Online Literature book - Mrugajal - Ch-46

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Love is a temporary madness. It erupts like an earthquake and then subsides. And when it subsides you have to make a decision. You have to work out whether your roots have become so entwined together that it is inconceivable that you should ever part. Because this is what love is. Love is not breathlessness, it is not excitement, it is not the promulgation of promises of eternal passion. That is just being "in love" which any of us can convince ourselves we are. Love itself is what is left over when being in love has burned away, and this is both an art and a fortunate accident. Your mother and I had it, we had roots that grew towards each other underground, and when all the pretty blossoms had fallen from our branches we found that we were one tree and not two."
.... St. Augustine

प्रियाच्या घरी जावून आल्यापासून विजयला सारखी प्रियाला भेटण्याची ओढ लागून राहाली होती. आपल्या इतक्या कठीण दिवसात ती नेहमी आपल्यासोबत खंबीरपणे उभी होती आणि तिच्यावर जेव्हा कठीण प्रसंग बेतला तेव्हा आपण तिच्याजवळ नाही याची त्याला सारखी खंत वाटत होती.

असा कसा अपघात झाला तिचा?...

त्याचा तर विश्वासच बसत नव्हता. पण प्रियाच्या घरी जावून आल्यापासून त्याला सत्य परिस्थितीची जाणीव होत होती.

आणि डोक्याला मार लागून 15 दिवस कोमात होती ती...

म्हणजे मार फार जास्त असला पाहिजे...

अश्या परिस्थितीत जर आपण तिला जावून भेटलो तर तेवढाच तिला दिलासा...

आपल्याला तिथे ड्यूटीवर कुणी कसं कळवलं नाही....

आईने नाही तर राजेशने तरी कळवायला हवं होतं...

पण आता त्या झालेल्या गोष्टींना काही अर्थ राहाला नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर राहून राहून प्रियाचा चेहरा येत होता.

बिचारीला आई नाही आणि वडील हे असे.. दिलं पाठवून आजोळी...

त्याला तिच्या वडीलांविषयी डोक्यात एक रागच होता. आधी ते त्याच्याशी व्यवस्थित वागत. पण जेव्हापासून प्रिया आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली, ते त्याचा राग करु लागले होते. आणि त्यातच त्याची तब्येत अशी झाली आणि नोकरी गेलेली. त्यांचा त्याच्याविषयीचा राग समजण्यासारखा होता.

ते काही नाही... आता आपल्याला तिच्या वडीलांची परवा न करता तिला तिच्या आजोळी जावून भेटायला पाहिजे..

पण आई एकटे जावू देणार नाही याची त्याला खात्री होती...

राजेशकडे जावून यावं का?..

पण राजेशकडे जावून काय होणार आहे?...

प्रियाविषयीचा साधा निरोप त्याने न दिल्यामुळे त्याच्या मनात राजेशविषयी रागच होता.

जो काही निर्णय घ्यायचा तो तर आपल्यालाच घ्यावा लागेल...

त्याला भेटूनही काही उपयोग नाही ... एवढ्यात सारखा टोमणे मारतो तो...

शेवटी हेच खरं की परिस्थितीनुसार लोक बदलतात... काही अपवाद वगळता .... जशी की प्रिया...

दोन तिन दिवस झाले असतील त्याला ड्यूटीवरुन परत येवून आणि प्रियाच्या अपघाताची बातमी कळून. त्याच्या मनाचा सारखा कोंडमारा होत होता. ऑफिसला जायचीही काही इच्छा होत नव्हती. एका जागी बसुन विचार करुन करुन त्याच्या मेंदूचा नुसता भुगा होत होता.

इथे हातावर हात ठेवून नुसतं कुढत राहाण्यापेक्षा... जाऊन आलेलेच केव्हाही योग्य..

शेवटी एक दिवस विजयने मनाचा पक्का निर्णय केला की काहीही होवो एकदा प्रियाला जावून भेटून यायचेच आणि कुणालाही न सांगता त्याने आपली बॅग तयार केली.

तेवढ्यात त्याची आई तिथे आली, '' आता कुठे निघालास तू?''

'' प्रियाला भेटायला ... तिच्या आजोळी'' विजय आपली बॅग निट बंद करीत म्हणाला.

'' अश्या या परिस्थितीत... '' आई.

विजय काहीच बोलला नाही. पण त्याच्या हालचालींवरुन त्याचा ठाम निर्णय दिसत होता.

'' हे बघ,,, तुझं आधीच डोकं ठिकाणावर नाही... '' त्याची आई चिडून म्हणाली आणि मग स्वत:ला सावरीत त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली, '' अशा अवस्थेत तू जावू नकोस''

'' तू काळजी करु नको... मी सोबत औषधसुद्धा नेत आहे'' तो म्हणाला.

'' ड्यूटीला गेला होता तेव्हाही नेलं होतस'' पुन्हा त्याची आई चिडून त्याला टोमणा मारल्यागत म्हणाली.

'' नाही मी आता व्यवस्थीत औषधं घेईन... आता बघितलं नाहीस ... परत आलो तेव्हापासून मी निट औषधं घेत आहे...'' विजयने बॅग उचलली आणि तो निघाला.

त्याच्या आईला माहित होते की आता तो एकणार नाही.

'' थांब '' त्याची आई म्हणाली आणि काहीतरी आणण्यास लगबगीने घरात गेली.

विजय तिथेच दारात थांबला. थोड्या वेळाने त्याची आई हातात काहीतरी घेवून घाई घाईने बाहेर आली.

'' पोरा हे पिर बाबाचं तावीद गळ्यात बांधून जा'' ती त्याच्या गळ्यात तावीद बांधीत म्हणाली.

विजयचा अश्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. पण आईच्या समाधानासाठी त्याने तिला ते तावीद बांधू दिले.

'' हे तावीत तुझं रक्षण करील '' तावीदाला गाठ बांधीत ती म्हणाली. बिचारीला आता या तावीद गंडे दोरे यासारख्या गोष्टींचाच आधार होता. नवऱ्याचा तिला आधार असा म्हणून कधीच नव्हता. आणि या विखुरनाऱ्या घराला थांबवायचं असेल तर तिलाच घराचा एक मोठा आधार म्हणून भूमिका निभावायची होती. तिला जर मोठा आधार बनायचे असेल तर मग तिला कोण्या एखाद्या टेकूसारख्या आधाराची गरज नको?

विजय काहीच बोलला नाही.

'' हं निघू आता'' तिचं तावीद बांधून झाल्यावर तो म्हणाला.

'' निट जा... औषधं वेळेवर घे... कुठलंही काहीही खावू नको ... चांगल्या जागी काहीतरी खायचं ... नाही तर कुठे काही भेटलं नाही तर फळं खायची... पाणीही चांगल्या जागचंच प्यायचं... पैसे बरोबर ठेव...''

'' हो... आता प्रत्येक वेळा तेच तेच सांगशील... मागच्या वेळेलाही हेच सांगीतलं होतं...'' तो चिडून म्हणाला.
आणि बॅग घेवून तो निघाला.

'' हो हेच सांगितलं होतं... पण काही उपयोग झाला का?'' त्याच्या आईचा पुन्हा त्याने औषध न घेतल्याच्या गोष्टीकडे रोख होता.

विजय ने आता वाद घालण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला जायची घाई झाली होती. तो काही न बोलता निघाला सुध्दा.

'' पोहोचल्यावर बाबाच्या ऑफीसात फोन कर..'' ती त्याला एकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाली.

'' हो...'' तोही चालता चालता वळून मोठ्या आवाजात म्हणाला. तो 'हो' म्हणाला खरा पण त्याला आधीच्या बऱ्याच वेळा आलेल्या अनुभवावरुन माहित होते की वडीलांच्या ऑफिसात फोन करुन काही उपयोग नव्हता. कारण ते ऑफीसात असे म्हणून कधी नसायचेच. मग कुणीतरी दुसरंच फोन उचलायचं आणि निरोप द्यायचं तर दूरच वर कुत्सीतपणे काहीतरी बोलायचं.

त्याची आई काळजीने त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती नाहीशी होईपर्यंत टक लावून बघत राहाली

क्रमश:...

Love is a temporary madness. It erupts like an earthquake and then subsides. And when it subsides you have to make a decision. You have to work out whether your roots have become so entwined together that it is inconceivable that you should ever part. Because this is what love is. Love is not breathlessness, it is not excitement, it is not the promulgation of promises of eternal passion. That is just being "in love" which any of us can convince ourselves we are. Love itself is what is left over when being in love has burned away, and this is both an art and a fortunate accident. Your mother and I had it, we had roots that grew towards each other underground, and when all the pretty blossoms had fallen from our branches we found that we were one tree and not two."
.... St. Augustine

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network