New fiction book - Mrugajal Ch-45

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Today's thoughts-
Sadness flies on the wings of the morning and out of the heart of darkness comes the light.
... Jean Giraudoux
The flame of love is now just a cold loneliness.
... Uniek Swain

विजयच्या आईने विजयचा हात धरुन जणू खेचूनच त्याला घराच्या बाहेर काढले त्याला ती प्रियाच्या घराकडे घेवून चालली होती. विजयची आई एखादी शक्ती तिच्या अंगात संचारावी अशी झपाझप पावले टाकीत विजयचा हात धरुन पुढे पुढे चालत होती. आणि विजय तिच्या चालण्याच्या गतिशी आपल्या चालण्याची गती मिळविण्याचा प्रयत्न करीत तिच्या मागे मागे चालत होता. प्रियाचे घर येईपर्यंत जवळ जवळ पंधरा मिनिटे ते अश्या तऱ्हेने चालत होते. विजय अजुनही संभ्रमावस्थेत असल्यासारखा तिच्या सोबत चालत होता. इतक्या वेळेपासून विजयची आई एक शब्द बोलली नव्हती की विजयही बोलला नव्हता. तो एकदम शांत झाला होता. जणू आता कुठे त्याला प्रकरणाच्या गांभिर्याची जाणीव झाली होती. पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न सारखा घोंगावत होता की..

हे कसं शक्य आहे?...

आणि विजयच्या आईच्या डोक्यात एक गोष्ट सारखी घोंगावत होती की...

आपण आधीच हा मानसिकरीत्या कमजोर असतांना याला प्रियाच्या बाबतीत सांगावे की नाही हे आपण विचार करीत होतो...

पण हा आधीच असा वागतो आहे...

याला आधीच ही गोष्ट कळून याच्यावर मानसिक आघात तर नाही ना झाला?...

न जाणो कदाचित तो तिकडे असतांना त्याला तिच्या ऍक्सीडेंट विषयी कळले असावे...

पण जे काहीही असो... आता त्याने मनाने पक्क व्हायला पाहिजे...

आणि सत्यपरिस्थीतीशी तोंड द्यायला शिकायला पाहिजे...

एव्हाना प्रियाचे घर आले होते. त्यांना घराच्या बाहेरच प्रियाचे वडील उभे होते. या दोघांना तिकडे येतांना पाहताच ते त्यांच्याकडे रागाने पाहत अजून समोर आले. प्रियाच्या वडीलांना तिची विजयशी जवळीक मान्य नव्हती. एरवी आपल्या मनाला मुरड घालून त्यांनी ती मान्यही केली असती. पण त्याची नोकरी गेली आणि त्याला वेडाचे झटके यायला लागल्यापासून तर त्यांना ती बिलकुलच मान्य नव्हती. आणि आता ह्या प्रियावर आलेल्या संकटालाही ते विजय आणि त्याच्या कुटूंबालाच जबाबदार मानत होते. आणि ते साहजीगच होतेही म्हणा. कारण एका वेड्याशी आपल्या मुलीने लग्न करावे हे कुणा वडीलांना मान्य होणार?. प्रियाच्या वडीलांना रागाने आपल्याकडे पाहतांना आणि समोर येतांना पाहून विजयच्या आईने त्याचा हात सोडला. आणि आता ते दोघेही प्रियाच्या वडीलांसमोर उभे होते. काही क्षण काही न बोलताच गेले.

'' कशी आहे प्रिया?'' विजयच्या आईने हिम्मत करुन विचारले.

'' जिवंत आहे अजून..'' प्रियाचे वडील कडवटपणे म्हणाले.

त्यांच्या लक्षात आले की आता यांच्याशी जास्त बोलण्यात काही तथ्य नाही. म्हणून जेव्हा ते प्रियाच्या वडीलांकडे दुर्लक्ष करुन आत घरात जावू लागले तेव्हा ते म्हणाले.

'' इथे नाही आहे ती... ''

'' मग कुठे आहे?...'' विजयच्या आईने विचारले.

'' तिला आम्ही बाहेरगावी पाठवले आहे... तुमच्या मनहूस सावलीपासून दूर'' प्रियाचे वडील म्हणाले आणि आत घरात निघून गेले.

त्यांचा नोकर तिथे बाजुलाच उभा होता. त्यांनी प्रियाच्या वडीलांना आत घरात जाईपर्यंत वाट बघितली आणि मग त्या नोकराला विजयच्या आईने विचारले.

'' प्रिया कुठे आहे?''

प्रथम त्या नोकराने आत बघीतले आणि त्याचा मालक घरात गेला आहे याची खात्री झाल्यावर तो त्यांना हलक्या आवाजात म्हणाला.

'' तुम्ही कशाला आला इथे... तुम्हाला तर माहित आहेच ... साहेबांना तुम्ही इथे आलेले बिलकुल आवडत नाही''

'' हो बाबा... तुमचं सगळं मान्य आहे... पण आमच्या या येड्या पोराला कोण सांगणार?... आता हा बघ वेड्यासारखा बरळतो आहे की प्रिया त्याच्यासोबत तिथे ड्यूटीच्या गावावर त्याच्याबरोबर होती... आता हा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तिचा अपघात झाला... नुसता अपघातच नाही तर नंतर पंधरा दिवस ती सिरीयस होती अन कोमात होती... अन याच्याबरोबर तिथे पंधरा दिवस ती राहणं कसं शक्य आहे... याला जरा समजावून सांग बाबा '' विजयची आई वैतागुन म्हणाली.

त्या नोकराने अविश्वासाने आणि गोंधळून विजयकडे बघितले. त्याला त्याच्याशी काय बोलावे आणि त्याला काय सांगावे काही कळत नव्हते. म्हणून तो तसाच उभा राहाला. विजयला हळू हळू आता परिस्थीतीची जाणीव होवू लागल्याचं जाणवत होतं.

'' कशी आहे तिची तब्येत आता?'' आता विजयनेच पुढाकार घेवून त्या नोकराला विचारले.

'' आठ-दहा दिवस झाले त्यांना शुद्ध आली ... अन काल साहेबांनी त्यांना आजोळी पाठवलं आहे... हवापालट करायला. '' नोकर म्हणाला.

विजयला आता हुरहुर लागुन गेली होती. प्रियाला केव्हा एकदा भेटतो असं त्याला झालं होतं.

पण तिला तर आजोळी पाठविलेलं...

विजयला तिचं आजोळ माहित होतं...

पण ते काही एवढं जवळही नव्हतं...

आता कसं करायचं?...

विजय विचार करु लागला.

क्रमश:..

Today's thoughts-
Sadness flies on the wings of the morning and out of the heart of darkness comes the light.
... Jean Giraudoux
The flame of love is now just a cold loneliness.
... Uniek Swain

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network