Current Novel - Mrigajal -Ch-32

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Love Quotes : 

Anything will give up its secrets if you love it enough. Not only have I found that when I talk to the little flower or to the little peanut they will give up their secrets, but I have found that when I silently commune with people they give up their secrets also - if you love them enough.
...George Washington
We are shaped and fashioned by what we love.
...Johann Wolfgang von Goethe
Life is the flower for which love is the honey.
...Victor Hugo

नयनाच्या वडीलांनीही त्याला आपल्या मुलीचा भावी साथीदार म्हणून हेरले होते...
विजयच्या आनंदास खरोखर पारावार उरला नव्हता. गोष्टी इतक्या पटापट आणि अनपेक्षीतपणे घडत होत्या की त्याचा विश्वासच बसत नव्हता. विषेश म्हणजे त्याला स्वत: होवून काहीही प्रयत्न न करता गोष्टी घडत होत्या.
यात नयनाचाच हात दिसतो...
विषेशत: तिच्या वडीलांची सहमती मिळविण्यास...
कदाचित तिच्यातला आणि तिच्या वडीलातला बॉंड स्ट्रॉग दिसतो...
आणि कदाचित त्यांचं नातं वडील आणि मुलगी यापेक्षा मैत्रीचं जास्त असलं पाहिजे...
कदाचित तिच्याबाबतीत घडत असलेली प्रत्येक गोष्ट अगदी रोज ती न चुकता तिच्या वडीलांना सांगत असली पाहिजे...
खरंच वडील आणि मुलांमधे असं नातं असायला पाहिजे...
नाहितर आपले वडील बघा... सारखे दारुच्या नशेत असतात...
आई आणि वडील यामधेच काही बॉंड नाही तर ...
वडील आणि मुलं ही फार दुरची गोष्ट झाली...
विजय विचार करत होता.
ती गोष्ट मित्रांना सांगण्याच्या विचारात असलेला विजय तसाच तिथे थांबला.
या सर्व गोष्टीसाठी आपण काहीही प्रयत्न किंवा पुढाकार घेतलेला नाही आहे...
पण आता योग्य वेळ आली आहे की आता आपल्यालाही काहीतरी केलेच पाहिजे...
आणि आता तर आपल्याला दोन्हीकडूनही म्हणजे नयनाकडून आणि तिच्या वडीलांकडून अगदी स्पष्ट ग्रीन सिग्नल मिळालेला आहे...
तिच्या वडीलांची सहमती सगळ्यात महत्वाची ...
त्याने क्षणाचाही विलंब न लावता मनातल्या मनात एक योजना आखली.
तुर्तास मित्रांना ही गोष्ट सांगण्याचे रहीत करावे...
त्या पेक्षा ही योजना जर अंमलात आणली तर एकाच दगडात कितीतरी पक्षी मरणार होते...
म्हणून जास्त वेळ न घालविता ती योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तो कार्यरत झाला सुध्दा.

स्टेजवर अजुनही डीजेचं संगीत सुरु होतं. एव्हाना काही लोकांनी आता त्या संगीताच्या ठेक्यावर थीरकण्यास सुरवात केली होती. जे लोक कधी नाचत नव्हते किंवा जे लोक कधी नाचू शकतात असे विजयला स्वप्नात देखील वाटले नव्हते असे लोक नाचत होते. ही सगळी त्या मद्याची जादू... दूसरे काय?. जसे लोक नाचून, टाळ्या वाजवून स्टेजवर सुरु असलेल्या संगीताला दाद देत होते तसा डीजेचा उत्साह द्वीगुणीत होवून ते आता जरा फास्ट बीटचं संगीत वाजवू लागले. जुन्या संगीतापासून सुरु झालेली मैफील आता नविन आणि फास्ट ठेक्याच्या संगीतापर्यंत येवून पोहोचली होती. आता आयटम सॉंगही कुणास वावगे राहाले नव्हते त्यामुळे एकदोन आयटम सॉंगही वाजवून झाले.
''गाणं कसलं वावगं... त्यावर नाचून ऐन्जाय करायचं...''
''ऐन्जॉयमेंट सर्वात महत्वाचं...''
एकदोन जणांत बोलूनपण झालं. त्यातच ऑफीसच्या एकदोन हौशी गायकांनी स्टेजवर जावून गाणे गावून आपली हौस भागवून घेतली होती. हा कधी न पाहालेला प्रकार पाहून विजयचंही रक्त आता सळसळायला लागलं होतं. प्रश्न आता थोडी हिम्मत एकवटण्याचा होता. त्याने एकदा सगळीकडे नजर फिरवून ऐकून परिस्थीतीचा अंदाज घेतला. त्यातच त्याला काही लोक जे आपल्या बॉसशी बोलण्यास धजावत नसत मनमोकळेपणाने आपल्या बॉसशी गप्पा मारीत असलेले दिसले.
आपणही जावून आपल्या बॉसशी जावून बोलावे का?...
त्याच्या मनात आले.
पण त्यांच्याशी बोलणार तरी काय?..
की जावून सरळ नयनाशीच बोलावे?...
आणि आपल्या प्रेमाची कबूली देवून मोकळे व्हावे...
नाही त्यापेक्षा ही आपली योजनाच बरी...
चाललेल्या फास्ट बिटच्या गतीबरोबर त्याचे विचार गती पकडत होते.
मधेच त्याच्या बरोबरीच्या एका ऑफीसच्या कर्मचाऱ्याने स्टेजवर जावून एक फास्ट बीटचं गाणं गायलं, आणि अक्षरश: लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. आतामात्र विजयच्याने राहवल्या गेले नाही. त्याच्या सहकाऱ्याचे गाणे संपताच तो तरातरा चालत स्टेजवर गेला आणि त्याने त्याच्या सहकाऱ्याच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला. आता हा कोणते गाणे म्हणणार या उत्सुकतेने लॉनमधे शांतता पसरली होती. कारण विजय गाणे गातो हे कधी कुणाच्या ऐकीवात नव्हते. त्याने लॉनमधे उपस्थित लोकांवर एक नजर फिरवली. आणि एकाजागी त्याची फिरती नजर स्थिरावली. नयना त्याच्याकडे पाहून गोड हसत होती आणि मान हलवून त्याला प्रोत्साहन देत होती.
'' मित्रहो...'' विजयच्या तोंडून कसेबसे निघाले.
एवढ्यात आर्केस्ट्राचा संचालक विजयजवळ हळूच येवून त्याच्या कानाशी जावून विचारु लागला, ''सर आपण कोणतं गाणं म्हणणार आहात''
विजयने हातानेच त्याला रोकून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
'' मित्रहो.. आज मी इथे उभा आहे... ते काही गाणं म्हणण्यासाठी नाही'' विजय म्हणाला.
'' मग कशासाठी उभा आहेस?'' कुणीतरी ओरडलं.
'' आय ऍम हियर टू से समथींग '' विजय.
'' ऑफीशियल असेल तर खाली उतर ... '' कुणीतरी कमेंट पास केली.
'' हो गाण्याचा आणि नाचण्याचा चांगला मुड झाला आहे ... तो खराब नको करुस'' कुणीतरी कुजबुजलं.
'' नाही... इट इज नॉट ऑफिशीयल'' विजय म्हणाला.
'' देन यू कॅन प्रोसीड'' पुन्हा कुणीतरी ओरडलं.
'' टूडे आय ऍम व्हेरी हॅपी.. ऍंड ऑन धिस हॅपी ऑकेजन... आय हॅव समथींग टू से'' विजय.
'' व्हाट इज इट... जरा लवकर सांग बाबा'' पुन्हा कुणीतरी ओरडलं.
'' लीटील पेशन्स प्लीज'' विजय.
'' नो...'' आता मात्र बरेचजण ओरडले.
'' व्हाट आय वांट टू से इज दॅट... आय ऍम इन लव्ह'' विजय नयनाकडे पाहत म्हणाला.
'' ओ... हो...'' लोक जोरात ओरडले.
'' हू इज दॅट गर्ल '' कुणीतरी ओरडलं.
विजयने नयनाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य पाहून त्याची हिम्मत अजून वाढली.
'' दॅट गर्ल इज ... नयना... ऍन्ड आय टेक दिस ऍपॉरचुनिटी टू प्रपोज हर... नयना विल यू मॅरी मी प्लीज'' विजय स्टेजवरच गुढगे टॆकून तिच्याकडे पाहत म्हणाला.
हे ऐकुन नयनाचा चेहरा एकदम खर्रकन पडला होता.
बिचारी गोंधळली असेल...
विजयने विचार केला.
सगळ्या लॉनमधे एकदम स्मशानवत शांतता पसरली होती. जणू बऱ्याच जणांची दारुची नशा 'खाडकन' उतरली असावी.
लोकांना अपेक्षा नसल्यामुळे असे झाले असावे...
त्याने विचार केला.
विजयने तिरप्या नजरेने चोरुनच नयनाच्या वडीलांकडे बघितले. ते ही रागाने लाल लाल होवून त्याच्याकडे पाहत होते. आतामात्र विजयचे धाबे दणाणले.
कमीत कमी हे त्याला अपेक्षीत नव्हतं...
आपलं काय चुकलं?....
आपण जास्तीचा आतताईपणा तर नाही ना केला?...
की आपण दारुच्या नशेत काहीतरी बरळतो आहे असं तर नाही ना वाटत?...
त्याने स्वत:च्या सर्व हालचाली पडताळून पाहाल्या?...
दारुच्या नशेत तर आपण बिलकूल वाटत नाही आहोत?...
कारण आपण जरी घेतली असेल तरी एवढी घेतली नाही की आपण काहीही बरळूं...
आणि दारु म्हणजे काय तर आपण फक्त तिन ग्लास बियर तर घेतली आहे...
एवढ्याने तर आपल्याला कधी काही होत नाही...
मग आपलं चुकलं तर काय चुकलं?...
कदाचित वेळ आणि प्रसंग चुकला असावा...
विजय स्वत:शीच विचार करीत होता.

क्रमश:...

Anything will give up its secrets if you love it enough. Not only have I found that when I talk to the little flower or to the little peanut they will give up their secrets, but I have found that when I silently commune with people they give up their secrets also - if you love them enough.
...George Washington
We are shaped and fashioned by what we love.
...Johann Wolfgang von Goethe
Life is the flower for which love is the honey.
...Victor Hugo

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network