Fiction Literature - Mrugjal - Ch 22

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Fiction Literature - Mrugjal - Ch 22

When I can look life in the eyes, grown calm and very coldly wise, life will have given me the truth, and taken in exchange - my youth.
....Sara Teasdale

Wiseness is to know the rules, but experience is to know the exceptions.
....unknown

कॅफेमधे बसून विजय आणि प्रियामधे राजेशविषयी बराच वेळ चर्चा झाली. तो असा का वागत असावा. किंवा असं वागण्यात त्याची काय मानसिकता असावी अश्या बऱ्याच गोष्टी निघाल्या. त्याला आपल्याबद्दल कुणी भरवलं तर नसावं - वैगेरे वैगेर. विजयला तो विषय चर्चेसाठी आता नको झाला होता पण प्रियाच त्या विषयापासून हटायला तयार नव्हती. शेवटी विजयच चिडून म्हणाला,

'' अगं जावूदे ... आता त्याचा विषय पुरे... दुसरं काहीतरी बोलूया...''

'' तू असा कसा बोलू शकतोस... तो आपला एकेकाळचा चांगला जवळचा मित्र होता... म्हणजे आताही आहे...'' प्रिया म्हणाली.

'' तेच ते... आताही आहे.. हे आपण अजुनही मानतो... पण तो मानत नाही त्याचं काय... मैत्री ही कशी मिच्यूअल असते... एकतर्फी नसते'' विजय म्हणाला.

'' तेही आहे म्हणा... पण अजुनही मला ही गोष्ट खटकते की आपला एवढा जवळचा मित्र आणि त्याच्याबाबतीत असंही होवू शकतं... '' प्रिया एक उसासा टाकत म्हणाली.

'' हे बघ... वेळेनुसार परिस्थीती बदलते ... आणि परिस्थीतीनुसार माणसं बदलत असतात...'' विजय.

यावर प्रिया काहीच बोलली नाही. बराच वेळ दोघेही नुसते बसून राहाले - आपापल्या विचारात मग्न. जणू एकमेकांपासून लपून त्यांचे आपापल्या मनाशी संवाद चाललेले होते. त्यांच्या समोर ठेवलेले कॉफीचे कप केव्हाच रिकामे झालेले होते. शेवटी विचाराच्या तंद्रीतून बाहेर आल्यागत प्रिया म्हणाली,

'' मग ... आता पुढे काय?''

'' म्हणजे?'' विजयने संदर्भ न समजून विचारले.

'' म्हणजे आता डीग्री तर आली .. आता पुढे काय?'' प्रियाने विचारले.

'' पुढे काय?... नोकरी... ते कसं असतं माहित आहे... माणूस कितीही असामान्य जरी असला तरी तो जर एखाद्या सामान्य कुटुंबात जन्मला तर त्याच्या जिवनाची चाकोरी कशी ठरलेली असते...'' विजय म्हणाला.

'' म्हणजे मी काय फार असामान्य कुटूंबात जन्माला आली की काय?'' प्रिया म्हणाली.

'' माझ्या तुलनेत ... असामान्यच म्हणायला हवं '' विजय म्हणाला.

'' आता मात्र हे खुपच झालं... मी म्हणे असामान्य कुटुंबात जन्मलेली... '' प्रिया.

'' ते नशिब म्हणतात ना ते यालाच '' विजय.

'' पण विजय तुझ्याबाबतीत एक गोष्ट मला आज फार प्रकर्षाने जाणवत आहे की तु आता नशिब... दैव अशा गोष्टींबाबत बोलायला लागला आहेस... जे की पुर्वी तू कधीही बोलत नव्हतास'' प्रिया.

'' आता मला सांग ... दारुडा बाप... वेडी बहिण आणि अडाणी आई - अशा कुटुंबात मी काही माझ्या चॉइसने जन्माला आलो नाही... पण त्या गोष्टी माझ्या भवितव्याशी पुर्णपणे जोडल्या गेल्या आहेत ... मग आता मला सांग ... की माझं कर्तुत्व... माझी हुशारी याला काही महत्व आहे?'' विजय.

'' अरे तुच तर म्हणत असायचा की माणसाने आपल्या परिस्थीतीला दोष न देता... त्याला तोंड कसं द्यायचं आणि पुढे कसं जायचं याचा विचार करायला हवा'' प्रिया.

'' अगं काही गोष्टी बोलायला फार सोप्या असतात... पण त्या जेव्हा आपल्यावर बिततात तेव्हा कळतं की त्या गोष्टी म्हणजे काय असतात... आता तु तुझ्या परिस्थीतीत राहून माझ्यावर काय बितते ते कदाचित समजू शकशीलही पण अनुभवू शकत नाहीस...'' विजय.

एकदम बदलेला विषय आणि विजयच्या बोलण्यात त्याच्या परिस्थीतीविषयी दिसणारा एवढा कडवटपणा पाहून प्रियाला आता पुढे काय बोलावे काही सुचत नव्हते. ती नुसती बसून थोडावेळ गप्प राहाली.

मग विजयनेच कदाचित त्याच्या बोलण्यातल्या कडवटपणामुळे बदलेल्या वातावरणास पुन्हा नॉर्मल करण्यासाठी विचारले,
'' तू काय करणार आहेस पुढे?''

'' अजून मेडीकलच कुठे पुर्ण झालं ... आता परिक्षा आणि मग पुढे इंटर्नशीप...'' प्रिया म्हणाली.

'' त्यानंतर काय करणार आहेस?'' विजयने विचारले.

'' काही कळत नाही'' प्रिया म्हणाली.

'' तु तर अशी बोलत आहेस जणू एवढ्या चांगल्या कोर्सला ऍडमिशन भेटल्यानंतरही तू खुश नाहीस'' विजय.

'' खुश... अरे खरंच पुढे काय करायचं आणि कशासाठी करायचं याचा कधी मी विचारच केला नव्हता... बस एवढंच वाटायचं की जसे आपण बारावीत सोबत होतो तसे पुढे ही राहावे'' प्रिया.

'' खरंच प्रिया ... तु अजुनही बारावीत होती तशीच आहेस... अगदी अल्लड ... अगदी बालीश'' विजय.

'' मग काय मी बदलायला हवं'' प्रिया.

'' अगं... आजुबाजुला बघ... जग कुठे चाललय... जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण बदल... कारण आता थोड्याच दिवसात तू एक मोठी डॉक्टर बनणार आहेस'' विजय.

'' अरे आजकाल .. नुसतं डॉक्टर बनण्यालाही काही अर्थ नाही... मला तर अजुनही वाटतं की मी मॅथेमॅटीक्स घेतलं असतं तर आतापर्यंत तुझ्यासोबतच राहाली असती ... आणि आत्तापर्यंत माझं पुर्ण शिक्षण पुर्ण झालं असतं... खरं सांगते मला तर आता जाम कंटाळा आलाय या शिक्षणाचा... '' प्रिया

'' कंटाळा?... कंटाळा करुन कसं चालणार आहे... पोस्ट ग्रज्यूएट कर... म्हणजे स्पेशॅलीटी राहिल...'' विजय म्हणाला.

'' अरे.. हे मेडीकलचे... पाच वर्ष म्हणजेच खुप होतं ... अन त्यात पुढे पोस्ट ग्रॅज्यूएट म्हटलं तर खुपच होतं.'' प्रिया म्हणाली.

'' मग एखादा पोस्टडिप्लोमा कर...'' विजय म्हणाला.

'' बघू...'' प्रिया म्हणाली.

पुन्हा काही क्षण शांततेत गेले.

'' नोकरी लागल्यानंतर पुढे काय विचार आहे?'' प्रियाने मुद्दाम विषय पुढे खेचला.

'' नोकरी लागल्यानंतर ... तुला सांगितल्याप्रमाणे मला माझ्या घराची विस्कळीत झालेली घडी निट बसवायची आहे... माझ्या बहिणीची ट्रीटमेंट वैगेरे करायची आहे... तशा बऱ्याच गोष्ट आहेत करण्यासारख्या...'' विजय म्हणाला.

'' ते सगळं झाल्यानंतर मग पुढे...'' प्रिया त्याला मुळ मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करीत होती.

'' तो नाही विचार केला बा अजून'' विजय म्हणाला.

'' नाही केला?... तुझं सगळं तर वेल प्लॅन्ड असतं'' प्रिया म्हणाली.

'' वेल प्लॅन्ड असतं... तुला कुणी सांगितलं...'' विजयने विचारले.

'' ह्या गोष्टी काय कुणी सांगायच्या असतात... तुझ्या बाबतीतल्या जवळपास सगळ्या गोष्टी मला माहित आहेत... म्हणजे तेवढं मी तुला जाणलं आहे.. जसं तू मला जाणलं आहेस..'' प्रिया त्याला त्या विषयाच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न करीत होती.

'' मी? तुला जाणलं आहे?... नाही बा... मी तर तुला जाणलं बिनलं नाही...'' विजय म्हणाला.

'' नाही?''

'' एका स्त्रीचं अंतरंग जाणणं हे ब्रम्हदेवालाही शक्य नाही म्हणतात'' विजय म्हणाला.

'' मी ब्रम्हदेवाची गोष्ट नाही करत .. तुझी गोष्ट करीत आहे...''

प्रिया आता पुरती चिडली होती, पण तसं न दाखविता ती बोलत होती.

विजयने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत मागे हात करुन मोठी जांभाळी देत आळस दिला आणि तो आपल्या घड्याळाकडे पाहत म्हणाला.
'' अरे बापरे... किती वेळ झाला ... चल आता आपल्याला निघायला पाहिजे... म्हणजे कॅफेवाल्याने जागा रिकामी करायला सांगण्याच्या आत गेलेलं बरं'' तो स्वत:च्याच विनोदावर जोरात हसत म्हणाला.

प्रियाच्या आता लक्षात येत होतं की तो एकतर तिच्या भावना समजत नव्हता किंवा स्वत:च्या मनाचा तिला थांगपत्ता लागू देत नव्हता.

प्रिया आता तनक्यात उभी राहाली होती.
'' चल'' ती म्हणाली.

आणि तो उठून यायच्या आधीच दरवाज्याच्या बाहेर पडली. तिला त्याचा खुप राग आला होता. वाटत होतं त्याला न सांगताच सरळ घरी निघून जावं. पण पुन्हा आपल्या रागाला आवर घालीत कॅफेच्या बाहेर थांबून ती त्याची वाट पाहू लागली.

क्रमश:...

When I can look life in the eyes, grown calm and very coldly wise, life will have given me the truth, and taken in exchange - my youth.
....Sara Teasdale

Wiseness is to know the rules, but experience is to know the exceptions
....unknown

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments:

 1. gud continue fast pls pls pls

  ReplyDelete
 2. Farach chan..pls post next chapter ASAP..waiting

  ReplyDelete
 3. kharach khup majja yet ahe.... ata khari survat zali ahe story la.plz post next chapter quickly.

  ReplyDelete
 4. oh !!!!!!!!!!!!!!!! once more suspense great. Nice One,Interesting Story

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network