Ongoing Novel - Mrigajal - Ch- 31

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Quotes about love -
Love is the force that transforms and improves the Soul of the World.
... Paulo Coelho
Wherever your heart is, that is where you'll find your treasure.
... Paulo Coelho
One is loved because one is loved. No reason is needed for loving.
... Paulo Coelho

पार्टीमधे लपून कुणाच्या गप्पा एकणं आणि त्याही मुलींच्या खरतर हे काही बरोबर नाही...
म्हणजे इन्डीसेन्टच म्हणायला हवं....
पण विजयला तो मोह आवरता आला नाही.
न जाणो गप्पा आपल्याबद्दलच असाव्यात...
दुसऱ्या गप्पांबद्दल त्याला काही स्वारस्य नव्हते. पण त्या मुलींच्या आणी नयनाच्या चाललेल्या एकूण हालचालींवरुन त्याला शंका नव्हे शाश्वती होती की त्या गप्पा आपल्याबद्दलच चाललेल्या असाव्या. म्हणून विजय त्या मुलींच्या आणि विषेशत: नयनाच्या गप्पा ऐकण्यासाठी त्या पडद्याच्या आडोशाला उभा राहाला. एवढी हिम्मत करुन तो तिथे उभा राहला तर खरं, पण...
कुणाला काही शंका आली तर...
तेवढ्यात त्याला तिथेच बाजुला वरती एका खांबाला टांगलेलं वेफर्सचं बास्केट दिसलं. त्या वेफर्सच्या बास्केटजवळ तो वेफर्स घेण्याचं निमित्त करुन तिथे तसाच उभा राहाला. एक दोनच वेफर्स घ्यायचे आणि ते संपलेकी पुन्हा एकदोन वेफर्स घ्यायचे असं त्याचं चाललं होतं.
हे बरं झालं इथे ही बास्केट सुध्दा आहे...
म्हणजे कुणाला काही शंकाही येणार नाही ...
आता खरंच त्याला गप्पा स्पष्टपणे ऐकू येत होत्या. तो आता एकाग्रपणे त्या गप्पा ऐकू लागला.
'' काय गं खरंच... आज तुझा चेहरा खरंच किती खुललेला दिसतो आहे'' एका मैत्रीणीने नयनाला छेडले.
'' अगं नाही ... काहीतरी विशेष खास आहे... नाहीतर इचा असा इतका खुललेला चेहरा मी कधीच बघितला नाही...'' दूसऱ्या एका मैत्रीणीने दूजोरा दिला.
'' हो ना... एवढं गंभीर व्यक्तीमत्व आज अचानक असं खुललेलं कसं दिसत आहे'' अजून एक दुजोरा मिळाला.
खरंच आपणही कसं नोट केलं नाही...
खरंच एवढ्यात तीचा नेहमी खुललेला असतो...
'' अगं असं व्हायला ... फक्त एकच कारण असू शकतं'' एकीने सगळ्यांची उत्सुकता वाढवत म्हटले.
'' काय कारण आहे?'' एकीने विचारले आणि बाकीच्या उत्सुकतापुर्वक ती काय सांगते याची वाट पाहू लागल्या.
'' प्रेम ... दुसरं काय?'' ती मुलगी एखादा फार मोठा गौप्यस्पोट करावा अशी म्हणाली.
'' हो तू बरोबर बोललीस... प्रेमात पडल्यावरच कुणाचा एवढा चेहरा खुलू शकतो'' दूसरीने पुन्हा दूजोरा दिला.
'' काय गं.. कुणाच्या प्रेमात बिमात पडली की काय?'' पहिली आता मुळ मुद्द्यावर येत म्हणाली.
'' अगं तुला माहित आहे... ती आजकाल तिच्या त्या पार्टनर विजयसोबत गावभर फिरत असते.. आणि ते ही रात्री बेरात्री'' इतक्या वेळची गप्प असलेली एक मैत्रीण आता बोलायला लागली.
इकडे पडद्यामागे लपून ऐकणाऱ्या विजयचे कान टवकारले होते. गोष्टी आपल्याबद्दलच होत आहेत हे ऐकून विजयचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
म्हणजे आपला अंदाज खरा ठरला...
'' रात्री बेरात्री?... बापरे म्हणजे रात्री बेरात्री अजूनही कुठे जात असते की काय?'' एकीने तिचा चिमटा काढत तिला छेडले.
'' आऊच ... ऐ जरा ह्ळू.... '' नयना.
'' हं अशीच त्या विजयलाही ती म्हणत असेल... ए जरा हळूं हं...'' ती तिची ऍक्टींग करीत म्हणाली.
सगळ्याजणी एकदम हसायला लागल्या.
'' ऐ चावटपणा पूरे...'' नयना म्हणाली.
मुलीही एवढ्या 'चावट' गोष्टी करतात?...
विजयला जरा आश्चर्यच वाटत होतं.
'' पण हे काय चाललं... जरा आम्हाला कळू तर दे'' एक मैत्रीण म्हणाली.
ती काहीतरी बोलणार हे पाहून विजयने जणू आपला श्वास रोखून धरला होता. आता यावर ती काय बोलणार हे विजयला ऐकायचे होते.
'' काय चालणार आहे... आय लाईक्स हीम ... बस एवढंच'' नयना थोडी लाजून पण हिम्मत दाखवित म्हणाली.
'लाईक्स' म्हणजे प्रेमाची पहिली पायरी...
थोडं निराश झालेल्या विजयने आपल्या मनाची समजूत घातली.
'' 'लाईक्स' बस एवढंच? ... की अजून काहीतरी...'' एक मैत्रीण.
'' यस ऍन्ड आय लव्हज हिम टू... बस अजून काही ऐकायचं आहे... की अजुन काही विचारायचं आहे?'' नयना आता मोठ्या हिमतीने म्हणाली.
इकडे पडद्यामागे, विजयच्या हृदयाची गती वाढली होती. त्याला अपेक्षा होती, ती लाजेल मुरडेल... पण नाही तिने तर तिच्या प्रेमाची कबुली एकदम बोल्डपणे देवून टाकली होती.
काय तीही आपल्यावर प्रेम करते?...
त्याचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.
हो एवढ्यात तसं जाणवत होतं तर खरं ...
विजयचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता. आनंदाच्या भरात तो तिथून वळला आणि आपला बियरचा रिकामा ग्लास घेवून सरळ वाईन काऊंन्टरवर गेला.
बस्स अजून पुढे आता काहीही ऐकण्याची गरज उरली नाही...
'' यस ऍन्ड आय लव्हज हिम टू... '' ...
हे गोड शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते.
आपण चोरुन ऐकले ते एका दृष्टीने बरेच झाले....
नाहीतर मी तिला प्रेमाची कबुली द्यायची आणि मग तिने तिच्या प्रेमाची कबुली द्यायची. यात बराच वेळ निघून गेला असता...
विचारांच्या तंद्रीत आणि आनंदाच्या भरात विजयने समोर वाईन काऊंटरच्या स्टाफने त्याचा भरलेला ग्लास गटागट पिऊन घेतला.
यस धीस इज टाईम टू सेलीब्रेट...
पण मग तो भानावर आला आणि त्याने त्याच्या मनाला बजावले,..
बस आता... बियरचे दोन ग्लास पुर्ण झाले ...
आपला कोटा संपला...
'' यस ऍन्ड आय लव्हज हिम टू... '' ... हे तिचे शब्द ऐकले आणि त्याच्या आनंदास आता पारावार उरला नव्हता. त्याने ऐकदा चौफेर नजर फिरवली. पार्टी आता ऐन भरात आली होती. सगळेजण किती आनंदी भासत होते. त्याच्या नजरेत जणू अचानक बदल झाला होता. ते दारुच्या नशेत वायफळ बडबडणारे लोक आता त्याला आवडू लागले होते. जणू ते सर्व लोक आता त्याच्या आनंदात सहभागी होत होते.
मग त्याने तो बियरचा रिकामा ग्लास तिथे तसाच ठेवून दिला आणि तिथे बाजुलाच ठेवलेल्या ट्रेमधील कोल्ड्रींगचा ग्लास उचलला. त्याला ही बातमी आता कुणाला तरी... कुणी जवळच्या मित्रास सांगण्याची घाई झाली होती. त्याने मघा त्याच्या मित्रांचा घोळका जिथे उभा होता तिकडे नजर फिरवली. अजुनही ते सर्वजण तिथेच उभे होते.
पण आता जर ही बातमी त्यांना सांगितली तर ते ती सिरीयसली घेतील का?...
का आपल्यालाही दारुच्या नशेत काहीतरी बरळतो आहे असं समजतील?...
जाऊदे ते काहीही समजोत... आपण आपलं सांगून मोकळं व्हायला पाहिजेत...
असा विचार करुन तो आपल्या मित्रांच्या घोळक्याकडे जाण्यास वळणार तेवढ्यात त्याला मागे चाहूल लागली. त्याच्या मागे त्याचा बॉस म्हणजे नयनाचे वडील तिनचार जणांच्या घोळक्यात अगदी त्याला लागूनच गप्पा मारत होते.
अरे हे आपल्या इतक्या जवळ उभे आहेत आणि आपलं लक्ष कसं गेलं नाही...
कदाचित नयनाच्या आणि तिच्या प्रमाच्या तंद्रीत आपलं लक्ष नसेल गेलं...
बॉसबद्दल एक भिती, आदर त्याच्या मनात नेहमीच राहाला होता. तिथून परत आपल्या मित्रांच्या घोळक्याकडे जायचे म्हणजे त्याला त्याच्या बॉसच्या गृपमधून जावे लागले असते.
पण ते बरे दिसणार नाही....
आणि आपणही आज जरा जास्तच घेतली आहे...
त्यांच्या लक्षात आले तर त्यांना काय वाटेल...
तो तसाच वाईन टेबलच्या तिथे तसाच दबून उभा राहाला.
हे लोक इथून जाईपर्यंत हे असंच उभं राहावं लागणार असं दिसतं...
तसंच काय उभं राहायचं म्हणून विजय त्याच्या मागे उभे असलेल्या त्याच्या बॉसच्या आणि त्या गृपच्या गप्पांवर त्याचं लक्ष केंद्रीत करु लागला. गप्पा बराच वेळ चालू होत्या आणि तो तसाच उभा राहून अक्षरश: अवघडून गेला होता. तिथून सटकण्याची काही तरी क्लुप्ती करावी, या विचारात असतांना त्याच्या कानावर पडलेल्या एका वाक्याने त्याचे लक्ष एकवटले -
'' यू नो ऍट लास्ट, माय सर्च इज कप्लीटेड, ऍज ... आय हॅव फाऊंड अ परफेक्ट मॅच फॉर माय डॉटर नयना'' नयनाचे वडील बोलत होते.
विजयचं हृदय पुन्हा धडधडायला लागलं.
पोरगी आपल्या हातातून जाते की काय?....
विजयच्या मनात येवून गेले.
'' कोण आहे तो नशिबवान?'' त्यांच्या गृपमधील एकाने व्हिस्कीचा घोट घेत विचारले.
'' गेस हू?'' नयनाचे वडीलही व्हिस्कीचा घोट घेत जणू गुढपणे गालातल्या गालात हसत म्हणाले.
'' हाऊ कॅन आय गेस?'' तो दुसरा माणूस म्हणाला.
'' म्हणजे तो आपल्या ऑफीसमधेच काम करतो की काय'' त्या गृपमधील अजून एकजण आपला अंदाज वर्तवीत म्हणाला.
'' यस यू आर राईट'' नयनाच्या वडीलांनी ज्यांना विचारले होते त्यांच्याकडे अर्थपुर्ण नजरेने बघत विचारले. .
'' बट स्टील आय कान्ट'' तो माणूस थोडावेळ विचार करुन म्हणाला.
किंबहुना त्याला आपला अंदाज चुकवून आपल्या बॉसला खुश करायचे होते.
खरचं हा बॉस म्हणजे प्रकरण अगदीच भन्नाट असतं. अश्या पार्टीत त्याने विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं नसतं. नाही तर तो उगीच नाराज व्हायचा. कारण त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच माहित नाही या गोष्टीने तो जाम खुश होत असतो. ह्या सगळ्या क्लुप्त्या त्याच्या जवळच्या चमचांना अगदी बरोबर माहित असतात. एकूण काय तर आपला बॉस खुश तर आपलं भलं हे इक्वेशन ते कधीच चुकु देत नाहित.
'' यू क्वीट?'' नयनाच्या वडीलांनी विचारले.
'' यस... आय क्वीट'' तो माणूस पुर्णपणे हरला आहे असं दाखवित म्हणाला.
त्याला माहीत होते की कधी कधी बॉसशी हरण्यातही एक जीत असते.
'' ओके वन मोर क्लू...'' नयनाचे वडील.
त्या माणसाने नुसते प्रश्नार्थक मुद्रेने नयनाच्या वडीलांकडे बघीतले,
'' ही वर्कस वुईथ माय डॉटर ... नाऊ टेल मी'' नयनाचे वडील
इकडे विजयचा चेहरा उजळला होता कारण त्याच्या आशा पुन्हा आता पल्लवीत झाल्या होत्या.
पण तो नशिबवान मीच की अजुन कुणीतरी...
त्याचं मन शंकेनं ग्रासलं. कारण त्याच्या ग्रुपमधे अजुनही बरेच त्याच्या वयाचे तरुण होते.
नयनाच्या वडीलांसोबत उभा असलेला तो माणूस गालातल्या गालात हसत म्हणाला,
'' विजय ... ऍम आय राईट?''
कारण त्याला माहित होते की आता बरोबर उत्तर दिले तरच बॉस खुश होणार. आणि झालंही तसंच.
'' यस यू आर ऍबसुलेटली राईट''
इतक्या वेळचा संभ्रमात पडलेला विजय, आता मात्र आनंदीत झाला होता. सगळे मनावर घातलेले निर्बंध, सगळी मनावर घातलेली बंधनं झुगारुन देवून त्याने त्याच्या समोर उभ्या असलेल्या वाईन काऊंन्टर स्टाफकडे अजून एक बियर मागवली आणि आनंदाच्या भरात गटागट रिचवली सुध्दा.

क्रमश:...

Quotes about love -
Love is the force that transforms and improves the Soul of the World.
... Paulo Coelho
Wherever your heart is, that is where you'll find your treasure.
... Paulo Coelho
One is loved because one is loved. No reason is needed for loving.
... Paulo Coelho

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 1. खूपच interesting post आहे...
  पण तुम्ही लवकरात लवकर पुढची पोस्ट टाकत जा..कारण आता climax जवळ आलेला आहे.
  मृगजळ हे कोणाचे कोणासाठी आणि कशासाठी आहे तेच समजत नाही आहे..........

  ReplyDelete
 2. Kiti intresting ahe..........

  ReplyDelete
 3. khupach intresting aahe pan mala last two weeks pasun mail nahi aaleli ya storichi. Please keep posting. Waiting eagerly.

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network