Online Story - Mrugajal - Ch 38

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Today's thoughts -
If we must part forever,
Give me but one kind word to think upon,
And please myself with, while my heart's breaking.
...Thomas Otway
Have you ever been hurt and the place tries to heal a bit, and you just pull the scar off of it over and over again.
... Rosa Parks

एक दिवस जेव्हा प्रिया विजयकडे नेहमी प्रमाणे आली होती तेव्हा विजय तिला काहीतरी गहन विचार करीत असलेला दिसला.

'' काय विजय आज एकदम विचारात दिसतोस...'' प्रियाने विचारले.

'' अगं काही नाही '' विजय आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाला.

'' नाही काही तर आहे... नाही तर एवढ्या गहन विचारात तू कधी नसतोस... मी केव्हाची आलेली आणि तू एवढ्या विचारात होतास की तुला काहीच पत्ता नव्हता'' प्रिया.

'' अगं काही नाही ... आज थोडं वेगळं वेगळं वाटत आहे'' विजय.

'' म्हणजे?'' प्रिया.

'' अगं तेच ... काही कळत नाही ... पण वेगळं वेगळं वाटत आहे हे खरं'' विजय.

हं आज योग्य वेळ आहे...
तो विषय काढायची ...
प्रियाने विचार केला.

'' एवढ्यात नेहमीच वाटतंना तसं... ''

'' नेहमी ... म्हणजे रोज वाटतं ... पण कधीतरी...'' विजय.

'' म्हणजे... काही कारण नसतांना भिती ... राग... वैगेरे ... असंच वाटतं ना'' प्रिया.

'' हो बरोबर म्हणालीस... पण तुला कसं कळलं'' विजय.

'' अरे मी काय तुला आजची ओळखते... तुझा एक श्वास जरी नागेपुढे झाल तरी मला इकडे जाणीव होते'' प्रिया बोलून तर गेली. पण आता यावर विजय कसा रिऍक्ट करतो याकडे तिचं लक्ष लागलं होतं.

पण विजय आपल्याच तंद्रीत असल्यागत बोलला '' अगं... कदाचित रिकामं असल्यामुळॆ होत असेल.'' .

'' माझ्याजवळ आहे त्यासाठी उपाय'' प्रिया आपल्या मुद्द्यावर येण्याचा प्रयत्न करीत म्हणाली

'' उपाय ? .. म्हणजे? '' विजय.

'' म्हणजे... आता इथे नाही सांगता येणार... चल आपण बाहेर थोडं फिरायला जावूया ... म्हणजे मोकळ्या गोष्टीही करता येतील '' प्रिया.

'' फिरायला?... अच्छा चल'' विजय उठत म्हणाला.

प्रियाने फिरायचा बहाणा करुन कसेतरी आज विजयला डॉ. नाडकर्णींच्या हॉस्पीटलकडे आणले.

'' हे आमचे डॉक्टर नाडकर्णी म्हणजे फार हुशार डॉक्टर आहेत बरं'' प्रिया डॉक्टरांच्या बोर्डकडे त्याचं लक्ष आकर्षीत करीत म्हणाली.

'' हो?... पण मला तर तुझ्यापेक्षा दुसरा कुणीच डॉक्टर हुशार वाटत नाही'' विजय तिला छेडण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

'' अच्छा हो?... तुला कधी आला माझ्या डॉक्टरकीचा अनुभव... आणि हो मी गायनाकॉलॉजीस्ट आहे म्हटलं... तुला तरी कधी माझ्या डॉक्टरकीचा अनुभव येणं काही शक्य नाही '' प्रिया हसत म्हणाली.

'' हो तेही आहे म्हणा... '' विजयही हसत म्हणाला, '' पण त्यासाठी अनुभव घेणं जरुरीचं नसतं... '' विजय.

'' मग?''

'' अगं .. तुझ्याकडे बघितल्याबरोबर माहित पडतं की तू एक हुशार डॉक्टर आहेस म्हणून'' विजय.

'' खरंच... बोलण्याच्या बाबतीत तर तुझा कुणीच हात धरु शकत नाही'' प्रिया म्हणाली.

विजयला एकदम नयनाची आठवण झाली. कारण नयनाच्या बाबतीतही तो असाच काहीतरी म्हणायचा.

विजय विचाराच्या तंद्रीत गेलेला पाहून प्रियाने या क्षणाचा फायदा घेण्याचे ठरवीले.

'' बरं चल आत जावूया '' प्रिया एकदम विषय बदलत पुन्हा मुळ मुद्द्यावर येत म्हणाली. तिला आज कोणत्याही हालतीत विजयची डॉ. नाडकर्णीशी भेट घालून द्यायची होती.

'' आत ? '' विजयने आश्चर्याने हॉस्पीटलच्या बोर्डकडे पाहत म्हणाला, '' तुला काही काम आहे?''

'' अरे नाही हे माझे ओळखीचे डॉक्टर आहेत ... चल त्यांना भेटून घेवूया'' प्रिया म्हणाली.

विजय अनिच्छेनेच तिच्यासोबत आत गेला. डॉ. नाडकर्णींनी त्या दोघांना कॅबिनचा दरवाजा उघडून आत येतांना बघीतले आणि चेहऱ्यावर डॉक्टरी हास्य धारण करून ते त्यांना म्हणाले, '' प्लीज कम इन''

दोघंही आत यायला लागले तसे ते प्रियाला म्हणाले, '' प्लीज... यू कॅन वेट आऊटसाईड ''

'' यस सर'' प्रिया अदबीने म्हणाली आणि दारातून मागे वळून वेटींग सेक्शनमधे ठेवलेल्या सोफ्यावर बसली.
विजयला हा सगळा प्रकार काय चालू आहे हे काही कळत नव्हते. त्याने प्रियाकडे प्रश्नार्थक मुद्रेने वळून बघितले.

'' जस्ट गो इन'' प्रिया जणू त्याला आश्वस्त करीत म्हणाली.

विजय कसाबसा आत गेला तसा डॉक्टरांच्या कॅबिनचा स्प्रिंग असलेला दरवाजा बंद झाला.

विजयला आत जावून बराच वेळ झाला होता. आणि प्रिया बाहेर सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती.

जितका वेळ झाला तेवढं उलट चांगलच...

दोघांची सविस्तर चर्चा तरी होईल...

प्रिया विचार करीत होती. जवळपास दिड तासानंतर विजय कॅबिनचं दार उघडून बाहेर आला. बाहेर येताच त्याने तिला इशाऱ्यानेच चलायची खून केली.

'' मला त्यांना सांगून तर येवू देत '' प्रिया कॅबिनकडे जात म्हणाली.

तसा तो मधे आडवा येत म्हणाला, '' त्याची काहीएक गरज नाही''

त्याचा तो पावित्रा बघून प्रिया तिथेच थबकली आणि जसा तो बाहेर जायला लागला तशी मुकाट्याने ती त्याच्या मागे मागे चालायला लागली. तिच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. आत डॉक्टरांसोबत काय झालं असावं - समजायला काही मार्ग नव्हता. त्याची पावलं अजुनही झपाझप समोर जात होती. तिला त्याच्यासोबत जाणं कठीण जात होतं. काही थोडं अंतर चालल्यानंतर तो तिला त्याच्या सोबत येण्यासाठी थोडा वेळ थांबला. त्याला थांबलेलं पाहताच तिला हायसं वाटलं.
कदाचित आता त्याचा राग शांत झाला असावा..
पण ती बरोबर येताच काहीही न बोलता तो पुन्हा चालायला लागला. बराच वेळ दोघं नुसती सोबत चालत होती. तोही काही बोलत नव्हता आणि तिचीही त्याचा मुड बघून काही बोलण्याची हिम्मत होत नव्हती. तरीही तो काहीतरी बोलेल या आशेने प्रिया अधून मधून तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत होती.

'' तो डॉक्टर काय समजतो स्वत:ला?...'' विजय शेवटी न राहवून रागाच्या भरात बोलला.

'' का?... काय झाल?'' तीने अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत विचारले.

'' डॉक्टरी पदवी घेवून शेवटी त्यानं काय हेच कमावलं की काय?'' तो पुन्हा रागाने म्हणाला.

'' पण काय झालं ते तर सांगशील?'' प्रियाने विचारले.

'' अगं तो मला ठार वेडा ठरवण्याचा प्रयत्न करीत होता... आज दुसरं कुणी भेटलेलं दिसत नाही साल्याला.'' विजय चिडून म्हणाला.

"" अरे.. तसं नाही... डॉक्टरांना सगळ्या बाजु तपासून पहाव्या लागतात... तो त्यांच्या ट्रीटमेंटचा एक भाग असतो '' ती त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

'' ट्रीटमेंट?'' तीही डॉक्टरचीच बाजू घेत आहे हे पाहून तो एकदम थांबला आणि तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, '' आणि तू सुद्धा?''

तो तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता.

'' अरे ... तसं नाही.. काही गोष्टी आपल्यालाही कळत नसतात... पण तुला एवढं तर मान्य करावंच लागेल की तुला सायकीयाट्रीस्ट ट्रीटमेंटची गरज आहे... '' प्रिया पुन्हा त्याला समजाविण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

'' काय मला ट्रीटमेंटची गरज आहे? '' तो एकदम थांबून तिच्या अंगावर जवळ जवळ खेकसलाच. आपल्या अनावर झालेल्या रागाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला '' पण तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती प्रिया ''

त्याचा राग आता अनावर झाला होता. तो पुन्हा पुढे चालायला लागला आणि ती त्याच्या मागे मागे चालायला लागली.

पुन्हा तो काहीतरी आठवल्यागत ब्रेक लागल्यासारखा थांबला आणि तिच्याकडे वळून म्हणाला, '' आता.. मला सगळं समजायला लागलं आहे...''

तो पुन्हा झपाझप पावले टाकीत पुढे चालू लागला तशी प्रिया त्याच्या मागे चालत, त्याला गाठण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, '' अरे विजय थांब''

पुन्हा तो एकदम थांबला आणि तिच्याकडे वळून म्हणाला, '' आता मला सगळं समजायला लागलं आहे... मी तुझ्यावर प्रेम न करता नयनीवर प्रेम करतोना... हे तुझ्याच्याने बघवलं गेलं नाही... आणि म्हणून तू मला ठार वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतेस ... छी ... छी... तू एवढ्या खालच्या स्तराला जाशील... असं कधी वाटलं नव्हतं मला'' तो जणूआग ओकत होता.

त्याचा एक एक शब्द जणू एखाद्या तोफगोळ्याप्रमाणे तिच्या कानात शिरत होता.

एवढा मोठा आरोप..

आणि तो ही आपल्या प्रिय व्यक्तीकडून...

तिच्या डोळ्यातून दोन मोठे मोठे अश्रू घळकन ओघळून गालावर आले. आणि मग ज्या अश्रूंच्या धारा सुरु झाल्या त्या थांबायला तयार होत नव्हत्या.

क्रमश:...

If we must part forever,
Give me but one kind word to think upon,
And please myself with, while my heart's breaking.
...Thomas Otway
Have you ever been hurt and the place tries to heal a bit, and you just pull the scar off of it over and over again.
... Rosa Parks

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. priya jaude jast manala laun gheu nakos tula mahiti aahe na ki Vijaycha dokavar parinam zalay te dok thikanavr ala ki yeil vatnivr

    ReplyDelete
  2. bichari priya...... kiti sahan karel????????

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network