New Latest Novel - Mrigajal - Ch 24

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Quotes about Makar Sankranti -
Salutations and adorations to the Supreme Lord, the primordial power that divided the year into the four seasons. Salutations to Surya, the Sun God, who on this great day of Makar Sankranti embarks on his northward journey (Uttarayana).
.... Author Unknown
The sun, symbolizing wisdom, divine knowledge and spiritual light, which receded from you when you reveled in the darkness of ignorance, delusion and sensuality, now joyously turns on its northward course and moves towards you to shed its light and warmth in greater abundance, and to infuse into you more life and energy.
.... Author Unknown

मध्यंतरीच्या काळात तिकडे प्रियाचा पोस्टग्रॅजुएट डिप्लोमा सुरुच होता, तर इकडे विजयची नोकरी व्यवस्थित सुरु होती. नोकरी मिळाल्यानंतर पहिल्या पगारात त्याने काय केले असेल तर आपल्या बहिणीला ट्रिटमेंटसाठी दवाखाण्यात नेले. दवाखाण्यात न्यायचे तेव्हा प्रश्न होता कुणाकडे न्यायचे की त्याला योग्य सल्ला मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंट तिही माफक फिजमधे मिळेल. कारण एकतर त्यांच्या शहरात सायकीयाट्रीस्ट या स्पेशालीटीचा डॉक्टर कुणीच नव्हता. आणि दुसऱ्या जनरल डॉक्टरांकडे जावून त्याला वेळ आणि पैसा वाया घालवायचा नव्हता. कारण आत्तापर्यंतचा तरी त्यांचा अनुभव असाच राहाला होता. मग त्यातल्या त्यात जवळपासच्या शहरातला एखादा सायकीयाट्रीस्ट शोधणे आवश्यक होते. तसा त्याच्या माहितीत तरी कुणी नावाजलेला सायकीयाट्रीस्ट नव्हता. त्यामुळे हे सर्व त्याने प्रियाच्या सल्यानेच केले. प्रियाच्या प्रोफेसरांच्या ओळखितले एक चांगले सायकियाट्रीस्ट जवळच्याच एका शहरात होते. त्यांच्याकडे त्याने तिला नेले. त्यांनीही ओळखीतला पेशंट म्हणून त्यांची आपुलकिने चौकशी करीत रोगाचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केला. जवळपास दोन तासांच्या सीटींगनंतर त्यांनी तिच्यासाठी काही औषधं लिहून दिली. दवाखान्याची फीज चुकवून औषधे घेतल्यानंतर विजयच्या लक्षात आले की खरोखरच वडिलांच्या तुटपुंज्या पगारात हे सर्व शक्य नव्हतं. आणि तेव्हा त्याला त्याच्या पगाराचं महत्व कळत होतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची बहिण पुर्णपणे बरी होणार होती या गोष्टीचा त्याला आनंद होता आणि त्यासाठी त्याचा पगार कारणी लागत होता आणि भविष्यातही कारणी लागणार होता या गोष्टीने त्याला धन्य वाटत होते. एवढ्या मेहनतीनंतर मिळालेली नोकरी आणि आता त्यातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य उपयोग होणे सर्वात महत्वाचे होते. आणि विजयसाठीतरी त्या पैशाचा हा उपयोग जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा योग्य होता.

याही काळात प्रिया आणि विजय यांच्यात पत्रव्यवहाराची बऱ्याच प्रमाणात देवाणघेवाण सुरु होती. विजयच्या सल्ल्याप्रमाणेच प्रियाने पुढे अजुन शिकण्याची इच्छा नसूनही पोस्ट ग्रॅजूएट डिप्लोमा सुरु ठेवला होता. खरं म्हणजे पुढे शिकण्याच्या इच्छेपेक्षा तिला विजयपासून दूर राहाणे जिवावर आले होते. पण त्याने सुचविल्यामुळे तिही पोस्ट ग्रॅजूएट डिप्लोमा पुर्ण करणे टाळू शकत नव्हती. कारण तीने त्याला आपल्या जिवनाचा मार्गदर्शक केव्हापासूनच मानले होते. खरंतर तिने त्याच्यासोबतच्या तिच्या भावी आयुष्याच्या स्वप्नात रंग भरणेही सुरु केले होते. कारण आत्तापर्यंत गोष्टी ज्याप्रमाणे होत होत्या त्यात तिला त्यांच्या एकत्र येण्यात कुठेच काही अडचण दिसत नव्हती. फक्त तिला विजय तिच्या भावनांकडे असा का दुर्लक्ष करतो आहे याचं वाईट वाटत होतं. कदाचित तो आता त्याच्या घराच्या विस्कटलेल्या घडीला निट बसवण्यात जास्त लक्ष घालत असल्याने तसे होत असावे. अश्या तऱ्हेने कधी कधी ती स्वत:च्या मनाची समजुत घालत असे.

बऱ्याच दिवसांपासून चिघळत असलेला एक प्रश्न प्रियाला सोडवणे आवश्यक वाटत होते. तो प्रश्न म्हणजे काही कारण नसतांना त्यांच्यापासून दुरावत चाललेला त्यांचा जिवाभावाचा मित्र राजेश. एक दिवस विजयला प्रियाचे एक लांबलचक सविस्तर पत्र आले. त्या पत्रात तिने सांगितल्याप्रमाणे विजयने एक दिवस मुद्दाम राजेशकडे जावून त्यांचे पुर्वीचे घनिष्ट सबंध का दुरावले गेले यावर त्याच्याशी गहन चर्चा केली. प्रथम राजेशचा त्या चर्चेमधे वरवरचाच सहभाग होता. पण हळू तोही कळत नकळत त्या चर्चेत आणि गप्पांत एवढा गढून गेला की केव्हा रात्र उलटून गेली दोघांनाही कळले नाही. चर्चेच्या आणि गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी निघत गेल्या आणि विजयला जाणवू लागले की राजेश वरकरणी जरी गंभिर वाटत होता तरी आतून तो तोच पुर्वीचा त्यांचा जवळचा मित्र होता. जसं नारळ जरी वरुन टणक वाटत असलं तरी आतून गोड रसाळ आणि नाजुक असतं तसं त्याचं मन होतं. त्याला सामोरं जावं लागलेल्या बिकट परिस्थितीमुळे जणू त्याने वरुन नारळासारखा टणकपणा धारण केला होता. आणि हा जो दुरावा निर्माण झाला होता तो काहीही कारण नसतांना एकमेकांबद्दल गैरसमज वाढत गेल्यामुळे झाला होता. ज्या क्षणी या दुराव्याला खतपाणी मिळाले त्याक्षणीच जर अशी चर्चा केली गेली असती तर हा दुरावा कदाचित निर्माण झालाच नसता. बोलता बोलता त्यांच्या चर्चेत असेही क्षण आले की जुन्या आठवणी येवून त्यांचे डोळे मधे मधे पाणावत. खरोखर त्यांना आता जाणवत होते की शाळा आणि कॉलेजच्या दरम्यान झालेली मैत्री ही खरी मैत्री असते कारण तिच एक मैत्री अशी निरागस आणि निस्वार्थी असते की ज्यात एकमेकांकडून निखळ मैत्रीच्या व्यतिरीक्त काही एक अपेक्षा नसते. आणि असे मित्र कॉलेजनंतरच्या पुढच्या काळात मिळणे कठीण असते कारण त्या मैत्रीत कळत नकळत स्वार्थ आणि अपेक्षेने प्रवेश केलेला असतो.

जेव्हा विजय परत आपल्या घरी जाण्यास निघाला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की रात्र उलटून केव्हाच सकाळ झाली होती. विजय उठून जेव्हा दाराकडे जाण्यासाठी निघाला तेव्हा राजेशने त्याला मागून आवाज दिला,

'' विजय''

विजय जाता जाता थांबला आणि मागे वळून पाहू लागला तर राजेशने लगबगीने येवून गहीवरुन त्याला मिठी मारली. तो क्षण असा होता की जरी दोघेही काही बोलत नव्हते तरी त्यांच्यात जणू कितीतरी शब्दांची आणि शब्दाने व्यक्त न करता येण्यासारख्या भावनांची देवाणघेवाण होत होती. शेवटी हेच खरं की प्रत्येकाला आपापलं मन मोकळं करायचं असतं पण प्रत्येकाची तऱ्हा कशी वेगवेगळी असू शकते. त्यांच्या रात्रभर चाललेल्या गप्पांदरम्यान राजेश विजयइतका कदाचित बोलला नसेल. विजयचं जसं वक्तृत्वावरती प्रभुत्व होतं तसं राजेशचं निश्चीतच नव्हतं. पण आता न बोलता तो खुप काही बोलून गेला होता. तशी मैत्री म्हणजे तुम्ही एकमेकांशी किती आणि कसे बोलता यावर अवलंबून नसून तुमच्यात भावनांची देवाणघेवाण किती आहे आणि तुम्ही एकमेकांच्या भावना कशा समजु शकता यावर अवलंबून असते.

जेव्हा विजयने प्रियाला पत्र पाठवून या प्रसंगाबद्दल आणि संपूर्ण चर्चेबद्दल सविस्तर लिहिले तेव्हा तिलाही खुप आनंद झाला होता. तिला राहून राहून वाटत होते की ज्या रात्री ते दोघे गप्पा मारीत बसले होते त्या रात्री तिही तिथे असायला हवी होती. कारण ते जुन्या आठवणीचे क्षण तिलाही अनुभवायचे होते. त्या क्षणांत विजय आणि राजेशचा जेवढा सहभाग होता, तिचाही त्यांत तेवढाच सहभाग असल्यामुळे तिच्याशिवाय ते तसे अपुर्णच होते. तिला या गोष्टीचे बरे वाटत होते की ते जेमतेम तिघेच अगदी जवळचे मित्र होते आणि कमीतकमी त्यांच्यामधील गैरसमज दूर होवून ते पुन्हा एकत्र आले होते. कदाचित ज्यावेळी हा दुरावा निर्माण झाला त्यावेळी पुन्हा समेट घडलाही नसता कारण त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती समेटासाठी तेवढी पोषक असावी की नसावी ते आता काही सांगता आले नसते. शेवटी हेच खरे की काही गोष्टींसाठी वेळ हेच औषध असतं. काही काही जखमा भरण्यासाठी काही ठरावीक कालावधी जावू द्यावा लागतो.

आता प्रियाला येणाऱ्या पत्रांमधे राजेशच्या पत्रांचीही भर पडली होती. कधी कधी तर त्याची विजयपेक्षाही लवकर लवकर पत्र यायची. जणू तो आधी मुकलेली पत्रांची देवाणघेवाण पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता. प्रियाचे त्याला पत्र पाठवणं तस आधीही सुरु होतं. पण तिच्या पत्रांना तो प्रत्युत्तर द्यायचं टाळायचा. त्यामुळे तिचंही त्याला पत्र पाठवणं कमी झालं होतं. जणू पुर्वी सुरळीत वाहणाऱ्या पाण्याने जसा काहीतरी अडथळा आल्यामुळे एका डबक्याचं रुप धारण केलं होतं, ते पाणी आता पुन्हा पुर्ववत सुरळीत वाहू लागलं होतं. पण विजयच्या येणाऱ्या पत्रांमधे काहीही फरक पडलेला नव्हता. उलट त्याची पत्र पुर्वीसारखी भावनात्मक नसायची. एवढ्यात पत्र लिहितांना त्याची भूमीका कशी तटस्थ असायची. एकदा प्रियाने त्याला याबद्दल विचारलेही. पण त्याचे नेहमीसारखे फिलॉसॉफीकल उत्तर तयार होते ,

'' तेव्हा आपण कॉलेजातून बाहेर पडलेली, या जगाचा तेवढा अनुभव नसलेली अगदी कोवळी मुलं होतो... पण आता आपल्याला अनुभवानुसार परिस्थितीनुसार... गंभिर आणि खंबीर व्हायला शिकलं पाहिजे''.

एवढं जड आणि भावनाशुन्य उत्तर वाचल्यावर, प्रियाला काही त्या उत्तराला अजुन काही प्रत्यूत्तर द्यायची इच्छा, किंबहुना हिम्मत झाली नाही.

प्रियाचा पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा आता संपला होता. पण पुन्हा तोच यक्षप्रश्न पुन्हा उपस्थित झाला - आता पुढे काय?. प्रिया तर आता अभ्यास करुन करुन एवढी बोअर झाली होती की आता तिला जर पुन्हा कुणी अजुन पुढे शिकण्याचा सल्ला जर दिला असता तर तीने त्याचं रागाने डोकं फोडण्यास मागे पुढे पाहिले नसते. पण तरीही त्याने तो '' पुढे काय?'' हा प्रश्न सुटला नसता. मग पुन्हा याबाबतीत तिने तिचा मार्गदर्शक विजयशी चर्चा केली. आणि तोही तिच्या मार्गदर्शकाची भूमिका मोठ्या आनंदाने पार पाडत असे. कधी कधी तर असे होत असे की एखादा सल्ला तिच्या वडीलांनी तिला दिला तर तो तिला पटत नसे. पण जर तोच सल्ला जर विजयने तिला दिला तर तिला तो पटकन पटत असे. तसं विजयचं कोणतीही गोष्ट समजावून आणि पटवून सांगण्याच कसब वाखाणण्यासारखं होतं. झालं प्रियाने पुन्हा विजयच्या सांगण्याप्रमाणेच एका नामवंत डॉक्टरकडे प्रॅक्टीस सुरु केली. यावेळी प्रॅक्टीस साठी पुन्हा आपल्या शहरात येण्याची तिची खुप इच्छा होती की जेणेकरुन ती विजयच्या जवळ राहावी. पण तिची ती इच्छा पुर्ण होवू शकली नाही. विजयनेही तिची समजूत घातली की पुढे पुन्हा संधी मिळाल्यास ती आपल्या शहरात परत येवू शकेल.

मधे बऱ्याच दिवसांचा कालावधी निघून गेला. प्रियाची तळमळ आणि तिव्र इच्छा असूनही तिला तिच्या शहरात परत येण्याची संधी अजूनतरी मिळाली नव्हती. प्रियाही आता आपल्या कामात खूप व्यस्त झाली होती. कदाचित त्यामुळेच ती विजयला पूर्वीप्रमाणे वेळोवेळी पत्र पाठवू शकत नव्हती. हळूहळू विजयचाही पत्रव्यवहार कमी झाला होता. कदाचित तोही तसाच व्यस्त राहत असावा.

आज उशीरा घरी थकुन आल्यानंतर प्रथम तिने तिला आलेली सगळी पत्र चाळली. त्यात तिला राजेशच्या लग्नाची पत्रीका दिसली. तिने ते पाकीट फोडून पत्रीका बाहेर काढली. मागच्या दोन तिन महिण्यात राजेशचेही काही पत्र नव्हते त्यामुळे त्याचे तिकडे काय चालले असावे तिला काही अंदाज नव्हता. पण पत्रिका पाहताच तिला अंदाज आला होता की मागचे दोन तिन महिने तो कशात व्यस्त असावा. पत्रिका उघडून तिने त्यावरची तारीख बघितली. अजुन 7-8 दिवस होते. त्या तारखेचा वार बघितला. शनिवार होता. म्हणजे सुटीचा प्रश्नच नव्हता. विजय तिथेच असल्यामुळे तोही लग्नाला नक्कीच येणार होता. झाले क्षणाचाही विलंब न लावता तिने लग्नाला जाण्याचे ठरवून टाकले. विजयला भेटण्याचा हा चांगला मौका तिला चुकवायचा नव्हता.

क्रमश: ..

Quotes about Makar Sankranti -
Salutations and adorations to the Supreme Lord, the primordial power that divided the year into the four seasons. Salutations to Surya, the Sun God, who on this great day of Makar Sankranti embarks on his northward journey (Uttarayana).
.... Author Unknown
The sun, symbolizing wisdom, divine knowledge and spiritual light, which receded from you when you reveled in the darkness of ignorance, delusion and sensuality, now joyously turns on its northward course and moves towards you to shed its light and warmth in greater abundance, and to infuse into you more life and energy.
.... Author Unknown

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network