Literature - Novel - Mrugajal - Ch- 33

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Broken Heart Quotes -
Giving up doesn't always mean you are weak; sometimes it means that you are strong enough to let go.
... Author Unknown
Sometimes, when one person is missing, the whole world seems depopulated.
...Lamartine
When love is lost, do not bow your head in sadness; instead keep your head up high and gaze into heaven for that is where your broken heart has been sent to heal.
...Author Unknown

.... विजयने आपली आपबीती सांगीतली आणि एक मोठा सुस्कारा सोडून प्रियाकडे चेहरा करुन बसून राहाला. दिसायला तर तो प्रियाकडे बघत आहे असे जाणवत होते. पण तो प्रियाकडे नसून शुन्यात बघत होता. प्रिया तो अजून पुढे काय सांगतो हे ऐकण्यासाठी वाट पाहू लागली. प्रियाला वाटले तो मधे थोडा थांबून पुढे पुन्हा सांगेल.

पण बराच वेळ झाला तरी तो अजून काहीच बोलत नाही हे पाहून प्रिया म्हणाली, '' मग ... पुढे काय झालं?''

'' मग पुढे काय.... जे झालं ते सर्व तर मी सांगीतलच की'' विजय.

'' नाही पण तू... तुला त्यांनी टर्मीनेट का केलं .... किंवा पुढे काय झालं की त्यांनी तुला टर्मीनेट करण्याएवढी मोठी स्टेप घेतली हे तू सांगीतलं नाहीस...'' प्रियाने विचारले.

'' मग काय ... दुसऱ्या दिवशी सुटी होती... सगळे आधल्या दिवसाच्या गतीविधीमुळे आणि रात्री उशीरा चाललेल्या पार्टीमुळे थकले होते... मी तर दुसऱ्या दिवशी पुर्ण दिवसभर झोपलो होतो... आणि तिसऱ्या दिवशी ऑफीसमधे गेलो तर काही ध्यानी मनी नसतांना टेबलवर ठेवलेली टर्मीनेशन ऑर्डर माझी वाट पाहत होती'' विजय हसत हसत म्हणाला.

'' काय ... एकदम टर्मीनेशन ऑर्डर ... '' प्रिया.

'' हो ना मी तर एकदम बुचकळ्यातच पडलो होतो'' विजय.

''काहीही कारण न देता?... त्या ऑर्डरमधे तर काही कारण दिलं असेल'' प्रिया.

'' दिलं होतं ना... ड्यू टू सम अनअव्हायडेबल रिझन्स...वुई हॅव्ह नो अदर ऑपशन दॅन टू टर्मीनेट यू... दो ऍज पर रुल्स वुई आर अटॅचींग वुइथ दिस लेटर अ थ्री मन्थस सॅलरी चेक... सोबत एक चेक जोडलेला होता...'' विजय.

'' अनअव्हायडेबल रिझन्स... तुझ्यासोबत अजुनही कुणाला टर्मीनेट केलं की काय?'' प्रिया.

'' नाही,.. तशी मी चौकशी केली ... फक्त मलाच टर्मीनेट केलं त्यांनी '' विजय.

'' तू कारण माहित करण्याचा प्रयत्न नाही केलास?...'' प्रिया.

'' केलाना ... मी ताबडतोब .. नयनाला शोधण्याचा प्रयत्न केला तर माहित पडले की ती त्या दिवशी आणि पुढे जवळपास एक हप्ताभर सुटीवर होती,,, मग मी आमचा बॉस म्हणजे तिच्या वडीलांना भेटण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सेक्रेटरीने त्यांच्या पुढील एका हप्त्याच्या पुर्ण अपॉईंन्ट्मेंन्टस फुल असल्याचं सांगीतलं ... माझ्या सहकाऱ्यांनाही विचारलं तर कुणालाच काहीच माहित नसल्यांच कळलं...एवढच नाही तर मी नयनाच्या घरीही फोन करुन बघीतला तर ती कुठे बाहेरगावी गेल्याचं कळलं... बाहेरगावीही कुठे गेली हेही मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण तिच्या घरचे नौकर काही थांगपत्ता लागू देत नाहत'' विजय.

'' कदाचित त्यांना घरी सांगून ठेवलं असलं पाहिजे'' प्रिया.

'' हो असंच काहीतरी दिसतं..'' विजय.

'' म्हणजे स्पष्ट आहे ... की तू प्रपोज केल्याचीच घटना तुला टर्मीनेट करण्यास कारणीभूत झालेली दिसते..'' प्रिया.

विजय काहीच बोलला नाही.

'' तु जेव्हा तिला प्रपोज केलं तेव्हा तु पुर्णपणे शुध्दीवर होतास?'' प्रियाने विचारले.

'' अरे शुध्दीवर म्हणजे पुर्णपणे शुध्दीवर होतो... मी फक्त तिन ग्लास आणि तीही फक्त बियर घेतली होती'' विजय.

'' तुझ्या वडीलांचे असे हाल बघितल्यावरही तु मद्द्याला स्पर्ष करावा हे तर माझ्या अगदी समजण्या पलिकडचे आहे'' प्रिया आपली नाराजी व्यक्त करीत म्हणाली.

'' प्रिया आता तू उगीच फाटे फोडते आहेस बघ... इथे मुद्दा काय आणि तू कोणत्या गोष्टीवर बोलतेस'' विजय चिडून म्हणाला.

'' बघ चिडलास ना... शेवटी काय तर सत्य हे कटू असतं... आणि त्या मुद्यापेक्षा मला हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो... हे बोलण्यामागे कमीत कमी तुही तुझ्या वडीलांच्याच पावलावर पावूल ठेवू नए हा माझा निर्मळ उद्देश आहे'' प्रिया.

'' प्रिया प्लीज... तो विषय पुन्हा कधीतरी'' विजय.

थोडा वेळ दोघं काहीच बोलले नाहीत.

शेवटी प्रियाच जणू माघार घेत बोलली.
'' मग तु ज्या तऱ्हेने तिला प्रपोज केलं ते त्यांना आवडलेलं दिसत नाही'' प्रिया.

'' आता म्हण ना की तशी हिरोगीरी करण्याची काय गरज होती... अगं प्रेमच ते प्रेमात सगळं माफ असतं आणि माणूस प्रेमात पडल्यावरच असं काहीतरी करतो... आता तुला हे सांगून तरी काय उपयोग... तुला स्वत:ला प्रेमात पडल्याशिवाय हे कळणार नाही'' विजय बोलून गेला.

आणि प्रियाने आवंढा गिळल्या सारखे केले. तिचे डोळेही पाणावले होते पण कदाचित संध्याकाळ असल्यामुळे विजयच्या ते लक्षात आले नसावे.

पुन्हा थोडावेळ काही न बोलण्यात गेला. थोडावेळ प्रियाने मुद्दाम बोलण्याचे टाळले होते कारण ती जर आता बोलली असती तर तिच्या भावनांचा प्रभाव तिच्या बोलण्यावर किंवा आवाजावर स्पष्ट दिसला असता.

जेव्हा प्रिया पुर्णपणे सावरली तेव्हा ती पुन्हा पुढे बोलली.

'' पण तू जे काही सांगतोस त्यावरुन तरी ... भलेही तुझी प्रपोज करण्याची पद्धत चुकीची असेल... प्रथम त्यांनी तुला समजावलं असतं.. किंवा नुसते ते तुझ्यावर नाराज झाले असते... त्यांनी तुला एकदम टर्मीनेट करावे हे काही पटत नाही ... मला वाटते कुठं तरी पाणी मुरतय'' प्रिया म्हणाली.

'' अगं नाही ,... ते काय आहे ... असतो एखाद्याचा स्वभाव... तिचे वडील म्हणजे एक वेगळचं व्यक्तीमत्व आहे... ते एक ऍडव्हेंचर लव्हींग पर्सन आहेत... तसं ऍडव्हेंचर मलाही आवडतं... आणि त्यांना हे सगळं एवढ्या सहजा सहजी होवू द्यायचं नाही... असं दिसतं'' विजय म्हणाला.

''सहजासहजी होवू द्यायचं नाही... पण का?'' प्रिया.

'' कारण त्यांना मला आजमावयाचं आहे... ते माझी योग्यता पडताळून पाहत आहेत... आणि ते साहजीकच आहे... ते एवढी त्यांची एकुलती एक मुलगी कुणाला देत आहेत तर त्याची योग्यता त्यांनी पडताळून पहायला नको?... काय?'' विजय.

'' पण .. तू तिथे सिलेक्ट झालास आणि आता तू इतके दिवस त्यांच्या हाताखाली काम करतो आहेस... मग तर त्यांना तुझ्या योग्यतेची पुरेपुर कल्पना यायला हवी'' प्रिया.

'' अगं तशी योग्यता नाही... माझ्यावर संकटं आली तर मी त्यांना कसे तोंड देतो... हे त्यांना पडताळून पहायचं आहे... थोडक्यात, ते माझी परिक्षा घेवू पाहत आहेत... घेवू देत... मीही त्यांच्या परिक्षेत कसा पुरेपुर उतरतो ते बघ'' विजय.

आतामात्र प्रिया न राहवून बोललीच, '' पण ही अशी कशी जिवघेणी परीक्षा?... एखाद्याच्या जिवाशी खेळणं... हे तुला तरी पटतं का?''

विजय हसला आणि म्हणाला, '' अगं या मोठ्या लोकांच्या ह्या अशाच परिक्षा असतात...''

'' तु काहीही म्हण ... मला तर हे पटत नाही आहे... '' प्रिया म्हणाली.

क्रमश:

Broken Heart Quotes -
Giving up doesn't always mean you are weak; sometimes it means that you are strong enough to let go.
... Author Unknown
Sometimes, when one person is missing, the whole world seems depopulated.
...Lamartine
When love is lost, do not bow your head in sadness; instead keep your head up high and gaze into heaven for that is where your broken heart has been sent to heal.
...Author Unknown

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network