Rare Novel Collection - Mrugajal - Ch - 49

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Love is as much of an object as an obsession, everybody wants it, everybody seeks it, but few ever achieve it, those who do will cherish it, be lost in it, and among all, never... never forget it.
... Curtis Judalet
Pleasure of love lasts but a moment, Pain of love lasts a lifetime.
... Anonymous

मधे बरेच दिवस निघून गेले. प्रियाचं विजयकडे येणं आता वारंवार होवू लागलं होतं. तिने जणू विजयच्या कुटूंबासाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. ही गोष्ट म्हणजे प्रियाच्या वडीलांसाठी आणखी एक काळजीचं एक मोठं कारण होतं. ते तिला समजावून समजावून थकले होते. कधी रागावून, जोर जबरदस्ती करुनही त्यांनी पाहिली पण प्रिया होती की ऐकायला तयार नव्हती. उलट जेवढे तिचे वडील कठोर होण्याचा प्रयत्न करीत ती तेवढीच हट्टाला पेटत असे आणि मग दोन - दोन तिन तिन दिवस विजयच्या घरीच राहत असे. तशी तिने पुन्हा प्रक्टीसही सुरु केली होती. पण त्यातून मिळणारी मिळकत पुर्णपणे विजयच्या घरासाठीच खर्च होवू लागली होती. प्रश्न पैशाचा नव्हता. प्रश्न होता तिच्या जिवनाचा.त्यांचं म्हणणं होतं की तिच्या जिवनात विजयच्या रुपाने एक वादळ आलं होतं आणि ते तिचं जिवन उध्वस्त करुन गेलं. पण अजुनही वेळ गेली नव्हती. तिचं जिवन जेवढं उध्वस्त व्हायचं तेवढं झालं होतं पण आता तिने स्वत:ला सावरायला हवं. पण ती होती की जणू तिने त्यांचं काहीच ऐकायचं नाही अशी शपथच घेतली असावी. शेवटी थकून हारुन आणि हतबल होवून तिच्या वडीलांनी ठरवून टाकले की आपण काही एक बोलायचे नाही. कारण आता तिला समजावून सांगायला काही लहान राहाली नव्हती. तिच्याजवळ स्वत:चं चांगलं वाईट समजण्याची सदविवेकबुद्धी नक्कीच होती. आणि आजकाल त्यांचा नशिबावरचा विश्वासही वाढत चालला होता. आपण कितीही प्रयत्न केला तरी तिच्या नशिबात जे होणार ते टळणार नाही या गोष्टीवर आता त्यांचा जणू दृढ विश्वास बसत चालला होता.

एक दिवस विजयचे वडील नेहमीप्रमाणे दारु पिवून अंगणात खाटेवर पहुडले होते. विजयची बहिण केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत, कुंपणाकडे पाहुन काहीतरी बोलत होती, जशी कुणा अदृष्य व्यक्तीशी बोलत असावी. विजय गेल्यापासून तिचीही परिस्थीती अगदीच दयनिय झाली होती. विजय होता तोपर्यंत विजय कसेतरी करुन तिला समजावून, लाडावून औषध देत असे. घरात एकच अशी व्यक्ती होती - विजय - की जिचं, जरी तो तिच्यापेक्षा लहान असला तरी, ती ऐकत असे. पण तो गेल्या पासून ती जास्तच हट्टी, दुराग्रही आणि सायकीयाट्रीक भाषेत सांगायचं झालं तर 'व्हायलंट' झाली होती. ती औषधंच काय तर जेवण खान पण व्यवस्थित घेत नसे. विजय गेल्यापासून विजयची आई जणू अंतर्मुख झाली होती आणि तिचं घरात कुणाकडे लक्षच नसे. त्यामुळे विजयच्या बहिणीला औषधं वैगेरे देण्याचं काम आता प्रियाने हातात घेतलं होतं. पण ती त्यात म्हणावी तशी यशस्वी झाली नव्हती.

विजयची आई कुण्या विचारात मग्न अशी मलीन चेहऱ्याने दळण निवडत होती, फाटकाचा आवाज येताच विजयच्या आईने वळून फाटकाकडे बघितले. नेहमीप्रमाणे तिच्या अपेक्षेप्रमाणे प्रिया आली होती. प्रिया येताच आईच्या हातातले दळण घेवून ती स्वत: निवडायला लागली.

'' किती करशील पोरी आमचं ... तो तर गेला... आता जे भोगायचं ते आम्हालाच भोगावं लागणार... तू का आपले हात भाजून घेतेस पोरी?'' विजयची आई न राहवून बोलली.

प्रियाने ताडले होते की तिच्या वडीलांनी इथे येवून काहीतरी तमाशा केला असावां. कारण आपली पोरगी ऐकत नाही हे पाहून त्यांनी आता नविनचं सुरु केलं होतं. विजयच्या इथे येवून त्याच्या आईला नाही नाही ते बोलणं. त्यांना वाटत होतं की असं केल्याने कदाचित त्याची आई प्रियाचं इथे येणं बंद करेल. प्रियाला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळे ती विजयची आई काहीही आणि कितीही बोलली तरी ते मनावर घेत नसे,

''आई.... तुम्हाला विजयने सांगीतले की नाही हे मला माहित नाही .... जेव्हा विजय एका महिण्यासाठी ड्यूटीवर गेला होता... तेव्हा दोन दिवसानंतर त्याच्या मागोमाग मी सुध्दा गेले होते...'' प्रिया दळण निवडता निवडता म्हणाली.

'' काय?'' विजयच्या आईच्या तोंडून आश्चर्याने निघाले.

हे कसं शक्य आहे?...

विजयची आई डोळे फाडून आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागली.

प्रिया पुढे म्हणाली, '' जेव्हा तिथे आम्ही एका पुरातन शंकराच्या देवळातही गेलो होतो..तेव्हा मी देवाला काय प्रार्थना केली होती माहित आहे?''

विजयची आई अजुनही तिच्याकडे आ वासुन आश्चर्याने पाहत होती.

प्रिया एक क्षण थांबुन पुढे म्हणाली, '' ... की देवा मला जन्मोजन्मी विजयच पती म्हणून लाभू दे...''

विजयची आठवण निघताच विजयच्या आईच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा पसरली.

मग पुढे उसासा टाकुन प्रिया म्हणाली, '' या जन्मात नाही मिळाला म्हणून काय झालं... माझा विश्वास आहे... पुढच्या जन्मात तो मला नक्कीच पती म्हणून मिळेल''

विजयच्या आईला तिच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा काहीच कळत नव्हते.

'' तिथे आम्ही खुप फिरलो... वॉटरफॉल , वृंदावन गार्डन, ... 15 दिवस आमचे कसे मजेत निघुन गेले म्हणून सांगु... की त्या 15 दिवसाला 15 जन्माची सर येणार नाही...''

विजयची आई अजुनही अविश्वासाने तिच्याकडे डोळे फाडून बघत होती. कारण ड्यूटीवरुन परत आल्यावर तिच्या मुलाने सुध्दा तिला नेमके हेच सांगीतले होते.

पण हे सगळं कसं शक्य आहे?....

जेव्हा विजय ड्यूटीवर गेला त्यानंतर दुस्ऱ्या तिसऱ्या दिवशीच तर प्रियाचा ऍक्सीडेंट होवून ती जवळ जवळ पंधरा दिवस कोमामधे गेली होती...

मग हे कसं शक्य आहे?...

ती विचार करीत होती.

'' त्यामुळे... तुम्ही त्रागा करुन घेवू नका ... किंवा वाईटही वाटून घेवू नका ... कारण मी जे काही करत आहे... ते माझं कर्तव्यच आहे...'' प्रिया म्हणाली.

प्रियाच्या बोलण्याने विजयची आई तिच्या विचारांच्या तंद्रीतुन बाहेर आली.

क्रमश:...

Love is as much of an object as an obsession, everybody wants it, everybody seeks it, but few ever achieve it, those who do will cherish it, be lost in it, and among all, never... never forget it.
... Curtis Judalet
Pleasure of love lasts but a moment, Pain of love lasts a lifetime.
... Anonymous

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

5 comments:

 1. kaay priyala pan mrigjala sarkhi glani yayala lagali ka?
  ki ti pan pagal jhali

  ReplyDelete
 2. Khupach sundar!!!Ashi kadmbari mi aajparyant kadhich vachleli navhati.Tumhi khup chan lihita.Prem hi bhavnach khup vegli aahe, aani te premat padlyashivay kadhich kalat nahi. Nahi tar "lafad" mhnunach samjal jaat.masach man khup vichitr asat. aapan tyala jitak samjun gheu titakach te aaplyach kodyat takat.
  Tumchy pudhlya vatchalisathi Khup-khup shubheccha!!
  Anuradh Ghone(Dombivli)

  ReplyDelete
 3. khup chan, touching story...... vijay priyala parat yetana disto teva ase watate serial sarkhe hiro la story madhe parat aanale... pan end kharach psycologicaly turn gheto....

  ReplyDelete
 4. I like u r two novel adtbut mugajal .it is interesting story I had to novel read u r good author .

  ReplyDelete
 5. Heart Touching love story...... samrpak shirshak... thanks for such a beautiful story.....

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network