Indian Literature - Mrigkjal - Ch - 13
नेहमीप्रमाणे विजय, राजेश आणि प्रिया प्रियाच्या घरी अभ्यास करीत होते. पण आज प्रियाचं अभ्यासात बिलकुल लक्ष दिसत नव्हतं. अभ्यास करतांना ती राहून राहून डोळ्यांच्या कोपऱ्यातून विजयकडे पाहत होती. विजय अभ्यासात मग्न असल्यामुळे प्रथम त्याच्या ते लक्षात आलं नाही. पण बऱ्याच वेळाने त्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं जाणवल्याने तिचं ते चोरुन चोरुन पाहाणं विजयच्या लक्षात आलं. विजयने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याच्या काहीच न लक्षात आल्यासारखं दाखविण्याचा प्रयत्न केला. पण तिचं ते तसं पाहाणं सुरुच होतं. आता विजयचंही लक्ष विचलीत होवून त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं.
मग विजयने एकदा ती तशीच चोरुन पाहतांना तिच्याकडे पाहत जणू तिची चोरी पकडली, '' प्रिया..तुझं हे काय चाललंय...?""
'' कुठे काय काहीच तर नाही'' ती खांदे उडवित म्हणाली आणि आपण त्या गावचेच नाही या थाटात आपल्या अभ्यासात लक्ष देण्याचा प्रयत्न करु लागली.
आता राजेशचंही लक्ष विचलीत झालं होतं.
'' काय झालं?'' मधेच राजेशने विचारले.
त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणीच दिलं नाही हे पाहून तो पुन्हा आपल्या अभ्यासात मग्न झाला.
तरीही तिचं ते डोळ्याच्या कोपऱ्यांतून विजयकडे पाहानं चाललेलं पाहून विजय म्हणाला,
'' आज तुझं मन काही ताळ्यावर दिसत नाही''
'' म्हणजे मनाच्या भावना कळतात तर तुला'' प्रिया त्याला टोमणा मारत म्हणाली.
'' का? भावना न कळायला काय मी मशीन आहे?'' विजय म्हणाला.
'' नाही मला वाटलं की तु मशीनच आहेस... मशीन पण हाडामासाची ... बस एवढाच फरक'' प्रिया म्हणाली.
राजेशचं त्यांच्या बोलण्यामुळे लक्ष अजुन विचलित झालं आणि त्यांचं हे कोड्यात काय बोलणं
चाललं हे पाहून राजेश चिडून म्हणाला,
'' तुमचं दोघांचं काय चाललं जरा मला कळेल?''
'' राजेश अरे काल रात्री काय झालं... माहित्ये?...'' प्रिया संधीचा फायदा घेवून सांगू लागली.
'' आता मला कसं माहित असणार.. तु सांगितल्या शिवाय'' राजेश गमतीने म्हणाला.
प्रिया त्याच्या गमतीकडे दुर्लक्ष करीत सांगु लागली, '' अरे काल रात्री मी अभ्यास करीत होते .... तेवढ्यात मला फाटक वाजण्याचा आवाज झाला... ''
'' अगं चोर वैगेरे आले असतील'' तो तिला मधेच तोडून म्हणाला.
'' अरे... पुर्ण ऐकून तर घे''
'' बरं बरं ... सांग बाबा''
'' हं तर मी जेव्हा काल रात्री अभ्यास करीत होते... तेवढ्यात मला फाटक वाजण्याचा आवाज आला... म्हणून मी खिडकीतून बघीतले तर फाटक उघडून मला विजय आत आलेला दिसला''
''काय?... विज्या काबे... काल तुला पिक्चरला चल म्हटलं तर अभ्यास करायचा म्हणत होतास..'' राजेश विजयला छेडत म्हणाला.
'' मी काल रात्री तुझ्याकडे आलो होतो?... काहीतरी बोलू नकोस'' विजय आश्चर्याने म्हणाला.
'' अरे .. पुढे तर ऐक काय झाल?.. जरा दोघंही शांत राहता '' प्रिया त्यांना शांत करीत म्हणाली.
'' विजय फाटक उघडून मला आत येतांना दिसला म्हणून मी बाहेर येवून बघते तर फाटक बंद होतं... आणि विशेष म्हणजे तिथे कुणीच नव्हतं...''
'' ए ... मी सांगतो हा काय प्रकार आहे ते'' राजेश.
'' काय?''
'' अगं ते भूत असेल'' तो तिला चिडवित जोरात हसत म्हणाला.
'' राजेश... काहीतरी बोलू नकोस... मी सिरीयसली बोलतेय'' प्रिया
मग राजेश पुन्हा सिरीयस होण्याचा प्रयत्न करीत म्हणाला,
'' अगं होतं असं कधी कधी... अभ्यास करता करता तुझा डोळा लागला असेल आणि तु स्वप्न
पाहत असशील कदाचित...''
'' नाही स्वप्न नव्हतं ते... माझं मलाच नवल वाटलं... अरे काय सांगू मला आजकाल असच होतं... रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर सारखा हा फक्त विजय असतो...'' प्रिया म्हणाली.
'' बरं हे फक्त विजयच्या बाबतीतच होतंना?'' राजेशने विचारले.
'' हो'' प्रियाने उत्तर दिले.
'' अगं असं होतं... आणि असं केव्हा होतं माहित आहे..'' राजेश प्रियाला छेडीत म्हणाला.
'' केव्हा होतं?'' विजयने विचारले.
'' जेव्हा... समबडी फॉल्स इन लव्ह'' राजेश म्हणाला.
प्रियाने लाजेने मान खाली घातली.
'' अरे प्रेम बिम हे काही खरं नसतं... इट्स वन टाईप ऑफ मेंटल विकनेस... ऍन्ड सिकनेस ऑल्सो...'' विजय म्हणाला.
प्रियाने मान वर करुन रागाने विजयकडे पाहाले.
'' ए अशी काय पाहातेस... मला काय खाऊन टाकतेस की काय?'' विजय तिला चिडवित म्हणाला.
प्रियाने पुन्हा खाली मान घातली.
राजेशने पुन्हा प्रियाची गंमत करण्यासाठी तोंड उघडले पण तिचा हिरमुसला चेहरा पाहून तो विजयला म्हणाला.
'' आपल्याला ज्या भावना कळत नसतील त्याची कमीत कमी आपण टींगल उडवू नये''.
'' राज्या तु पण... लेका.. तु त्या मोटीच्या मागे मागे फिरतोस... तुच सांग.. आणि प्रामाणीकपणे सांग की तुझं तिच्यावर प्रेम आहे? ... की फक्त शारीरीक आकर्षण?'' विजयने विचारले.
प्रिया तिथून उठून पाय आपटत घरात निघून जावू लागली. विजय आणि राजेश आश्चर्याने तिला आत जातांना पाहू लागले.
तेव्हा तीच वळून म्हणाली, '' मी जरा चहा आणते''
'' पहली गोष्ट तिला मोटी म्हणायचं नाही... मी तुला कितीदा सांगीतलं आहे.. इट हर्टस मी'' राजेश रागाने म्हणाला.
'' इट हर्टस मी ...'' विजय तोंड वेंगाडून म्हणाला, '' जरा बघू तर दे कुठं हर्ट होते ते''
'' विज्या प्लीज... '' राजेश.
'' बरं सॉरी.. पण मी विचारलं ते प्रामाणीकपणे जरा सांग तर... की तुझं तिच्यावर प्रेम आहे ... की फक्त शारीरीक आकर्षण...'' विजयने तकादा लावला.
'' स्पष्ट काही सांगता येणार नाही ... थोडं प्रेम आहे.. थोडं शारीरीक आकर्षणही आहे... थोडा टाईमपासही आहे... पण काही म्हण सगळं कसं चांगलं चांगलं आणि हवंहवंसं वाटतं बघ '' राजेश म्हणाला.
'' म्हणजे भावनांचा उडालेला गोंधळ म्हण की'' विजय म्हणाला.
'' तुला ह्या गोष्टी कळणार नाहीत... तु जेव्हा प्रेमात पडशील तेव्हाच तुला या गोष्टी कळतील'' राजेश म्हणाला.
'' मला तरी ते या जन्मात शक्य वाटत नाही'' विजय म्हणाला.
'' बघूया... '' राजेश म्हणाला.
मग आत घरात बघत तो विजयला हळू आवाजात म्हणाला, '' आणि वेड्या तुझ्या ही गोष्ट लक्षात कशी येत नाही... शी इज इन लव्ह विथ यू''
'' ती थोडी वेडी आहे... बडबडी आहे... म्हणून काहीही बोलत राहाते एवढंच... '' विजय म्हणाला.
'' एक लक्षात ठेव .. जर तुला तिच्या भावना कळत नसतील ... तर तिच्या भावनांची टिंगल उडविण्याचा तुला बिलकुल अधिकार नाही'' राजेश म्हणाला.
'' मग मी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं ?'' विजयने विचारले.
राजेश गप्पच होता.
'' तिला प्रोत्साहन देवू... आणि माझं जे उद्दीष्ट आहे त्यापासून मी ढळू?... आणि एक लक्षात ठेव त्यात तिचंही नुकसानच होणार आहे''विजय म्हणाला.
'' म्हणजे तुला तिच्या भावना काही प्रमाणात का होईना कळतात तर?'' राजेश हसून म्हणाला.
'' त्या भावना नाहीत... भावनांचा गोंधळ आहे... आणि सध्यातरी मला त्यात पडायचं नाही... सध्या माझं जे उद्दीष्ट आहे त्यापासून मला कुणीही ढळवू शकत नाही'' विजय म्हणाला.
'' ते तु काहीही कर बाबा ... पण तिला दुखवू नकोस ... एवढच मला म्हणायचं आहे'' राजेश
म्हणाला.
क्रमश:...
manasokta mothi post hoti aani chanahi hoti pan kay karnar ustukta jast vadhate
ReplyDeleteinteresting story....waiting for next chapter..
ReplyDeleteare boss lavkar lavkar pudhcha post pathava yaar..... i m tooi wating for next post yaar........
ReplyDeletereally waiting for next chapter
ReplyDeletewaiting for next post
ReplyDeletekhup chan lihita tumhi. mala tumchya sarva novel khoop aavadlya. ek request hoti hya novel maayboli.com var post karal ka?
ReplyDeletepost quickly another chapter
ReplyDeletenew chaper kadhi yenar,ka amhi fakt waiting karat rahaych............
ReplyDeleteplz post another chapter plz...
ReplyDeletei m waiting...
plz send ur post daily, dont take such long breaks, we miss reading it...
Hmm.. Gud.. Bt wht nxt??
ReplyDelete