Read Online Novel - Mrigajal - Ch - 30

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Inspirational Quotes of the day -
A Rs.2 pencil and a dream can take you anywhere.
... Joyce A. Myers

Belief creates the actual fact.
... William James

Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add color to my sunset sky.
... Rabindranath Tagore

आज विजयच्या कंपनीचा वार्षिक दिवस होता. वार्षिक दिवस म्हणजे कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक मेजवानीच असे. वार्षिक दिवस त्यांच्या कंपनीमधे फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे. तसा बऱ्याच कंपन्यांमधे तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या दिवशी ऑफीसच्या कामाचा सर्व ताण विसरुन सर्व कर्मचारी तो दिवस मोठ्या आनंदाने साजरा करीत. दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स , जसे क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन इत्यादी होत. आणि दिवसभर वेगवेगळे गेम्स खेळून थकल्यानंतर संध्याकाळी एक मनोरंजनाचा सांस्कृतीक कार्यक्रम होई. सांस्कृतीक कार्यक्रम म्हणजे नाच गाणे आर्केस्ट्रा असला प्रकार व्हायचा. त्यात बाहेरच्या लोकांसोबत आतले लोकही आपली नाचण्या गाण्याची हौस फेडून घेत. आणि तो कार्यक्रम संपल्यावर रात्री मोठी जंगी पार्टी असे. पार्टीची सुरु होण्याची वेळ, 9 वाजताची ठरलेली असे, पण पार्टी संपण्याची वेळ कधीच ठरलेली नसे. जो जितका वेळ थांबुन एन्जॉय करु शकत असे तेवढा वेळ थांबण्यास प्रत्येकास मुभा होती. आज अक्षरश: कुणावरच काही बंधन नसे. त्यामुळे पार्टी साधारणत: सकाळी तिन वाजेपर्यंत चालायची. दुसऱ्या दिवशी ऑफीसला सुटी असायची त्यामुळे सगळे जण अगदी मनसोक्त उशीरापर्यंत खात पित असत.

तसा विजयचा हा पहिला वहिलाच वार्षिक उत्सव. पण विजय या दिवसाबद्दल आधी बऱ्याच जणांकडून ऐकून होता. आज दिवसभर त्याने क्रिकेट, टी,टी, कॅरम, अगदी जेवढे शक्य होतील तेवढ्या खेळांत भाग घेवून मनसोक्त आनंद लूटला होता. आणि प्रत्येक खेळाच्या वेळी नयना अगदी आवर्जुन हजेरी लावून त्याचा उत्साह द्वीगुणीत करीत होती. म्हणून त्याला थकवा असा खास जाणवलाच नाही. संध्याकाळी अगदी तिच्या खुर्चीला खुर्ची लावून त्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचा आनंदही लूटला. आणि आता सगळ्या दिवसाचा आनंद लूटण्याचे शिखर म्हणजे पार्टी सुरु झाली होती. पार्टीत आज कुणालाच काहीही खाण्यापासून तर पिण्यापर्यंत काहीच बंधनं नव्हती. अगदी मद्याचे बियर, रम व्हिस्की, व्होडका, रेड वाईन, सारखे सर्व प्रकार उपलब्ध करुन देण्यात आले होते. मद्य घेणारे तर या संधीचा फायदा घेतच पण मद्य न घेणारे किंवा कधी कधी घेणाऱ्यांनाही या संधीचा फायदा घेण्याचा मोह आवरत नसे.

झाले दिवसभर गेम्स, नंतर संध्याकाळी सांस्कृतीक कार्यक्रम आटोपल्यावर सर्व जण पार्टीसाठी वेळेच्या थोडे आधीच उपस्थीत झाले. जमलेले सर्व जण पार्टीसाठी छोटे छोटे घोळके करुन उभे होते. आणि दिवसभराच्या खेळाच्या, संध्याकाळच्या सास्कृतिक कार्यक्रमाबद्दल गप्पा सुरु झाल्या. पार्टी ओपन लॉनमधेच आयोजित करण्यात आली होती. लॉनच्या चार कोपऱ्यावर चार वाईनचे आणि कोल्ड ड्रिंक्सचे काऊंटर होते. प्रत्येक काऊंन्टरवर दोन दोन कॅटरींगचे स्टाफ वाईन सर्व्ह करण्यास अगदी टापटीप यूनिफॉर्ममधे उपस्थित होते. सगळी व्यवस्था कशी एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारखी करण्यात आली होती. गप्पा करतांना सगळ्यांच्या नजरा इकडे तिकडे फिरून शेवटी त्या वाईन काऊंटरवर स्थिरावत. पण अजून बॉस यायचे होते त्यामुळे कुणाचीही ड्रीक्स सुरु करण्याची हिंम्मत होत नव्हती. बॉस आल्याशिवाय ड्रिक्सच काय तर कुणी पाणी पिण्यासही धजावत नसे. न जानो बॉस यावा आणि त्याने आपल्या हातातला ग्लास व्होडकाचा आहे समजून उगीच काहीतरी गैरसमज करुन घ्यावा. प्रत्येक पार्टीत बॉस आल्याशिवाय काहीच सुरु करायचे नाही हा अलिखीत नियम अगदी आवर्जून पाळल्या जायचा. त्यामुळे सर्वजण आपापल्या गप्पांत मग्न असलल्यासारखे जरी जाणवत असले तरी त्यांचं पुर्ण लक्ष दरवाज्याकडे होतं. केव्हा एकदाचा बॉस येतो आणि केव्हा एकदाचे आपण्या त्या ड्रींक्सवर तुटून पडतो असे त्यांना झाले होते. तेवढ्यात प्रवेशदाराजवळ लोकांची चलबिचल आणि धावपळ दिसली. आणि ती चलबिचलीची लहर दरवाजापासून सुरु होवून सगळ्या उपस्थित लोकांपर्यंत पोहोचली.
म्हणजे बॉस आले वाटतं...
सगळ्या लॉनमधे उपस्थित लोकांमधे शांतता पसरली आणि सगळेजण वळून प्रवेशद्वाराकडे बघू लागले.
हो बरोबर... बॉसच आले होते....
बॉसने आल्याबरोबर कुणाला हसून, कुणाचा खांदा थपथपून तर कुणाला; मुख्यत: स्रियांना नमस्कार करुन अभिवादन केले. बॉसच्या मागोमाग त्यांची मुलगी नयना आणि पत्नीनेही लॉनमधे प्रवेश केला होता. बॉसची पत्नी आणि मुलगी म्हटल्यावर काय, चमचे लोकांचा तर त्यांची वर वर करण्यासाठी जणू उत आला होता.

'' अरे ... आज पार्टी आहे... आपली वार्षिक पार्टी ... आणि सगळे जण असे मरगळल्यासारखे शांत का?... आणि हे काय ? ... कुणाच्याच हातात अजून ग्लास कसा नाही...'' बॉसने समोर येवून जणू तेथील उपस्थितांची फिरकी घेतली.

खरंतर कुणाच्या हातात मद्याचा ग्लास दिसला असता तर बॉसने त्याची आपल्या डोक्यात कुठेतरी नोंद घेवून त्याला पुढे कधीतरी कसा धडा शिकवायचा हे निश्चीत केले. पण बॉस म्हटल्यावर खायचे आणि दाखवायचे दात वेगळेच. काही जण हसू येत नव्हतं तरी जबरदस्ती एखाद्या मिंध्यासारखे हसायला लागले. विजयला अशा चमचा लोकांचा नेहमीच तिटकारा असे. त्याला माहित होतं की ज्या लोकांमधे टॅलेंट नसतं ते लोक अशा चमचागीरीचा आधार घेतात. पण अशी चमचागीरी खपविणाऱ्या बॉसचाही विजयला नेहमीच तिटकारा वाटत असे. पण त्याच्या बॉसची पोजीशन जरा वेगळी असल्यामुळे तो त्यांचा तिटकारा करु शकत नसे,. पण कधी संधी मिळाल्यास तो या बाबतीत आपल्या बॉसशी नक्कीच बोलणार होता. कारण हेच ते लोक होते की जे चमचागीरी करुन कधी कधी पुढे जाण्यात यशस्वीसुध्दा होत होते. आणि अशा लोकांमुळेच कंपनीत खरोखर टॅलेंट असणाऱ्या लोकांची कदर कमी होत होती. एकूण काय तर अशा लोकांमुळेच कंपनीचं वातावरण दूषीत होत होतं. आणि आता जरी वाटत नसलं तरी ते कंपनीच्या पुढील भविष्यासाठी घातक होतं.

बॉसने पार्टीत प्रवेश केल्यानंतर मात्र पार्टीचा पुर्ण नूरच बदलून गेला होता. कुणीतरी एका चमचाने स्वत: पुढाकार घेवून बॉसचा ग्लास बनविला आणि स्वत: त्यांच्या हातामधे नेवून दिला. बॉसने ड्रींक्सचा पहिला घोट घेतला आणि सगळे लोक आता आपापले ड्रींक्स घेण्यास मोकळे झाले होते. लोकांनी लॉनच्या चार कोपऱ्यांवर गर्दी केली. बॉटलचे, ग्लासचे, आवाज सगळीकडून येवू लागले होते. मित्रांच्या आग्रहाखातर विजयनेही मोठ्या मुश्किलीने बियरचा ग्लास घेतला होता. आधी कॉलेजमधे असतांना त्याने बियर एक दोन वेळा घेतली असेल. एक गंम्मत म्हणून, लोक एवढं बियर बियर म्हणतात चला एकदा त्याची चव तर बघावी म्हणून त्याने आधी एकदोन वेळा बियर घेतली होती. तशी त्याला बियर कधीच आवडली नव्हती. पण एक सोशल प्रेशर म्हणून बऱ्याच वेळा घ्यावी लागते. तरीही बियरच्या पलिकडे कधी जायचे नाही हे त्याने आपल्या वडीलांच्या स्थितीकडे पाहून मनाशी पक्के ठरवले होते. आज बऱ्याच मित्रांचा त्याला व्हिस्की घेण्यासाठी किंवा कमीत कमी रम घेण्यासाठी आग्रह झाला. पण विजय मनाशी एकदा पक्का ठरविलेला नियम सहसा कधीच तोडत नसे. तो नियम त्याने आजही कायम राखला होता.

पार्टी सुरु होऊन अर्धा एक तास झाल्यानंतर विजयच्या सोबतचे सोबती मित्र आता चांगले बरळायला लागले होते. विजयच्या हातात बियरचा पहिलाच अर्धा ग्लास अजूनही शिल्लक होता. आजूबाजूचे लोक वायफळ बरळायला लागल्यानंतर सुरवातीला त्याला त्यांची या अवतारात बघुन मजा वाटत होती. कोण आपल्याबद्दल काय विचार करतो हे समजून घेण्यास हा एक चांगला मौका होता. पण थोड्या वेळानंतर त्यांचं बरळणं आणि बोलण्यामधे तोच तो पणा आल्याने मात्र त्याला बोअर होवू लागलं होतं. त्याने लॉनमधे चौफेर आपली नजर फिरवली. त्याची नजर आता नयनाला शोधत होती. लॉनच्या एक कोपरा पुर्णपणे स्रियांनी व्यापला होता. तिकडे एका खांबाच्या पलिकडे घोळक्यात त्याला नयना दिसली. तिच्या हातात कोल्ड्रींक्सचा ग्लास होता आणि ती आपल्या मैत्रिणीसोबत गप्पांत गुंग होती. तो हातात ग्लास घेवून त्या कोपऱ्यातल्या वाईन सर्व्हींग काऊंटरकडे जायचं निमित्त करुन उगीच तिच्यासमोरुन घूटमळत तिकडे गेला. जातांना त्यांची नजरा नजर झाली. दोघंही एकमेकांकडे पाहून गोड हसले. काउंटरवर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की इथे तर बरीच गर्दी आहे. आणि आपल्याला तसे काही घ्यायचे नाहीच तर इथे उगीच का थांबायचे. म्हणून पुन्हा त्याने जिकडे नयना आपल्या मैत्रिंणीसोबत होती तिकडे आपली नजर फिरवली. अजूनही नयना आणि तिच्या मैत्रीणींचा आवाज येत होता. तो कान टवकारुन ऐकण्याचा प्रयत्न करीत होता.
पण नाही ... आवाज येतो आहे पण त्या काय बोलताहेत काही बोध होत नाही.
त्याने पुन्हा आजुबाजुला बघीतले.
तिथे आपण त्या पडद्याच्या शेजारी उभं राहून त्यांच्या गप्पा ऐकल्या तर.....
त्याने विचार केला.

क्रमश:...

Inspirational Quotes of the day -
A Rs.2 pencil and a dream can take you anywhere.
... Joyce A. Myers

Belief creates the actual fact.
... William James

Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add color to my sunset sky.
... Rabindranath Tagore

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

6 comments:

 1. utsukta vadhliye pudhachi post lavkar taka

  ReplyDelete
 2. interesng mode...eagerly waiting for next post

  ReplyDelete
 3. सुंदर चालली आहे कथा पुढचे भाग लवकर येऊ दे

  ReplyDelete
 4. Itkya diwasanantar ekach part.. not fare.. Please write fast

  ReplyDelete
 5. next please......

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network