्रियाला त्याच्याकडे बघायला सांगीतले.

तिने टाळाटाळ करीत त्याच्या नजरेला नजर टाळत त्याच्याकडे बघितले.

'' हा तुझा चेहरा असा लाल .. लाल कसाकाय झाला'' राजेशने विचारले.

विजयला आता मनातल्या मनात राजेशचा भयंकर राग येत होता. पण तो उघडपणे दाखवूही शकत नव्हता.

'' अरे ... ती मेणबत्ती शोधता शोधता पडली स्वयंपाक खोलीत'' विजय म्हणाला.

प्रिया पटकन मेणबत्ती आत ठेवण्याचं निमित्त करुन तिथून आत निघून गेली.

'' पण पडण्याचा आणि चेहरा लाल होण्याचा....'' राजेशने वाक्य अर्धवटच सोडले.

कारण ती ज्या गतीने आत पटकन निघून गेली होती त्यावरुन आता कुठे काय झाले असावे याचा राजेशला अंदाज आला होता.

विजय एका कोपऱ्यात पुस्तक वाचू लागला आणि राजेश त्याच्या शेजारी जात त्याला छेडीत म्हणाला,

'' अन तुझा चेहरा असा लाल .. लाल का झाला रे... ''

'' कुठे काय?... '' विजय गोंधळून म्हणाला.

'' नाही म्हणजे ... तुही कुठे अडखळून पडला की काय?'' राजेश त्याला कोपरा मारीत म्हणाला.

'' बस.. बस झाली आता तुझी चांभार चौकशी... चुपचाप अभ्यास करायला लाग... परिक्षेला आता काही जास्त दिवस राहाले नाहीत'' विजय रागाचा आव आणीत म्हणाला.

'' नाही म्हणजे ... मी चुकीच्या वेळी तर नाहीना आलो हे मला विचारायचं होतं'' राजेश म्हणाला.

'' आता तु चुप राहाणार आहेस की नाही... आणि नालायक पुरे झाला आता तुझा चावटपणा '' विजय गालातल्या गालात हसत त्याच्यावर पुस्तक उगारीत म्हणाला.

'' वा वा... म्हणजे ह्या तर चोरांच्या उलट्या बोंबा झाल्या... चावटपणा तुम्ही करायचा आणि म्हणायचं आम्हाला'' राजेश म्हणाला.

तेवढ्यात प्रिया तिथे आली तसे ते आपापली पुस्तकं वाचु लागले. ती आता बरीच सावरलेली दिसत होती. चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिने चेहरा पुसलेला दिसत होता.

'' चहा वैगेर घ्यायचा का?'' तिने राजेशला विचारले.

'' माझं तसं काही नाही... विजयला विचार..'' राजेश म्हणाला.

तिने विजयकडे पाहाले. इतक्या वेळ पासून प्रथमच त्यांनी डोळ्याला डोळे भिडवले होते. पटकन दोघांनीही आपापल्या नजरा इतरत्र फिरवल्या.

'' नाही मला नको'' विजय पुस्तकाकडे बघतच म्हणाला आणि आपलं पुस्तक वाचण्यात गुंग झाला, म्हणजे कमीत कमी तसं भासवायला लागला.

क्रमश:...


Quote of the day : Wisdom stands at the turn in the road and calls upon us publicly, but we consider it false and despise its adherents.
... Khalil Gibran

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. khup mast hoti post agadi vachatana galatale hasu gelacha nahi mi eka shabdat varnan kari "god(sweet)"

    ReplyDelete
  2. छान आहे story. पुढचे भाग लवकर येऊ दे

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network