Online Novel - Mrugjal - Ch-29

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Online Novel - Mrugjal - Ch-29

Republic Day Quotes :
"India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great grand mother of tradition. Our most valuable and most artistic materials in the history of man are treasured up in India only!"

... Mark Twain (Writer, America)

"If there is one place on the face of earth where all the dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India!"
... - Romaine Rolland (French scholar)

प्रिया प्रिस्क्रिप्शन लिहित होती आणि तिच्या समोर राजेश आणि त्याची बायको  कमल  बसलेले होते. प्रिया प्रिस्क्रिपन्श्न लिहित असतांना काही वेळ शांततेत गेला. त्यावेळात तो तिच्या कॅबिनमधे भिंतीवर टांगलेली लहान बाळांची चित्र बघण्यात मग्न झाला. मग हळूच त्याने एका चित्राकडे त्याच्या बायकोचं लक्ष वेधत तिला खुनावले. ते प्रियाच्याही लक्षात आले आणि ती त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाली, '' काय ते चित्र घेवून जाणार?''.

'' नाही ... कशाला?'' तो.

'' अरे ... सारखं ते चित्र जर तिच्या नजरेसमोर राहालं तर होणारं बाळ पण छान होणार'' प्रिया.

'' पण असं का कधी होतं?'' तो.

'' पुर्णपणे नाही होणार ... पण गर्भावस्थेत आईच्या असलेल्या मानसिक स्थितीचा परिणाम गर्भावर मात्र होत असतोच... आणि त्या बाळाचं चित्र जर नेहमी तिच्या नजरेसमोर राहालं तर ती नेहमी प्रसन्न राहणार आणि त्याचा योग्य परिणाम तिच्या बाळावर होणार'' प्रिया.

'' पण?''

'' त्याची तू काळजी नको करुस ... माझ्याजवळ तशी भरपुर चित्र आहेत... ते औषधाच्या कंपनीवाले नेहमी येतात आणि प्रत्येक वेळी असे चित्र देवून जातात'' प्रिया.

राजेशने उठून भिंतीजवळ जावून ते चित्र काढून घेतलं. आणि पुन्हा परत येवून खुर्चीवर बसत पुन्हा जवळून आपल्या बायकोला दाखवलं.

मग त्या चित्राची सुरळी करता करता राजेशने विचारावे की न विचारावे या संभ्रमात प्रियाला विचारले. '' एवढ्यात विजयची भेट वैगेरे झाली की नाही?''

'' नाही... का?'' प्रियाने आपले लिहिणे सुरु असतांनाच चेहऱ्यावर काहीही हावभाव न येवू देता म्हटले.

'' मग तुला तर माहित नसेल की ... विजयला ..''

'' काय झालं विजयला? '' प्रियाने राजेशचं वाक्य अर्धवट तोडीत पॅडवरचे लिहिणे सोडून त्याला विचारले.

'' नाही मी म्हटलं तुला माहित असेल?'' राजेश.

'' आता काय झालं ते तरी सांगणार आहेस का?'' प्रिया जवळ जवळ चिडूनच म्हणाली.

'' नाही... त्याच्या कंपनीने त्याला टर्मीनेट केलं आहे म्हणे''

'' काय टर्मीनेट केलं?... पण का?''

'' त्याच्या बॉसच्या मुलीशी त्यांच काहीतरी झालं म्हणतात?'' राजेश.

'' म्हणजे तू अजून त्याला भेटला नाहीस?''

'' भेटलो ना ... पण तो व्यवस्थित असं काहीच सांगत नाही आहे.... हे जे मला कळलं ते दुसऱ्यांकडूनच कळलं '' राजेश.

'' त्याच्या बॉसच्या मुलीशी... पण त्याचं तर तिच्यावर प्रेम आहे'' प्रिया.

'' काय?... प्रेम?... अगं पण प्रेम तर तू...''

राजेश काय बोलणार हे ओळखून प्रियाने त्याचं वाक्य अर्ध्यावर तोडलं आणि खुर्चीवरुन उठून उभी राहत, घाई करीत म्हणाली, '' आणि इतका वेळपासून हे तू मला आता सांगतोस...''

राजेश काही स्पष्टीकरण द्यायच्या आधीच ती दरवाज्याकडे जात म्हणाली, '' चल .. मला ताबडतोब त्याला भेटायला गेलं पाहिजे... आणि तुला कदाचित माहित नसेल पण त्या नौकरीचंही त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी किती महत्व होतं ते''

प्रिया क्लिनिकमधून थेट निघाली ते विजयच्या घरी येवनच थांबली. तिने फाटकातून आत डोकावून बघितले. तिला आठवले ती आधीही अशीच फाटकातून डोकावून आत बघायची आणि तिची नजर सगळीकडे विजयला शोधायची. पण आज सगळीकडे कशी स्मशानवत शांतता वाटत होती. जणू घरात कुणी राहतच नसावे. कितीतरी दिवसांचे जूने, कितीतरी दिवसांपासून डागडूजी न केलेले कौलाचे ते गव्हर्नमेंट क्वार्टर त्या शांततेत अजुनच भर घालीत होते. तेवढ्यात तिला बाहेर अंगणात, एका कोपऱ्यात थोडी हालचाल जाणवली. तिने अजून वाकुन बघितले तर तो विजय होता. एकटाच खुर्चीवर विचारमग्न अवस्थतेत बसला होता. प्रिया फाटक उघडून आत गेली. तरीही त्याचं लक्ष नव्हतं. कितीतरी दिवसांची दाढी वाढलेली, अशा अवस्थतेत तो समोरच्या एका खुर्चीवर पाय लांब करुन विचारमग्न झालेला दिसत होता.

'' विजय...अरे काय... काय हाल करुन घेतलेस?'' प्रियाने त्याच्याजवळ जात विचारले.

विचारांच्या दुनियेतून बाहेर येत त्याने तिच्याकडे बघून एक स्मित हास्य दिले. पण त्याच्या चेहऱ्यावर तसा कसलाच तणाव जाणवत नव्हता. आणि त्याचा जबरदस्त अबाधीत आत्मविश्वास अजूनही त्याच्या चेहऱ्यावर चमकत होता.

ती त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाली, '' राजेश भेटला होता,... म्हणत होता की तूला कंपनीने...''

'' टर्मीनेट केलं ... '' तो तिचं अर्धवट वाक्य पुर्ण करीत म्हणाला.

टर्मीनेट झाल्याची जराही खंत त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.

'' पण का?... असं एवढं झालं तरी काय?'' प्रियाने आपली काळजी व्यक्त करीत विचारले.

'' अगं काही नाही... विशेष असं काही नाही... '' तो पुन्हा शांतपणे म्हणाला.

'' आणि मला सांगण्याची तसदीही तुला घेवू वाटली नाही... '' प्रिया आपली नाराजी व्यक्त करीत म्हणाली.

'' अगं विशेष असतं तर तुला सांगितलं असतं... पण काही विशेष नव्हतं म्हणून गरज वाटली नाही मला'' तो म्हणाला.

'' गरज ?... अच्छा म्हणजे काही गरज असली तरच सांगणार?'' पुन्हा ती नाराज होत म्हणाली.

'' अगं खरंच काहीच नाही...'' तो समोरच्या खुर्चीवरुन आपले पाय उचलीत, निट बसत म्हणाला.

'' मग ही दाढी वैगेरे काय वाढवून घेतलीस? ... मजनूसारखी'' ती त्याला सोडायला तयार नव्हती.

'' अगं ... आता टर्मीनेट झाल्यामुळं... सध्यातरी ऑफीसची भानगड नाही राहाली... म्हणून नाही केली दाढी बस एवढंच'' तो म्हणाला.

'' ते काही असो... मला तुला सगळा प्रकार सांगावाच लागेल'' तीही आता हट्टाला पेटली होती.

'' बरं बाबा ..सांगतो'' विजय.

विजय आपली हकिकत सांगू लागला...

क्रमश:...

Republic Day Quotes :
"India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great grand mother of tradition. Our most valuable and most artistic materials in the history of man are treasured up in India only!"

... Mark Twain (Writer, America)

"If there is one place on the face of earth where all the dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India!"
... - Romaine Rolland (French scholar)

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. pudhche parts post karana patkan

  ReplyDelete
 2. next one when? khup adhir jhaley wachayala..

  ReplyDelete
 3. KHUP CHAN VATE VACHAYALA
  NAVIN POST LAVKAR NYEVUDYA

  ReplyDelete
 4. really nice please post next chapter earlier

  ReplyDelete
 5. Nice one, can't take it away while reading..please post next chapters soon

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network