Today's Post - Novel - Mrugajal - Ch - 37

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Today's Thoughts -
The heart is the only broken instrument that works.
... T.E. Kalem
Sometimes I wish I were a little kid again, skinned knees are easier to fix than broken hearts.
...Author Unknown
God can heal a broken heart, but He has to have all the pieces.
... Author Unknown

प्रियाने सगळी हकिकत डॉ. नाडकर्णींना सांगीतली. आणि सगळी हकिकत सांगून झाल्यावर ती त्यांच्यासमोर खुर्चीवर हताश झाल्यासारखी बसली होती.

'' आय सी'' डॉ. नाडकर्णी काहीतरी विचार केल्यागत म्हणाले.

'' पण तो जो सांगतो आहे... त्यातलं खरं कोणतं आणि काल्पनिक कोणतं?.. हे कळायला काही तर मार्ग असेल ?'' प्रिया म्हणाली.

'' ते फार कठीण आहे... कारण अश्या पेशंटच्या बाबतीत खऱ्या गोष्टींची आणि काल्पनीक गोष्टींची सरमिसळ झालेली असते... खऱ्या आणि काल्पनीक गोष्टीत जी एक भिंत असते ती नाहीशी झालेली असते... त्यामुळे असे पेशट्स खऱ्या आणि काल्पनीक गोष्टीत फरक करु शकत नाहीत ...'' डॉक्टर नाडकर्णी म्हणाले.

'' म्हणजे नयनाच्या बाबतीत तो जे काही सांगतो आहे ... ते सगळं काल्पनीक आहे की काय?'' प्रियाने प्रश्न उपस्थित केला.

'' शक्य आहे... काही काही गोष्टी खऱ्याही असू शकतात..'' डॉ. नाडकर्णी म्हणाले.

'' पण हे असं का व्हावं ... आणि तेही विजयच्याच बाबतीत व्हावं हे फार दुर्दैवी आहे ... एवढा हुशार , होतकरु, मेहनती ... घराबद्दल ओढ असलेला चांगला मुलगा... त्याच्याच बाबतीत असं व्हावं...'' प्रिया म्हणाली.

'' विजयच्याच बाबतीत नाही तर... कुणाच्याही बाबतीत असं घडणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे'' डॉ. नाडकर्णी म्हणाले.

'' पण असं होण्यास काहीतर कारण असेल?'' प्रियाने विचारले.

'' कारणं खुप असू शकतात... अती दडपण, अति ताण, जबाबदारीच्या मानाने कमजोर शरीर ... किंवा कमकुवत मन ... काहीही कारण असू शकतं.''

थोडा वेळ काही न बोलताच निघून गेला.

'' अशा बाबतीत हेरीडीटारी कारणही नाकारता येत नाही ... '' डॉ. नाडकर्णी पुढे म्हणाले.

'' हो विजयच्या बाबतीत कारण हेरीडीटरीच असू शकतं... कारण त्याची बहिणही सायकियाट्रीक पेशंट आहे.'' प्रिया म्हणाली.

तिच्या आवाजातून तिची विजयबद्दल असलेली काळजी दिसत होती.

'' अच्छा म्हणजे बहिणीलाही असाच प्रॉब्लेम आहे.... '' डॉ. नाडकर्णीनी शुन्यात पाहत, जणू काहीतरी विचार करीत विचारले.

'' बरं तिला एक्सॅक्ट्ली कशा प्रकारचा... आणि केव्हापासून तो प्रॉब्लेम आहे..'' डॉ. नाडकर्णी.

'' जवळपास असाच प्रॉब्लेम आहे... तिच्या प्रॉब्लेमला आता जवळपास सात - आठ वर्ष झाले असतील... आणि एवढ्या दिवसात तो प्रॉब्लेम आता जरा जास्त प्रमाणात आहे एवढंच '' प्रिया.

'' बरं या आधी कधी विजयला असा प्रॉब्लेम आला होता का?... आय मीन एनी मॅनियाक अटॅक किंवा हालोसिनेशन... त्याला यापुर्वी कधी झालं होतं का?''

'' माझ्या माहितीप्रमाणे तर नाही ... मला वाटते हे त्याला प्रथमच असं होत आहे... '' प्रियाने उत्तर दिले.

नंतर विचार केल्यागत डॉ. नाडकर्णी म्हणाले, '' मला वाटते ही क्लीअर स्किझोफ्रेनियाची केस आहे... सुरवातीला स्क्रिझोफ्रेनियामधे पेशंटला असेच... हालोसिनेशन्स होवू शकतात... ''

'' म्हणजे हा पुर्णपणे हेरेडीटरीच प्रॉब्लेम आहे म्हणायचा'' प्रिया एक लांब उसासा टाकत म्हणाली.

'' हो... असंच दिसतं तर... '' डॉ. नाडकर्णी.

'' म्हणजे त्यावर काही उपाय?...'' प्रिया निराशेने म्हणाली.

'' नाही नाही तसं नाही ... तू काळजी करु नकोस ... तो जरी हेरेडीटरी प्रॉब्लेम असला तरी आजच्या काळात मेडीकल सायन्स खुप पुढे गेलं आहे... अशा केसेसला आजच्या युगात शुअर क्यूअर अव्हॅलेबल आहे... पण अश्या पेशंट्समधे एक अडचण असते'' डॉ. नाडकर्णी.

'' अडचण... कोणती... पैशाची? '' प्रिया.

'' नाही अडचण पैशाची नाही आहे'' डॉ.

'' मग?'' प्रिया.

'' ते काय आहे अशा केसेसमध्ये पेशंटला विश्वासात घेणं फार जरुरीचं असतं. आणि ट्रीट्मेंटपेक्षा तेच सर्वात कठीण काम असतं... तुम्हाला त्याला विश्वासात घेवून मेडीकल ट्रीटमेंटसाठी तयार करणं आवश्यक असते ..'' डॉ. नाडकर्णी तिला दिलासा देत म्हणाले.

'' कितीही कठीण असू देत ... मी त्याला घेईन विश्वासात आणि ट्रीटमेंट्साठी तयार करीन'' प्रिया ठामपणे म्हणाली.

'' यस आय थींक ... जरी ते कठीण असलं तरी ... यू शुड नॉट फाईंन्ड एनी डीफीकल्टी... कारण तु स्वत: एक डॉक्टर आहेस... आणि तोही सुशिक्षीत आहे...'' डॉ. नाडकर्णी म्हणाले.

थोडा वेळ पुन्हा काही न बोलताच निघून गेला.

'' बरं त्याच्या बहिणीची काय स्थिती आहे आता ... म्हणजे तिचं ट्रीटमेंट वैगेरे काह सुरु आहे की नाही... आणि असेल तर काही फरक वैगेरे आहे की नाही.'' डॉक्टरांनी मधेच आठवल्यागत विचारले.

'' ती म्हणावी तेवढी जरी नाही तरी आता बरी आहे... विजयने हल्लीच त्याला नोकरी लागल्याबरोबर तिची ट्रीटमेंट सुरु केली होती... कदाचित ट्रीटमेंट उशीरा सुरु केल्यामुळे तिला बरे होण्यास थोडा वेळ लागेल... पण आता पुढे कुणास ठाऊक तिचे काय होईल ते... कारण त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे आणि आता वरुन विजयचीही नोकरी गेलेली... आणि आता पुन्हा त्याचीही ट्रीटमेंट'' प्रिया म्हणाली.

डॉ. नाडकर्णींचा चेहरा पुन्हा काळजीयूक्त झाला.

'' पण डॉक्टर काळजी करण्याचं काही कारण नाही... आता मी आहे ना... मी त्यांना सर्वतोपरी मदत करीन'' प्रिया म्हणाली.

'' यस दॅट्स बेटर'' डॉ.म्हणाले.

क्रमश:...

Today's Thoughts -
The heart is the only broken instrument that works.
... T.E. Kalem
Sometimes I wish I were a little kid again, skinned knees are easier to fix than broken hearts.
...Author Unknown
God can heal a broken heart, but He has to have all the pieces.
... Author Unknown

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. ataparyant tari masr rangliy.....!!
    pan plase next chapter...ASAp!!!!

    ReplyDelete
  2. its nice, but it shd nt be happenede wid ny1.

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network