The Novel Book- Mrigajal Ch -15

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

The Novel Book- Mrigajal Ch -15

Quote of the day : We are made wise not by the recollection of our past, but by the responsibility for our future.
.... George Bernard Shawआज  विजय  अभ्यासाला आला तेव्हा सोबतच एक गोल पुठ्ठा आणि दोन तिन लांब लांब खिळे घेवून आला.


ते पाहताच प्रियाने विचारले, '' अरे ... आज हा काय प्रकार सोबत आणलास''


'' अगं मी किती वेळपासून विचारतोय... काहीतरी प्रयोग करुन दाखवणार आहे असं म्हणतो आहे'' त्याच्या सोबत आलेला राजेश म्हणाला.


'' अरे वा!... मग करुन दाखव की'' प्रिया उत्सुकता दर्शवीत म्हणाली.


'' आधी सगळे बसा तर खरं'' विजय.


सगळेजण अभ्यासाला बसले पण विजयचं अजुनही तो काय प्रयोग करणार आहे याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. राजेशला माहित होतं की मुद्दाम उशीर लावत आहे की जेणेकरुन सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचावी. पण राजेशने मनोमन ठरवले की आपण स्वत: होवून न विचारुन त्याचा पोपट करायचा. पण प्रियाला कुठे चैन पडणार होता.


'' हं बसलो ... आता दाखव काय प्रयोग दाखवणार आहेस'' ती म्हणाली.


'' दाखवतो ... थोडा धीर धरशील... तुला न कोणत्याच बाबतीत धीर नसतो बघ... यू आर सो इम्पेशंट...'' विजय म्हणाला.


तशी प्रिया पुन्हा कालसारखी गाल फुगवून आपल्या अभ्यासाला लागली. तिच्या लक्षात आले होते की कालपासून हा आपल्याशी जरा जास्तच तुटकपणे वागत आहे. तिने ठरवून टाकले की आता त्याला पुन्हा तो स्वत: बोलल्या शिवाय बोलायचे नाही.
विजय ते प्रयोगाचे साहित्य उचलून एका बाजुला ठेवीत प्रियाला बोलणार होता पण तिचा बदलेला मुड पाहून राजेशला म्हणाला,
'' हं तर राजेश... तु काल म्हणत होतास की ... प्रेमात पडलेल्यांना सगळीकडे त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसी .. दिसायला लागते.... '' विजय तिरप्या नजरेने प्रियाकडे बघत म्हणाला.


प्रियानेही तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहताच त्यांची नजरानजर झाली आणि पुन्हा तिने आपली नजर आपल्या पुस्तकावर केंद्रीत केली.


'' हो दिसते ... त्यात काय नविन''


''नाही म्हणजे ... समजा तुला ती मोटी... म्हणजे सॉरी ती राणी रात्रंदीवस सगळीकडे दिसते'' विजय म्हणाला.


'' समजा कशाला ... दिसतेच'' राजेश प्रियाची बाजु घेतल्यागत जरा आभिमानाने म्हणाला.


'' बरं तुला ती सगळीकडे दिसते... याला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात माहित आहे?'' विजयने आधी राजेशकडे आणि मग प्रियाकडे पाहत विचारले.


प्रियाने तिरप्या नजरेने चोरुन एकदा त्याच्याकडे पाहाले. विजय काय सांगतो याबद्दल आता तिची उत्सुकता जागृत झालेली दिसत होती.


'' काय म्हणतात?'' राजेश आणि प्रियाने एकदमच विचारले.
तिचा राग जणू एका क्षणात विरुन नाहिसा झाला होता.


'' त्याला म्हणतात हॉलोसीनेशन... किंवा भास'' विजय आता प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला.


'' किंवा इल्यूजन'' राजेशने जोडले.


'' बरोबर'' विजयने दुजोरा दिला.


''त्याबाबतीतच मी तुम्हाला आज एक प्रयोग करुन दाखवणार आहे... '' बाजुला उचलून ठेवलेले ते प्रयोगाचे साहित्य म्हणजे तो गोल पुठ्ठा आणि ते खिळे पुन्हा आपल्या पुढ्यात घेत विजय म्हणाला.


राजेश आणि प्रियाने एकमेकांकडे बघितले. मग ते त्या पुठ्ठ्याकडे अगदी बारकाईने निरक्षून बघू लागले. पुठ्ठ्याच्या पृष्टभाग पांढऱ्या रंगाचा होता, त्यावर त्याने कॉईल सारखी बरीचशी समकेंद्री वर्तुळे काढली. आणि त्या पुठ्याला अगदी केंद्रभागी खिळ्याने छिद्र पाडून तो त्या पुठ्ठ्याला त्या खिळ्याभोवती फिरवू लागला.


'' आता हे काय नविन खुळ?'' राजेशने विचारले.


'' तुम्ही दोघंही या पुठ्ठ्याकडे एक सारखं टक लावून दोन मिनीटं बघत रहा ... आणि नंतर ताबडतोब तुमच्या स्वत:च्या बोटांकडे बघा...'' असं म्हणून विजयने तो पुठ्ठा जोरात फिरवला.


दोघंही त्याने सांगितल्याप्रमाणे त्या पुठ्ठ्याकडे एकटक बघत होते. दोन मिनीट झाल्यानंतर विजयने इशारा केला आणि ते दोघे आपल्या हाताच्या बोटांकडे बघायला लागले.


आश्चर्याने प्रिया म्हणाली, '' अरे हे काय... माझी बोटं वाकडी होताहेत असं दिसतं आहे..''


'' माझीही..'' राजेशने आश्चर्याने दुजोरा दिला.


विजय गालातल्या गालात हसत होता.


'' आणि हे काय.. पुन्हा सरळसुध्दा होताहेत...'' प्रिया म्हणाली.


'' हो तसंच दिसत आहे'' राजेश.


'' याला काय म्हणतात माहित आहे?'' विजयने विचारले.


दोघांनीही विजयकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.


'' यालाही म्हणतात हॉलोसिनेशन... किंवा ऑप्टीकल इलूजन'' तो हसत हसत बोलत होता.


राजेश आणि प्रिया आता तो गोल पुठ्ठा पुन्हा पुन्हा फिरवून त्याच्याकडे दोन मिनीटं बघत आणि मग वेगवेगळ्या वस्तूकडे बघत होते. त्या वेगवेगळ्या वस्तूही त्यांना वेड्यावाकड्या झालेल्या दिसत होत्या, आणि पुन्हा पुर्ववत सरळ झाल्यासारख्या जाणवत होत्या. त्यांना त्याची मजा वाटत होती. विजय त्यांची चाललेली गंमत दुरुनच पाहत होता.


त्याने थोडावेळ विचार केल्यासारखे केले आणि तो प्रियाला म्हणाला,
'' बरं जावू दे... आता प्रयोगाचा उत्तरार्ध ... आता मी तुला एक कोडं विचारतो..''


प्रियाने गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहाले. तिचा राग केव्हाच निवळून गेलेला दिसत होता.


'' काय आज अभ्यासाचा मुड दिसत नाही तुम्हा लोकांचा...'' राजेश त्यांना हटकत म्हणाला.


'' बस एवढं एक कोडं आणि मग आपण अभ्यास करुया'' विजय म्हणाला.


'' हो .. हो ... अभ्यास करतांना थोडा विरंगुळा हवाच की'' प्रियाने दुजोरा दिला.


'' हो थोडा चालेल... पण हा नुसता विरंगुळाच होतोय... अभ्यासाचं नावच निघत नाही आहे'' राजेश म्हणाला.


'' नाही .. बस एवढं कोडं झालं की सिरीयस... ओके'' विजय म्हणाला.


राजेशने जणू मुक संमती दर्शवली आणि तोही तो काय सांगतो हे लक्षपुर्वक ऐकू लागला.
विजयने कोडं सांगण्याआधी मुद्दाम एक मोठा पॉज घेतला.


'' आता सांगतोस की ... नुसता टाईम पास करतोस'' राजेश चिडून म्हणाला.


'' अरे सांगतो बाबा ... कोणतीही गोष्ट सांगण्याआधी वातावरण निर्मीती हा एक महत्वाचा भाग असतो '' विजय म्हणाला.


'' झाली वातावरण निर्मीती ... आता कर सुरु'' प्रिया म्हणाली.


'' एका तळ्यात बरोबर मध्यभागी एक बेट होतं... त्या तळ्याच्या काठापासून बेटाच्या काठाचं अंतर होतं 23 फुट.. तळ्याच्या काठावर एक लाकडी फळी होती, तिची लांबी होती 20 फुट. एका माणसाला तळ्याच्या काठावरुन त्या तळ्यातल्या बेटावर जायचं होतं... तर तो कसा जाईल?'' विजयने कोडं विचारलं.


प्रिया आणि राजेशने थोडा वेळ विचार केला,


'' अगदी सोपं आहे...'' राजेश म्हणाला.


'' हो सोपं आहे... तो माणूस ती फळी तळ्याच्या काठावरुन तळ्याच्या पाण्यात टाकेल... नंतर त्या फळीवरुन 20 फुट चालत जाईल, आणि शेवटी 3 फुट लांब उडी मारुन बेटावर जाईल...'' प्रियाने कोड्याचं उत्तर दिलं.


विजय जोरात हसला.


'' काय झालं? ... बरोबर आहे तीचं'' राजेश दुजोरा देत म्हणाला.


विजय पुन्हा जोरात हसत म्हणाला, '' अरे... तळ्यात पाणीच नव्हतं...''


'' पण तु हे आधी आम्हाला का सांगीतलं नाहीस '' 'तू आम्हाला बनवू शकत नाहीस' या अविर्भावात प्रिया म्हणाली.


'' हो बरोबर आहे... तू आधी हे आम्हाला सांगायला पाहिजे होतं'' राजेशने दूजोरा दिला.


'' अरे इथेच तर खरी गंमत आहे... हे बघा ... मी तळं म्हटलं आणि तुम्ही त्यात पाणी आहे असं 
गृहीत धरलं... माणसाच्या मेंदूची एक विशेषता असते... गृहीत धरण्याची... हवं तर रिकाम्या जागा भरण्याची म्हण... ही विशेषता मेंदूने जर जास्त प्रमाणात वापरली तर माणसाला हॉलोसिनेशन्स म्हणजे भास होतात. एवढच काय त्या विशेषतेचा जर मेंदूने ताबा गमाविला तर त्याला वेगवेगळे भास व्हायला लागतात आणि माणूस वेडाही होवू शकतो. '' विजय प्रियाची खिल्ली उडविल्यासारखा बोलला आणि जोरात हसला.


 पण पुढच्या क्षणीच तो एकदम गंभीर झाला. कदाचित आपल्या घरी आपली बहिणच वेडी असल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर पसरली असावी.क्रमश:...Quote of the day : We are made wise not by the recollection of our past, but by the responsibility for our future.
.... George Bernard Shaw

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. Sir please lavkar navin chp. post kara

  ReplyDelete
 2. i'm excited now............ plz post the novel soon

  ReplyDelete
 3. plz lavakarat lavakar navin ch. post kara...aata utsukata khup nadhali aahe...plz...

  ReplyDelete
 4. pls send next chp.

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network