Latest Literature Novel - Mrugajal - Ch 23

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Latest Literature Novel - Mrugajal - Ch 23

Happiness Quote :
Being happy is something you have to learn. I often surprise myself by saying "Wow, this is it. I guess I'm happy. I got a home I love. A career that I love. I'm even feeling more and more at peace with myself." If there's something else to happiness, let me know. I'm ambitious for that, too.
... Harrison Ford

इंजिनिअरींग झाल्यानंतर विजयला अगदी रिकामं रिकामं वाटत होतं. कारण आता नेहमीसारखा रोजचा अभ्यास नव्हता. डोकं जे रोज व्यस्त रहायचं ते एकदम रिकामं झालं होतं. काम म्हणायला आता त्याच्याकडे काहीच नव्हतं. काम होतं ते बस एक नोकरी शोधण्याचं. झालं या मधील काळात विजय नोकरी शोधू लागला. तशी त्याची घर सोडून दुर बाहेरगावी नोकरीसाठी जाण्याची तयारी असती तर त्याला त्याच्या बुद्धीमत्ता आणि मिळालेल्या अतीउत्तम ग्रेडच्या आधारे नोकरी मिळणं कठीण नसतं गेलं. पण त्याला घर सोडून किंवा घरापासून जास्त दुर जाणं शक्य नव्हतं. कारण जरी तो घरात सगळ्यात लहान होता तरी घराची पुर्ण जबाबदारी त्याच्याचकडे होती. किंबहुना सपुर्ण घराची आशा तोच होता. बाहेर गावी नोकरीसाठी जाणं म्हणजे घरच्यांना वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं त्याला वाटत होतं. कारण घरात आई, वडील आणि बहिण यांना जोडणारा तोच एकमात्र दुवा होता. तोच जर घर सोडून गेला तर ते घर पुर्णपणे विस्कळीत झालं असतं.

मधे बराच काळ गेला तरी अजुनही त्याला नोकरी मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती. तिकडे प्रियाही आपल्या परीने विजयच्या नोकरीसाठी कसोशिने प्रयत्न करीत होती. तिने तिच्या वडीलांकडूनही बऱ्याच जागी त्याची शिफारस करुन बघीतली होती. विजय आपल्या स्वत:च्या वडीलांकडून तर त्याच्या नौकरीसाठी प्रयत्नांची काहीच अपेक्षा नव्हती. किंबहूना ते त्यांच्याच विश्वात येवढे व्यस्त असत की विजयची डीग्री संपून तो इंजिनियर झाला आहे याचीसुध्दा त्यांना कल्पना असवी की नसावी याचीही त्याला शंका होती. एकूण काय तर म्हणावे तसे कुणाच्याही प्रयत्नांना यश येत नव्हते.

आता तर प्रियाचंही इंटर्नशीप संपलं होतं. आणि तिच्याही पुढे 'आता पुढे काय?' हा प्रश्न दत्त म्हणून उभा राहाला होता. कारण नुसत्या एमबीबीएस वर स्वतंत्र प्रॅक्टीस करणे स्वत:चा एक स्वतंत्र सेटअप असल्याशिवाय शक्य नव्हते. शेवटी जेव्हा तिला तिचा रिकामपणा खायला धावू लागला तेव्हा तिने विजयच्याच सल्ल्याने पोस्ट ग्रॅजूएट डिप्लोमा जॉईन केला होता. पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा जॉईन करणे म्हणजे तिच्या दृष्टीने फक्त आजचा प्रश्न उद्यावर ढकलण्यासारखे होते. पण तिला माहित होते की बऱ्याच वेळा आजचे प्रश्न उद्द्यावर ढकलल्याने कधी कधी ते प्रश्न आपोआप सुटतात तर कधी कधी ते आपल्या एवढे अंगवळणी पडतात की ते प्रश्न 'प्रश्न' राहतच नाहीत कारण आपणच त्या प्रश्नांकडे 'प्रश्न' या दृष्टीकोणाने पहायचे सोडून देतो.
.
सकाळी लायब्रीत जावून पेपरमधे, एम्प्लाईमेंट न्यूजमधे नोकरीच्या जागा शोधणे. तशी एखादी जागा मिळताच त्यासाठी अर्ज तयार करणे, त्यासोबत लागणारी प्रमाणपत्रे अटेस्ट करुन जोडणे, सोबत डीडी लागल्यास बॅंकेत जावून डीडी तयार करणे आणि तो सगळा उपद्व्याप झालाकी तो अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्यावर पाठविणे. असा आजकाल विजयचा रोजचा दिनक्रम झाला होता. असे त्याने कितीतरी अर्ज पाठविले असतील. त्याने पाठविलेल्या प्रत्येक अर्जास त्याच्या उत्तम मार्कस आणि ग्रेड्समुळे ताबडतोब रिस्पॉन्स मिळून त्याला मुलाखतीसाठी बोलावणे तर यायचे पण प्रत्यक्ष निवडीच्या वेळी तो वशिल्याने कमी पडायचा. शेवटी त्याने स्वत:च्या शिक्षणाची किंमत कमी करुन दुसऱ्या जागा जिथे फक्त नॉन इंजिनिअरींग ग्रॅज्यूएशन आवश्यक होते तिथेही अर्ज पाठवणे सुरु केले. पण तिथे ओव्हरकॉलीफाईड म्हणून त्याचे अर्ज फेटाळल्या जावू लागले. कुठे कुठे कॉल यायचा तर मुलाखतीत ते लोक टिंगल उडवायचे की आजकाल बघा लोकांना इंजिनिअरींग करुन क्लार्कची नोकरी करण्याची वेळ आली आहे. शेवटी त्याने घरापासून थोडं दूर जावून नोकरी करण्याची मनाची तयारी केली आणि तो आता दूरच्या जागांसाठीही अर्ज करु लागला.

आजकाल विजयची दुपारची जेवणानंतरची वेळ पोस्टमनची वाट पाहण्यात जात असे. कारण त्याने आत्तापर्यंत इतके अर्ज भरले होते की जवळपास प्रत्येक आठवड्यात एकदोन तरी इंटरव्हूव कॉल त्याला यायचे. दुपारचं जेवण करुन तो समोरच्या खोलीत असाच खुर्चीवर बसून विचार करीत होता. तेवढ्यात त्याला समोरच्या दारात चाहूल लागली.

पोस्टमन आला वाटतं...

तो दारापर्यंत जात नाही तर दाराच्या खालच्या फटीतून भिरकावलेले एक पाकिट आत आले. त्याने ते पाकीट उचलले आणि तो पाठविणाऱ्याचा पत्ता वाचत खुर्चीवर येवून बसला. पत्ता त्यांच्याच शहराचा होता. त्याने घाईघाईने पाकिट उघडले आणि आतील पत्रावरचा मजकुर वाचू लागला..

'' वुई आर हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट यू आर सिलेक्टेड...''

प्रत्येक शब्दागणिक त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले.

'' वुई आर हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट यू आर सिलेक्टेड ऍज इंजिनिअर...''

त्याने पुन्हा ते वाक्य वाचले. "इंजिनिअर' हा शब्द वाचताच त्याचे हृदय पुन्हा धडधडू लागले. त्याचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वास होत नव्हता. त्याने संपुर्ण पत्र पुन्हा पुन्हा वाचून काढले आणि उठून उभे राहत त्याने घरात आवाज दिला-

'' आई...''

आईला शोधत तो घरात गेला -

'' आई ''

आईचं जेवणानंतरची भांडी घासणं सुरु होतं.

'' कायरे बाळा''

'' आई मला नोकरी लागली ... आणि साधीसुधी नाही तर चांगली इंजिनियरची नोकरी लागली आहे '' विजयच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.

'' काय?... जगदंबेची कृपा झाली बघ..'' आई भांडे घासता घासता आपले हात टोपल्यातल्या पाण्यात बुडवून धूत उभी राहाली.

तिने त्याच्या गालावरुन हात फिरवीत आपल्या हाताची बोटं चाळ्यावर नेवून मोडली. आनंदाच्या भरात तिला
एवढेही भान राहाले नव्हते की विजयचे गाल तिच्या अर्धवट धुतलेल्या हाताला असलेल्या राखेने माखले होते.

'' जा काहीतरी गोड घेवून ये'' ती लगबगीने घरात जात म्हणाली.

तोपर्यंत विजयची बहिण शालीनी तिथे आली होती. ती मख्खपणे तिच्यासमोर होणारा सगळा प्रकार पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया किंवा भावना नव्हत्या. ही आनंदाची गोष्ट तिला सांगण्यासाठी त्याच्या ओठावर शब्द आले होते. पण मग विचार बदलून तो त्याच्या आईच्या मागे मागे आत घरात गेला.

क्रमश:...

Happiness Quote :
Being happy is something you have to learn. I often surprise myself by saying "Wow, this is it. I guess I'm happy. I got a home I love. A career that I love. I'm even feeling more and more at peace with myself." If there's something else to happiness, let me know. I'm ambitious for that, too.
... Harrison Ford

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. kharch mast kautukaspad kahani

  ReplyDelete
 2. priya saathi mich changala aahe vijay naahi

  ReplyDelete
 3. ho ka swapnil?? mi priya chya jagi aste tar vijay kadun jya ritine response miltoy tya nusar mala doubtch aal asat ki ha pudhe jaun tari apla hoil ka nahi yacha... !!!

  ReplyDelete
 4. nice so happy..........

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network