Daily Novel Posts - Mrugajal - Ch- 36

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Daily Thoughts:
prithee send me back my heart,
Since I cannot have thine;
For if from yours you will not part,
Why, then, shouldst thou have mine?
... John Suckling
Let your tears come.Let them water your soul.
...Eileen Mayhew

प्रिया जेव्हा नयनाच्या घरुन परत आली तेव्हा सत्य परिस्थितीची जाणीव होण्यापेक्षा अजुनच गोंधळलेली होती. नयनाची जी 'इमेज' तिच्या डोळ्यासमोर होती त्यापेक्षा ती कितीतरी वेगळी निघाली होती.

अश्याने तर जरी त्यांचं पुन्हा जुळून आलं तरी पुढे पटेल का?..

विजयने मोठ्या घराशी सबंध जोडण्याच्या नादात पुर्णपणे चुकीची तर सॉइस नाही ना केली...

कदाचित आपल्या कुटुंबाच्या भवितव्याच्या दृष्टीने तो एवढ्या मोठ्या लोकांशी सबंध जोडू पाहत असावा?...

पण या मोठ्या घराशी संबध जोडून त्याच्या कुटुंबाजे भवितव्य खरोखरच उज्वल होणार होते ... की तो त्याच्या कुटुंबापासून अजुनच दूर झाला असता?...

कि विजय म्हणतो तसे ते सगळेजण नाटक तर करीत नसावेत ?...

कदाचित नाटकच करीत असावेत... कारण ज्या प्रमाणे विजयने सांगितल्याच्या विपरीत त्यांचे वागणे वाटत होते... ते एक चांगले वठवलेले नाटकच असू शकते...

पण विजयने जो त्यांच्या नाटक करण्याचा उद्देश सांगितला होता तो अजुनही तिला पुर्णपणे पटला नव्हता...

थोडक्यात काय तर ती पुर्णपणे गोंधळलेली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात तिने राजेशलाही सहभागी करण्याचे ठरवले होते.

प्रियाने आज मुद्दाम राजेशला आणि विजयला संध्याकाळी अशोक पार्कमधे बोलवले होते. प्रिया आणि राजेश पार्कमधे आधीच आले की जेणेकरुन त्या प्रकरणावर जी चर्चा विजयच्या उपस्थितीत केली जावू शकत नव्हती ती आधीच केली जावी. राजेश आणि प्रिया बेंचवर बसून चर्चा करीत होते. विजय अजून आला नव्हता. प्रियाने विजयची बाजु ऐकल्यानंतर तिच्या मनाचा जो गोंधळ उडाला होता आणि तो गोंधळ कमी व्हावा म्हणून ती नयनाला भेटली होती. पण उलट गोंधळ अधिकच वाढला होता.

'' हे बघ मी दोघांच्याही बाजु नुसत्याच ऐकून नाही तर समजूनही घेण्याचा प्रयत्न केला आहे पण मी तरी कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नाही आहे'' प्रिया त्याला ती दोंघानाही भेटल्याची संपूर्ण माहिती थोडक्यात दिल्यानंतर म्हणाली.

'' अच्छा म्हणजे विजय खोटा बोलतो आहे असं तिचं म्हणणं आहे'' राजेश संपूर्ण गोष्टींचा सार आणि निष्कर्ष काढीत म्हणाला.

'' विजय खोटं बोलणार नाही याची मला शाश्वतीच नाही तर पुर्णपणे खात्री आहे'' प्रिया म्हणाली.

'' मलाही..'' राजेशने दूजोरा दिला.

'' पण मग नयना का खोटं बोलत असावी ?'' प्रियाने प्रश्न उपस्थित केला.

नयनाचं आणि विजयचं जर फिसकटलं तर एका दृष्टीने बरंच होईल...

कमीत कमी त्यांना पुन्हा एकत्र यायची संधी मिळेल...

राजेश विचार करीत होता. खरंतर तो मनातून खुप खुश झाला होता. पण वरवर तसं दाखवू शकत नव्हता.

'' तू जर म्हणतेस तशी ती नयना असेल तर त्यांचं वाजलं ते एका दृष्टीने बरंच झालं'' राजेश न राहवून म्हणालाच.

'' अरे... राजेश .. तु असं कसं बोलतोस... आज त्याच्या प्रेमावरच नाही तर त्याच्या नोकरीवरही गदा आली आहे आणि तू त्याच्यातून मार्ग काढायचा विचार सोडून ... जे झालं ते चांगलं झालं असं कसं म्हणू शकतोस...'' प्रिया चिडून म्हणाला.

'' असं नाही तर कसं म्हणू .... या विज्याला नोकरी लागल्यापासून त्याच्या डोक्यात हवा शिरली आहे... त्याला जवळचं कोण अन दूरचं कोण हेही कळेनासं झालं आहे..'' राजेशही चिडून म्हणाला.

'' पण हे बघ... राजेश... आता ही वेळ त्या गोष्टी करण्यास योग्य नाही आहे'' प्रिया त्याला आता समजावणीच्या सुरात म्हणाली.

राजेश काही न बोलता गप झाला. आणि प्रिया विजयची वाट पाहत आपल्या विचारांत गुंग झाली. याआधी असं कधीच झालं नव्हतं की विजयच्या प्रश्नासाठी प्रिया आणि राजेश चर्चा करीत बसले आहेत. उलट त्या दोघांना काही प्रश्न असल्यास विजयकडून ते मार्गदर्शन घेत. आणि तो चुटकीसरशी त्यांचे प्रश्न सोडवतही असे. आज जिवनभर जो तिचा मार्गदर्शक राहाला होता त्यालाच कदाचित आज मार्गदर्शनाची गरज होती... प्रिया विचार करीत होती.

'' तिच्या वडीलांचं दडपण.... किंवा दबाव असला पाहिजे तिच्यावर'' इतका वेळ पासून विचार करीत असलेला राजेश शेवटी एका निष्कर्षापत पोहोचला.

'' हो तुझं म्हणणं बरोबर आहे... तिच्या वडीलांचा दबाव, दडपण मलाही तिच्यावर स्पष्ट जाणवत होतं.'' प्रिया म्हणाली.

'' किंवा तिची काही मजबूरी असावी की ज्यामुळे ती खोटं बोलत असावी'' राजेश.

'' अशी काय मजबूरी असावी?'' प्रिया.

'' किंवा त्यांची जरी इच्छा असली तरी त्यांना निर्णय एवढ्या लवकर घ्यायचा नसेल'' राजेश.

'' पण असे का?'' प्रिया.

'' कारण तेवढ्यात अजुन एखादा विजयपेक्षाही चांगला मुलगा मिळाला तर'' राजेश.

'' पण ते असा कसा विचार करु शकतात'' प्रिया.

'' अगं हे मोठे लोक फार प्रोफेशनल असतात... यालाही हाताशी ठेवतील... आणि तेवढ्यात दुसरा एखादा चांगला मिळाला तर याला डावलून त्याच्याशी तिचं लग्न लावण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत'' विजय.

'' हो ... तू म्हणतोस तसं ते अती प्रोफेशनल असलेले मलाही जाणवलं खरं... पण तरीही मला नाही वाटत की ते असं करतील'' प्रिया.

तेवढ्यात त्यांना विजय समोरुन येतांना दिसला.

'' अरे काय केवढा वेळ?'' राजेश आपल्या घड्याळाकडे बघत म्हणाला.

'' कुठे वेळ कुठे... मी तर बरोबर वेळेवर आलो... अगदी इंडीयन स्टॅडर्ड टाईम नुसार... तुम्हीच लेकाचेहो लवकर आलात... नेहमी प्रमाणे'' विजय हसून म्हणाला.

प्रियाने आपल्या घड्याळाकडे बघितले. चांगला अर्धा तास तो उशीरा येत होता. सहसा तो असा उशीरा कधी येत नसे. आणि आलाच तर तशी दिलगीरी व्यक्त करीत असे. प्रियाला आज विजयमधे एक वेगळाच बिनधास्तपणा दिसत होता.

प्रेमात पडल्यावर असं होत असेल कदाचित...

किंवा नयनाच्या संगतीचा परिणाम असावा..

तिने विचार केला.

तो जवळ येताच, ते बेंचवर बसले. एक दोन क्षण काही न बोलता गेले. कुणी काहीच बोलत नाही हे पाहून विजयनेच सुरवात केली , '' बोला काय विशेष ... मला कशाला बोलावलंस इथे... राजेशलाही बोलावलंस म्हणजे विषय काहीतरी गंभीर आहे असं दिसतं''

'' का म्हणजे काहीतरी गंभीर असेल तरच मी येतो असं तुला म्हणायचं आहे का?'' राजेशला त्याचा तो टोमणा सहन न होवून तो चिडून म्हणाला.

'' अरे... येवढं चिडायला काय झालं... काहीतरी गंभिर असल्यावरच तू येतोस... असा जरी त्याचा अर्थ निघत असला तरी ... कुणीतरी एकदम मेल्यावरच जाण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच की'' विजय त्याला अजुनच खोचून बोलला.

राजेश पुरता चिडला होता पण रागाच्या भरात आता याला काय उत्तर द्यावे त्याला काही सुचत नव्हते.

'' काय विजय.. असं काय बोलतोस तू ... एकदमे मेल्याबिल्याच्या गोष्टी'' आता प्रियाही चिडली होती.

'' अगं एक दिवस प्रत्येकालाच मरायचं असतं... त्यामुळे मरण्याचा एवढा बाऊ करायचं काही कारण नाही'' विजय.

इतक्या दिवसानंतर प्रथमच प्रियाने पुन्हा विजयच्या फिलॉसॉफर शैलीत काहीतरी ऐकले होते. त्यामुळे तिला त्यातल्या त्यात बरे वाटले.

पण तसे काही न बोलता किंवा चेहऱ्यावर न दाखवता ती पुढे सरळ मुद्द्यालाच हात घालीत म्हणाली, '' मी नयनाच्या घरी गेले होते...'' प्रियाने सरळ मुद्द्यालाच हात घातला.

कारण तिला पुन्हा गोष्टीना वेगळे वळण नको होते.

'' नयनीकडे होय... काय म्हणाली ती'' विजयने आतूरतेने विचारले.
'नयनी' शब्दात तर त्याचे तिच्याबद्दलचे ओतप्रोत भरलेले प्रेम दिसत होते.

राजेशला तर त्याचे असे प्रेमाने 'नयनी' उच्चारने मुळीच आवडलेले दिसत नव्हते.

'' पण तिचं थोडं वेगळच म्हणणं आहे'' प्रियाने एकदम कसं सांगावं असा विचार करुन थोडी वेळ मारुन नेली.

'' काय म्हणणं आहे ... म्हणजे तसे आम्ही हुंड्याबिंड्याच्या अगदी विरोधात आहोत '' विजय त्यातल्या त्यात गंमत करण्याच्या प्रयत्नात म्हणाला.

'' विजय ... गोष्ट ... गमतीवर नेण्याइतपत साधी नाही आहे'' प्रिया नाराजी व्यक्त करीत म्हणाली.
राजेशने तर जणू काहीच बोलायचे नाही असे ठरविलेले दिसत होते. त्याला वाटले आपण बोललो तर पुन्हा विषय दुसरीकडेच भरकटेल. म्हणून तो चुपच होता.

'' मग .. काय म्हणणं आहे तिचं'' विजय.

'' तिचं म्हणणं आहे की... ती तुझ्यावर प्रेम वगेरे काहीच करीत नाही... तसं मी तिला सरळच विचारलं होतं... उलट प्रेम वैगेरे अशा ' फालतू' आणि 'चिप' गोष्टींवर तिचा विश्वास नाही असं ती म्हणत होती'' प्रियाने 'फालतू' आणि 'चिप' वर जरा वाजवीपेक्षा जास्त जोर देत सांगितले.

विजय एकदम जोरात हसला आणि मग पुढे म्हणाला, '' अगं तेच तर ... तेच तर मी तुला सांगत होतो... ती पण तिच्या वडीलांच्या नाटकात सामील आहे... ते दोघं मिळून नाटक करीत आहेत माझ्यासोबत... अगं ती आणि तिचे वडील म्हणजे पक्की एक नाटक कंपनी आहे ... त्यांच्या नाटकामुळे तर कंपनीत कधी कधी चांगल्या चांगल्याचा जिव भाड्यात पडतो''

'' आणि नुसते एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिच्या वडीलांनी माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी कंपनीतला एक माणूस ठेवला आहे... तो सारखा माझा पाठलाग करतो... आणि लपून - लपून माझं निरिक्षण करतो...मी दिवसभर कुठे कुठे जातो ... आणि काय काय करतो यावर त्याची बारीक नजर असते ... '' विजय म्हणाला.

प्रिया आणि राजेशच्या संभ्रमयुक्त चेहऱ्याकडे पाहून पुढे तो म्हणाला, '' तुम्हाला खोटं वाटतं... अगं कुणालाही खोटंच वाटेल... बरं... एक काम करा जरा इकडं या...''
त्याने दोघांनाही तिथून उठवले आणि तो त्यांना थोडं बाजुला पार्कच्या कुंपनाकडे एका झाडाच्या बुंध्याच्या आडोशाला घेवून गेला.

'' असंच आडोशाला रहा आणि जरा तिकडे बघा... आवाराच्या बाहेर त्या झाडाच्या मागे... आतापण आमच्या ऑफिसच्या त्या माणसाची कार उभी आहे... आणि कारमधून बघ तो कसा इकडेच बघत आहे...'' विजय बोलत होता.

प्रियाने आणि राजेशने त्याने निर्देश केलेल्या दिशेने त्या झाडाच्या आडोशाला राहातच आश्चर्याने बघितले. त्याने दाखविलेल्या जागेवर एक मोठं झाड होतं खरं पण झाडाच्या मागे कार नव्हती.

प्रियाने आणि राजेशने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले आणि त्यांच्या तोंडून एकदम निघाले, '' कुठे...?''

'' अरे ... ते काय तिथे... तिकडे बघा ना पिंपळाच्या झाडाच्या मागे...'' विजयने आपल्या हाताने इशारा करुन दाखविले.

तिथे पिंपळाचे झाड होते हे खरे पण झाडाच्या मागे ना कार होती ना कुणी माणूस होता. आता मात्र प्रियाला विजयची काळजी वाटायला लागली होती. राजेशला तर काहीच समजत नव्हते.

'' बरं ते जाऊद्या ... ते तिकडे बघा फाटकाकडे ... आता तिकडून तर खुद्द नयनाच आली आहे... तिला प्रत्यक्ष माझ्यासमोर विचार की ती माझ्यावर प्रेम करते की नाही..'' विजय बगीचाच्या फाटकाकडे निर्देश करीत म्हणाला.

राजेशने आणि प्रियाने पुन्हा चमकुन बगिच्याच्या फाटकाकडे बघितले.

'' नयना कुठे?...'' राजेशने फाटकाकडे बघत विचारले, कारण तो नयनाला ओळखत नव्हता.

पण '' नयना कुठे?...'' तेच शब्द प्रियाच्याही तोंडून आश्चर्याने निघाले होते, जरी ती नयनाला ओळखत होती.

तिकडून फाटकाकडून नयनाच काय... कुणीही येत नव्हतं.

'' ते काय येड्या तिकडं...'' विजय पुन्हा पुन्हा निर्देश करुन दाखवत होता.

आणि राजेश संभ्रमाने कधी त्याने निर्देश केलेल्या दिशेने, कधी विजयकडे , तर कधी प्रियाकडे बघत होता.
प्रियाच्या लक्षात हा सगळा प्रकार काय आहे हे यायला वेळ लागला नाही. तिच्या स्मृती पटलावर एका मागुन एक विजयच्या वेड्या बहिणीची चित्र झळकुन जात होती. तिच्या तोंडातून गळणारी लाळ, तिचे मोकळे सोडलेले केस.. तिच्या काळजात एकदम चर्र झाले.

तिला विजयने एकदा त्याच्या बहिणीची हकिकत सांगतांनाचे ते शब्द आठवले - '' माझी बहिण वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत एकदम नॉर्मल होती ... पण नंतर अचानक तिला वेडाचे झटके यायला लागले होते ...''

'' माय गॉड!'' प्रियाच्या तोंडून अनायसेच निघाले.

'' काय झालं?'' राजेशने आता तिच्याकडेही आश्चर्याने बघत विचारले.

प्रियाला आता पटत होते की नयना कदाचित खरं बोलत होती.

क्रमश:..
.
Daily Thoughts:
prithee send me back my heart,
Since I cannot have thine;
For if from yours you will not part,
Why, then, shouldst thou have mine?
... John Suckling
Let your tears come.Let them water your soul.
...Eileen Mayhew

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. interesting......i am very eager for the next chapter......

  ReplyDelete
 2. Very nice turn....Go ahead....waiting for next post..

  ReplyDelete
 3. khup chan .
  pls post next chapter soon

  ReplyDelete
 4. hay
  u r stretching our patience
  please b fast

  ReplyDelete
 5. khrach hi real story aahe???

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network