Literature Online - Mrigjal - Ch -16

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Literature Online - Mrigjal - Ch -16

Thought of the day : Wisdom stands at the turn in the road and calls upon us publicly, but we consider it false and despise its adherents.
...Khalil Gibran

दिवसं कशी हसत खेळत अभ्यास करत निघून गेलीत हे विजय, राजेश आणि प्रियालाही कळलं नाही. कारण आता परिक्षा जवळ आली होती. पण त्याची त्यांना काही चिंता नव्हती. त्यांचा अभ्यास अगदी पुर्ण आणि सखोलपणे झालेला होता. चर्चा करीत अभ्यास करण्याचा फायदा आता त्यांना जाणवत होता. आणि त्या गमती जमतीत मस्तीत राजेशने सांगितल्याप्रमाणे विजयने एक गोष्ट मात्र कटाक्षाने टाळली. प्रियाला न दुखवण्याची. कधी बोलतांना कधी अभ्यास करतांना, तर कधी गप्पा करतांना प्रिया कधी आर्ततेने, कधी चोरुन त्याच्याकडे बघायची. विजयला हे सगळं जाणवत होतं, पण तो त्याला काही कळत नाही असं भासवायचा. किंवा तिच्याकडे पाहून नुसता गालातल्या गालात हसायचा. यावरुन तो एक गोष्ट मात्र शिकला होता की कोणत्याही गोष्टीचा जेवढ्या जोरात तुम्ही विरोध किंवा प्रतिकार कराल तेवढ्याच जोरात ती गोष्ट तुमच्यावर उलटत असते आणि त्या गोष्टीचा जर तुम्ही खंबीरपणे आणि तटस्थपणे सामना कराल तर त्या गोष्टीची तिव्रता आपोआप कमी होत जावून बोथट होत असते. त्याने प्रियाच्या भावनांना जर विरोध आणि प्रतिकार केला असता तर कदाचित तोही पुढे मागे त्या भावनांच्या गोंधळात आणि गुंत्यात कळत नकळत अडकला असता. पण ज्या प्रमाणे तो त्या भावनांना तटस्थतेने हाताळत होता, त्याची त्यात गुंतण्याची शक्यता कमी झालेली होती. आणि सध्यातरी त्याला तेच पाहिजे होते - कमीत कमी त्याचं उद्दीष्ट पुर्ण होईपर्यंत.
ती त्याच्याकडे अशी कधी बघत असलेली पाहून विजय मनातल्या मनात म्हणायचा, '' अगदी वेडीच आहे... नासमज आहे... वेंधळी कुठली''
आणि तो कधी असा गालातल्या गालात हसलेला बघून प्रिया मनातल्या मनात म्हणायची, '' अगदी वेडाच आहे... याला काहीच कसं समजत नाही... वेंधळा कुठला ''
आणि दोघांचाही तो लपंडाव पाहून राजेश मनातल्या मनात म्हणायचा, '' कशी वेडी आहेत ही पोरं... बिचाऱ्यांच कसं होईल काही कळत नाही ''

एक दिवस नेहमीप्रमाणे विजय प्रियाच्या घरी आधीच आला आणि ते दोघे राजेशची वाट पाहात अभ्यास करायला लागले. प्रियाचे वडिलही आज कुठे दौऱ्यावर गेल्यामुळे उशीरा घरी येणार होते. रात्रीचे आठ वाजले असतील तरी राजेश अजूनही आला नव्हता.
पण सहसा तो एवढा उशीर करीत नसे....
काय झालं असेल...
पुन्हा भावाशी भांडण झालं की काय?...
भावाचं लग्न झाल्यापासून त्याचे त्याच्या भावाशी बरेचदा खटके उडत. कारणही तसच होतं की तो आता पुर्वीचा राहाला नव्हता. बायको आल्यापासून आई वडील भाऊ सगळे त्याच्यासाठी गौन झाले होते.

'' त्याच्या घरी जावून बघूका? ...?'' विजय म्हणाला.

'' अरे येईल तो... वेळेवर काही काम निघाले असेल... कदाचित उशीरा येईल'' प्रिया म्हणाली.

तेवढ्यात अचानक विज गेली. घरात, रस्त्यावर सर्वत्र अंधारच अंधार पसरला होता. बाहेरुन लोकांच्या गोंधळाचे सुर ऐकायला येत होते. आणि घरातले फ़ॅन वैगेरे विजेची उपकरणं बंद झाल्यामुळे बाहेचा गोंधळ जरा जास्त स्पष्ट ऐकू येत होता.

'' एवढ्यात ही विज जरा जास्तच जायला लागली आहे नाही '' विजय अंधारात अंदाज घेत तिच्या दिशेने बघण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

'' आणि त्यात ही परिक्षा ... असं वाटतं आपली परिक्षा आहे म्हणून कुणी ,मुद्दाम तर असं करत नसावं'' प्रिया.

'' अगं नाही ... मुद्दाम कोण करणार असं... विज एरवीही जातेच ... एवढंच की आपली परिक्षा असल्यामुळे आपल्याला त्याची उणीव जरा जास्तच जाणवते... '' विजय म्हणाला.

'' मी मेणबत्ती लावते'' म्हणत प्रिया उठून आत गेली.

विजयला तिची आकृती आत गेलेली जाणवली. विजय जाग्यावरच बसून राहाला. पण बराच वेळ झाला; फॅनही बंद झाला होता. आणि त्यात हे कडाक्याचे उन्हाळ्याचे दिवस. बरंच उकडायला लागलं होतं. म्हणून विजय उठून जवळच खिडकीशी जावून उभा राहाला. खिडकीपाशी बरं वाटत होतं कारण खिडकीशी मधून मधून येणाऱ्या छान थंडगार हवेच्या झुळूका लागत होत्या. तेवढ्यात अचानक घरातून 'धप्प' असा पडण्याचा आवाज आला आणि सोबतच भांड्याचाही पडण्याचा आवाज आला.
पडली की काय ही?...
अंधारामुळे कुठेतरी धडपडली असेल...
विजय घाईघाईने आत गेला. आत जावून पाहातो तर आतही सर्वत्र अंधारच अंधार. काहीच दिसायला तयार नव्हते.

'' प्रिया...'' त्याने आवाज दिला.

'' आईगं...'' प्रियाच्या विव्हळण्याचा आवाज आला.

'' काय झालं प्रिया.. पडली की काय...'' विजय आवाज आला त्या दिशेने जात म्हणाला.

धुडाळतांना अचानक त्याच्या हाताला प्रियाच्या शरीराचा स्पर्ष झाला. त्याचा हात विजेचा झटका लागावा तसा मागे आला,

'' काय झालं गं?'' त्याने विचारले.

'' पाय मुरगाळून पडले होते'' ती तिच्या हातांनी त्याच्या खांद्याच्या आधार घेत म्हणाली.

तिच्या त्या मुलायाम स्पर्षाने आणि इतक्या जवळीकीने त्याला धडधडायला लागले होते. इतकी जवळीक की त्याला तिचा एक एक श्वास जाणवत होता आणि तिच्या अंगाचा तो सुगंध त्याला अजूनच बेधुंद करायला लागला होता. तिच्या श्वासांचीही वाढत असलेली गती त्याला जाणवत होती. त्याचे अंग हळू हळू तापू लागले. त्यानेही तिच्या खांद्यावर आपला थरथरता हात ठेवित विचारले.

'' जास्त तर नाही ना दुखत''

'' नाही तेवढं नाही.. पण मधून मधून कळा निघताहेत '' ती चालायचा प्रयत्न करीत त्याला रेलून म्हणाली.

आणि मग पुढचे दोन-तिन क्षण विजेच्या गतीने सर्व हालचाली झाल्या. विजयने तिच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताने तिला हळूच आपल्या आगोशात ओढून घेतले. तिनेही कसलाही विरोध न करता त्याला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही श्वासांची गती वाढलेली होती आणि ती एकमेकांना जाणवत होती. त्याने हळूच त्याच्या खांद्यावर विसावलेले तिचे डोके वर केले आणि आपला हात तिच्या गालावरुन, होठांवरुन अलगद फिरवला. तिला तो रोज पाहत होता पण प्रथमच तो तिला इतकं जवळून अनुभवत होता. तिही आता तिचे हात त्याच्या डोक्यामागे त्याच्या केसांतून फिरवायला लागली. दोघंही एकदम थांबले. काही क्षण स्तब्धतेत गेले. कदाचित त्यांच्या मनात चाललेलं व्दंद्व डोकं वर काढत होतं. द्वंद्व म्हणजे दोन विचारांची एकमेकांशी चाललेली झटापट आणि चढाओढ. पण त्यात विजय कुणा एका विचाराचाच होणार होता . शेवटी एका विचाराचा विजय झाला. आणि अचानक आवेगाने त्याने आपले ओठे तिच्या ओठावर ठेवून तिला पुन्हा जवळ ओढून घेतले. तिही त्याला प्रतिसाद देत आवेगाने त्याच्या जवळ गेली.

तेवढ्यात बाहेरुन जोरात आवाज आला, '' विज्या''

ते दोघंही एका क्षणात विलग झाले. तो आवाज राजेशचा होता.

'' तु समोर जावून दार उघड... मी मेणबत्ती शोधून लावते'' प्रिया कसीबशी म्हणाली.

विजयही गोंधळलेल्या अवस्थेत दोन क्षण तिथेच थांबला. आणि तिला काय बोलावे काही न सुचून तसाच समोर दार उघडण्यासाठी निघून गेला.

क्रमश:...

Thought of the day : Wisdom stands at the turn in the road and calls upon us publicly, but we consider it false and despise its adherents.
...Khalil Gibran

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

7 comments:

 1. wow nice post khup chan vatale vachatana. pan story ata khup deep madhe jat ahe ase vatat ahe

  ReplyDelete
 2. Pahil prem kahi aurach asate nahi?

  ReplyDelete
 3. KHOOP CHAAN KEEP IT UP....

  ReplyDelete
 4. khup chan post ahe. mi khup utsuk ahe tumach next post vachnyasathi. pan story khup halu jjat ahe ase vatat ahe!!!

  ReplyDelete
 5. khup post sathavyat aani mag nantar vachavyat aase khupda vatate pan.... pan control kon thewnar chan hoti hi post aata pudhe

  ReplyDelete
 6. priya mala havi aahe vijay la fukatacha chans milao aahe me tichavar khup prem kele asate vijay pakau aahe

  ReplyDelete
 7. mastch parfect scene dolyasamor ubha rahila chanch timing

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network