Novel based on True Story - Mrugajal - Ch - 25

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Novel based on True Story - Mrugajal - Ch - 25

Valuable quotes -
Turn your wounds into wisdom.
... Oprah Winfrey
The art of being wise is the art of knowing what to overlook.
...William James
The more sand that has escaped from the hourglass of our life, the clearer we should see through it.
...Jean Paul

.... जेव्हा प्रिया आपल्या विचार चक्रातुन भानावर आली तिला जाणवले की ती अजुनही अशोक पार्कमधे उभी राहुन विजयची वाट पाहत आहे. तिने आजुबाजुला वळून बघितले. विजय अजुनही आला नव्हता. मग तिने आपल्या मनगटावर बांधलेल्या घड्याळीकडे बघितले. विजयला यायला अजून वेळ होता. खरतर तिच जरा लवकर आली होती.

तिला तो रिसेप्शनचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होता -

दोघंही अगदी एकमेकांसमोर उभे होते. त्याच्या एकूण हालचालींवरुन प्रियाने जाणले होते की त्याला त्याच्या मनातले काहीतरी गुपीत उघड करायचे आहे. तो खरंतर बोलणारच होता पण तेवढ्यात त्याला त्याची आई त्यांच्याकडे येतांना दिसली आणि तो म्हणाला, "" बरं एक काम करं ... उद्या संध्याकाळी सहा वाजता ... कुठे भेटता येईल?... कुठे भेटता येईल?''

"" आपली नेहमीची जागा'' तिने सुचवले.

'' हो... आपली नेहमीची जागा... अशोक पार्क... ''

त्याची आई जवळ आलेली पाहताच, "" .. मी तुझी वाट पाहीन '' म्हणत तो तिथून सटकला.

खरंतर त्याला तिथे बोलण्यास वाव मिळाला नाही ते एका दृष्टीने बरेच झाले. कारण अश्या गोष्टी एवढ्या घाईत आणि एवढ्या गर्दीच्या ठिकणी बोलायच्या नसतात. आणि तिला रिसेप्शनच्या ठिकाणी अजुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती.
विजयच्या वागण्यात झालेला बदल...
एवढा गंभिर राहणारा तो एकाएकी कसा बदलला होता. त्याच्या हालचालीत एक चंचलपणा जाणवत होता. तिथे रिसेप्शन मधे राहून राहून कसा चोरुन आपल्याकडे पाहत होता तो. पुर्ण वेळ कशी त्याची आपल्याला भेटण्याची ओढ होती. खरोखर त्याच्यात अमुलाग्र बदल झालेला होता.
पण हा बद्ल झाला तरी कसा ? ...
कदाचित राजेश त्याचा अगदी जवळचा मित्र आणि तो आता लग्न करीत आहे हे पाहून कदाचित त्यानेही आत्तापर्यंत आवर घातलेल्या त्याच्या भावनांना आता मोकळीक दिली असावी.

ती विचार करीत होती. तेवढ्यात तिला तिच्या शेजारी कुणीतरी आल्याची चाहूल लागली. म्हणून तिने वळून बघितले तर विजयच तिच्या समोर उभा होता.

'' किती वेळ... मी किती वेळपासून तुझी वाट पाहते आहे'' प्रिया तक्रारीच्या सुरात म्हणाली.

'' हे बघ.. मी बरोबर शार्प सहा वाजता आलो आहे... अगदी दिलेल्या वेळेला... '' विजय स्वत:चा बचाव करीत म्हणाला.

प्रियाने आपल्या मनगटावरील घड्याळात बघितले. खरोखर बरोबर सहा वाजले होते. तशी वेळही त्याने सहाचीच दिली होती. पण तिच लवकर आली होती. खरं म्हणजे तिला विजयला असं काय महत्वाचं बोलायचं आहे हे ऐकण्याची ओढ लागली होती. पण तो वेळेच्या बाबतीत कधीच चुकत नव्हता; तसा आजही चुकला नव्हता.

'' बरं जाऊदे... कशाला बोलावलंस?'' प्रिया स्वत:च्या मनाच्या अधिरतेचा थांग न लागू देता म्हणाली. आणि तिला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करुन वेळही घालवायचा नव्हता. तो आज तिला जे सांगणार होता ते ऐकण्यास ती अधीर झाली होती.

'' अगं आज मला ... माझ्या मनात कितीतरी दिवसांपासून घोळत असलेली गोष्ट सांगायची आहे.'' विजय मुळ मुद्द्यावर येत म्हणाला. त्यालाही कदाचित इकडच्या तिकडच्या गप्पांत वेळ दौडवायचा नव्हता. तोही जणू त्याच्या मनातलं गुपीत तिच्यासमोर उघड करण्यास अधीर झाला होता.

प्रियाच्या हृदयाची स्पंदनं वाढायला लागली होती. विजय पुढे काय बोलतो याची प्रिया आतुरतेने वाट पाहू लागली. शेवटी तिला तिचे स्वप्न खरे होत आहे असे दिसत होते.

'' अगं ... काय सांगू?...'' तो शब्दाची जुळवाजुळव करु लागला तसे तिच्या हृदयाची स्पंदनं अजुन वाढायला लागली होती.

'' खरं म्हणजे... आय ऍम इन लव्ह'' तो कसाबसा हिंम्मत करुन म्हणाला.

तो तिच्याकडेच पाहात होता. प्रियाने लाजून मान खाली घातली. तिची विजयकडे बघण्याची हिम्मत होईना.

'' अगं मला कधी कशाची भीती वाटत नाही... पण.. मी माझी हिम्मत खुप एकवटण्याचा प्रयत्न केला पण हे 'तिला' सांगण्याची हिंम्मत मला होत नाही आहे..''

'तिला' या शब्दाने तिच्या हृदयावर घणघाणाती घाव केला होता. तिला जाणवत होते की एखादा काच पडून तुटावा तसे तिच्या हृदयाचे तुकडे तुकडे होत आहेत. तिच्या मनात तिने रंगवलेला स्वप्नांचा बंगला तर बेचीराख होवून विखुरल्या जात होता.

'' म्हणून तर मी तुला इथे बोलावले... तुला माझी मदत करावी लागणार आहे... आणि मला खात्री आहे... माझी बेस्ट फ्रेंड या नात्याने तू मला नक्कीच मदत करशील...''

तो बोलत होता. खुप खुप बोलत होता. इतका भराभर आणि स्वत:च्या मनाबद्दल मोकळा तो आधी कधीही बोलला नसेल. त्याचा एक एक शब्द जणू तिला तिच्या हृदयावर पडणाऱ्या एक एका घावा प्रमाणे जाणवत होता. तो अजुनही खुप बोलत होता. पण प्रियाला जणू काहीही ऐकू येत नव्हते. तिच्या सर्व संवेदना जणू शिथील पडल्या होत्या. डोक्यात परस्पर विरोधी विचारांच काहूर माजलं होतं. डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं जाणवत होतं. तिने स्वत:ला सांभाळण्याचा खुप प्रयत्न केला, कारण तिला विजयच्या आनंदावर विरजण पाडायचं नव्हतं. पण प्रथमच स्वत:ला सांभाळणे ही तिला अशक्यकोटीतली गोष्ट वाटत होती. तिला जणू तिच्या आयूष्याचा उद्देशच संपल्यासारखा वाटत होता. आणि आयुष्याचा उद्देशच जर संपला तर ते संगळं काही संपल्यासारखं होतं. शेवटी तिला त्याचेच... तिच्या मार्गदर्शकाचे शब्द आठवले.

' माणसाला जेव्हा वाटतं की आता सगळं काही संपलेलं आहे... तेव्हाच खरी सुरवात झालेली असते..'

त्या वेळी त्या शब्दांनी तिला थोडा का होईना दिलासा वाटला होता. ज्यावेळी हे शब्द त्याने तिला सांगितले होते तेव्हा तिला त्या शब्दात एवढं काही तथ्य वाटलं नव्हतं. पण अचानक तेच शब्द तिचा आधार बनु पाहात होते.

ती स्वत:ची समजूत घालत होती ,
आपण त्याच्यावर प्रेम करीत असल्याची वारंवार त्याला जाणीव करुन देत राहीलो...
पण त्याने कधीही ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही...
म्हणजे तो आपल्यावर प्रेम करीतच नव्हता मुळी....
आणि आपल्याला वाईट वाटू नये म्हणून कदाचित त्याने तसे स्पष्टपणेही कधी व्यक्त केले नाही...
आपण उगीच प्रेम आणि मैत्रीमधे गफलत केली...
गफलत कसली?... आपण तर त्याच्यावर मनापासून प्रेम केले...
पण हे मात्र खरं की त्याने प्रेम आणि मैत्रीची गफलत होवू दिली नव्हती...
तशी त्याने आत्तापर्यंत कोणत्याही भावनांच्या बाबतीत गफलत होवू दिली नव्हती...
तो त्याच्या जागी अगदी योग्य होता आणि आहे..
आपण विजयवर प्रेम केले याचा अर्थ असा नाही की त्यानेही आपल्यावर प्रेम केलेच पाहिजे...

त्याच्या प्रश्नाने तिच्या विचारांची तंद्री भंगली.
"' तू विचारणार नाहीस का की ती कोण?... तिचं नाव काय?''

एव्हाना ती बऱ्यापैकी सावरली होती. तिने फक्त प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे कसेबसे बघितले.

'' ... अगं ती माझ्या बॉसचीच मुलगी... नयना.. मी तिला नयनी म्हणत असतो ..ती तिच्या वडिलांच्याच ऑफीसमधे काम करते आणि आम्ही एकाच प्रोजक्टवर काम करतो '' तो म्हणाला.

क्रमश:..

Valuable quotes -
Turn your wounds into wisdom.
... Oprah Winfrey
The art of being wise is the art of knowing what to overlook.
...William James
The more sand that has escaped from the hourglass of our life, the clearer we should see through it.
...Jean Paul.

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

11 comments:

 1. Sorry
  Pan He Khup chukiche hot aahe. Vijaya La Mahit asunhai priyalach nayana baddal sangun khup dukhavlay tyane. Ase vhyayla nako hote.

  Neeta

  ReplyDelete
 2. wow post khup cha ani khup long hoti........... ani suspense far dukhache hote ki vija var priya var prem karat nahi..

  ReplyDelete
 3. keep it up
  pls publish next chapter soon

  ReplyDelete
 4. good suspense pen he khup vait hote priyasaathi ............i feel too bad for priya............keep going............but i wait for next post.............

  sheetal patkar

  ReplyDelete
 5. bapre mala watalach ha kahitari ghotala karnar bichari priya

  ReplyDelete
 6. mala mahita hota hya muli nako tyachavar prem kartat aani fasatat mhanunach manat hoto priya sathi mich yogya aahe

  ReplyDelete
 7. ohh yar... khup danger hot te... mala watalach hot ki to priyach nav ghenar nahi... mala priya sathi khup wait watat aahe... as watatay janu kahi he mazyasobatch zalay... writer tumhi khup chan mandlat sagal... pan khup wait... mala ata wachaychi icchach meliye... ka hot aas??ka zal aas??...vijayni aas karaych navhat...kharach swapnil tuch yogya aahe priya sathi... :'( :(

  ReplyDelete
 8. yalach tar jivan mhantat, mansachya manasarkhi pratek gosht ghadat asti tar sukh- dukhatla farak smjlach nasta.

  ReplyDelete
 9. ho sarv goshti jr aapla manasarkha zala asta tr aaplala sukhachi kimmat smjlich nasti. jivan he asech aste aaplala Pratek situation madhun suvarn madhy shodhnatch shahanpn asto. nd swapnil priyala sambhalun ghe...

  ReplyDelete
 10. He asach asata. prem kela ani jar te apala nahi jhala tar radava lagat. best way " DONT FALL IN LOVE."  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network