Latest Novel - Mrugjal - Ch - 14

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Latest Novel - Mrugjal - Ch - 14



Thought of the day:

Normal is getting dressed in clothes that you buy for work and driving through traffic in a car that you are still paying for - in order to get to the job you need to pay for the clothes and the car, and the house you leave vacant all day so you can afford to live in it.
... Ellen Goodman


रागाने आत गेलेली प्रिया थोड्यावेळाने ट्रे मधे तिघांसाठी चहा घेवून आली. तिच्या चेहऱ्यावर आता राग दिसत नव्हता. तिने एक एक कप दोघांच्याही समोर ठेवला. साधारणत: ती कप प्रत्येकाच्या हातात देत होती पण आज तिने नुसता तो त्यांच्या पुढ्यात ठेवला होता, आणि मग स्वत:चा कप घेवून छोटे छोटे घोट घेत, चहा पीत, ती अभ्यास करीत बसली. म्हणजे तिचा राग अजुनही शिल्लक होता. राजेशने आणि विजयने एकमेकांकडे पाहाले. विजयला तिला दुखावल्याबद्दल उगीचच वाईट वाटत होतं.


'' अगं तु मघा जे म्हणत होती त्याला काय म्हणतात माहित आहे?'' विजयने तिला विचारले.


खरतर तो तिच्याशी मुद्दाम बोलून तिला पुन्हा नॉर्मल करण्याचा प्रयत्न करीत होता.


'' मघा?.. तु कशाबद्दल बोलतोस?'' प्रियाने एकदम अनभिज्ञ होवून विचारले.


'' तेच की रात्रंदिवस तुला सगळीकडे मी दिसतो.. वैगेरे'' विजय म्हणाला.


'' अरे मी गंम्मत केली होती... असं का कधी होत असतं?... अभ्यास करुन करुन बोअर झाले होते... म्हटलं थोडं विषयांतर करावं... तेवढाच विरंगुळा आणि करमणूक... काय राजेश... झालाना विरंगुळा आणि करमणूक सुध्दा''


राजेश काहीच बोलला नाही कारण ती जरी गोष्ट गमतीवर नेत होती तरी राजेश समजू शकत होता की ती किती दुखावल्या गेली होती ते.
तो काहीच बोलत नाही हे पाहून प्रिया पुन्हा वाचण्यात गुंग झाली, म्हणजे कमीत कमी तसं भासवू लागली.


'' बरं जावूदे... राजेश मी तुला सांगतो'' विजयने आपला मोर्चा राजेशकडे वळवला.


पण तिरप्या डोळ्यांतून त्याचं लक्ष कायम प्रियाकडे होतं.


'' काय सांगणार आहेस बाबा...'' राजेश अनिच्छा दर्शवीत म्हणाला.


त्याने तटस्थ भूमिका घेतली होती, कारण त्याला त्यांच्या 'कोल्ड वार' मधे पडून उगीच कुणाची तरी नाराजगी ओढवून घ्यायची नव्हती. तसा अनुभवही त्याने पुर्वी बऱ्याच वेळा घेतला होता. त्यामुळे यावेळी तो सतर्क होता.


'' मी आता अभ्यास करीत आहे... प्लीज फालतू गप्पा करुन मला डिस्टर्ब करु नका'' प्रिया उगीच रागे भरल्यासारखी म्हणाली.


'' अरे वा... मघा तुला बोअर होत होतं... तेव्हा तु किती वायफळ बोलत होतीस ... आम्ही काही म्हणालो?...'' विजय चिडून म्हणाला.


प्रिया जणू विजयच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नाही असं भासवून ती आपल्या अभ्यासात मग्न आहे असं दाखवू लागली..


विजय पुढे आपलं अर्धवट राहालेलं बोलू लागला, '' आणि आता आम्ही बोलतोय तर तुला डीस्टर्ब होतय... आता आम्हाला बोअर होतय... आणि आता आम्ही विषयांतर करणार आहे'' विजय 'विषयांतर' शब्दावर जोर देत म्हणाला.


''आम्ही?.... हे बघा मला का उगीच मधे ओढताय... तुम्हाला भांडायचं असेल तर सरळ सरळ भांडा... मला उगीच मधे ओढून माझी ओढाताण करु नका.... ते म्हणतात ना की माणसाने रस्त्यावरच्या भांडणात आणि नवरा बायकोच्या भांडणात कधी पडू नए..'' राजेश.


'' काय?'' विजय आणि प्रिया दोघांच्याही तोंडून आश्चर्याने निघाले.


'' नाही म्हणजे... गैरसमज करुन घेवू नका... मी तुमच्या भांडणाची तुलना रस्त्यावरच्या भांडणाशी करत होतो...'' राजेशने पटकन आपली बाजु सावरून क्लिअर केली.


'' हो का...'' प्रिया.


'' तरीच म्हटलं ... तुझी एवढी मोठी हिम्मत कशी झाली'' विजय.


'' पण तुम्ही हे नाही विचारलं की रस्त्यावरच्या भांडणात आणि नवराबायकोच्या भांडणात का पडू नए म्हणून '' राजेश.


'' का बर पडू नए ?'' प्रिया.


'' आधी नवरा बायकोच्या भांडणाबाबत बोलतो... त्यांच्या भांडणात कधी पडू नए कारण ते कधी 
भांडतील आणि कधी एक होवून आपल्यावरच उलटतील याचा काही नेम नसतो'' राजेश.


'' आणि रस्त्यावरच्या भांडणात का पडू नए ?'' विजय.


'' रस्त्यावरच्या भांडणात कधी पडू नए कारण... '' राजेश उठून उभा राहत म्हणाला, '' कारण रस्त्यावर भांडणारे कधी नवरा बायको असतील काही सांगता येत नाही'' राजेश हळू हळू उघड्या दरवाजाकडे जात म्हणाला.


राजेशने पुन्हा गोष्ट नवराबायकोवरच आणून एक प्रकारे त्यांच्यावरच उलटवलेली विजयच्या लक्षात येताच तो
'' साल्या'' म्हणत तावातावाने उठला.


विजय जसा उठला तसा राजेश उघड्या दरवाजातून बाहेर पळायला लागला आणि विजय त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावायला लागला.
आता प्रियाही घराच्या बाहेर येवून मनातल्या मनात हसत त्यांचा कितीतरी वेळ चाललेला एक प्रकारचा पकडा पकडीचा खेळ पाहू लागली.



क्रमश:...




Thought of the day:
Normal is getting dressed in clothes that you buy for work and driving through traffic in a car that you are still paying for - in order to get to the job you need to pay for the clothes and the car, and the house you leave vacant all day so you can afford to live in it.
... Ellen Goodman

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

9 comments:

 1. bapre kiti ushira hi post mi kiti wat pahat hote pan mast hoti.

  ReplyDelete
 2. plz lavkar next post pathva vachaychi ustukta vadhliy

  ReplyDelete
 3. kharach khup chan hoti post ani khup ushira post keli tumhi. vachayachi ustukta tar khupacha vadhali ahe

  ReplyDelete
 4. I am waiting for the next post. Just can't wait anymore.amaZing and marvelous story.I read all your novels.but elove is just outstanding.because I mate with my husband on Internet then slowly it turned in love and that to I am a marathi girl and he is a tamilian and now we are happily married so when I read elove novels starting I reckon all past.anyways thanks for the beautiful novels best luck .keep it up.post the next chap fast.Sneha,Singapore.

  ReplyDelete
 5. ekdam mast.........

  ReplyDelete
 6. आवडलं हे page तर खूपच आवडलं.... खूपच छान आहे...

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network