Story Book - Novel - Mrugajal - Ch-47

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Tragedy delights by affording a shadow of the pleasure which exists in pain.
... Percy Bysshe Shelley
It is restful, tragedy, because one knows that there is no more lousy hope left. You know you're caught, caught at last like a rat with all the world on its back. And the only thing left to do is shout -- not moan, or complain, but yell out at the top of your voice whatever it was you had to say. What you've never said before. What perhaps you don't even know till now.
.... Jean Anouilh

एक दिवस जायला, एक दिवस थांबायला आणि एक दिवस यायला असं जरी धरलं तरी तिन दिवसात विजय घरी परत यायला पाहिजे होता. पण आज चार दिवस होवून पाचवा दिवस होता. ना त्याचा फोन ना काही खबर. विजयची आई वारंवार दरवाजात येवून दुरवर तो कुठे येतांना दिसतो का ते पाहत होती. विजयचे वडील सकाळीच सायकल घेवून दारुच्या गुत्यावर जायचे आणि तिकून तिकडेच परस्पर ऑफीसला जायचे असा रोजचा जणू त्यांचा नियम असायचा.

विजयचे वडील दरवाज्यातून बाहेर पडले तशी विजयची आई म्हणाली, '' अहो ऑफीसात विजयचा काही फोनबिन आला होता का?''

'' नाही '' विजयचे वडील न थांबता म्हणाले.

'' अहो... आज पाचवा दिवस... पोरगा अजून कसा घरी आला नाही.... काहीतर करा ...'' विजयची आई आता पार चिडली होती.

विजयचे वडील बाहेर जाता जाता दरवाजात थांबले आणि म्हणाले, '' येईल ... कुठं जाणार आहे... '' आणि लगबगीने आपली सायकल घेवून निघून गेले.

कारण त्यांना थांबायला वेळ नव्हता. रोजच्यापेक्षा आज थोडा उशीर झाला होता म्हणून दारु विना त्यांचे हातपाय आता कापायला लागले होते. त्यांच शरीर आता पुर्णपणे अल्कोहोलीक झालं होतं. शरीरच ते. त्याला तुम्ही जशी सवय लावणार तसं ते वागणार. त्याला आता पुर्णपणे दारुची सवय लागली होती. तिकडे घड्याळीची वेळ चुकेल पण ते शरीर आता रोचच्या ठरलेल्या वेळी बरोबर दारुची मागणी करत असे - बॉयलॉजीकल क्लाकच्या वेळेनुसार.

दुपार झाली तरी अजुन पोराचा पता नाही. म्हणून विजयची आई पुन्हा दरवाजात उभी राहून दुरवर कुठे आपला पोरगा दिसतो का ते बघू लागली. दुर दुरवर पोराचा पत्ता नव्हता. तिच्या जिवाची आता घुसमट होत होती.

काय करावे?..

कुणाला सांगावे ?...

कुणाला विचारावे?...

तिला काही कळत नव्हते. घरात तिच्या व्यतिरीक्त तिची मुलगी होती. पण तिचा काही उपयोग नव्हता. शेवटी तिने काहीतरी विचार केला आणि मनाशी एक ठरवुन घराला कुलुप घालून ती निघाली - राजेशच्या घराकडे.

संध्याकाळ झाली. ती अजुनही दारात उभी राहून पोराची वाट पाहत होती. दूपारी राजेशच्या घरी गेली होती तर राजेशच्या घराला कुलूप होते. कळले सगळेजण सहकुटुंब कुठे कोण्या कुलदेवतेच्या देवस्थानाला गेले होते. राजेशला मुलगा झाला होताना. म्हणून सगळेजण अगदी खुश होते.

तेवढ्यात विजयच्या आईला समोरुन लोकांचा एक घोळका तिच्याच घराकडे येतांना दिसला.

काय भानगड आहे?...

यांनी पुन्हा दारु पिऊन कुठे काही गोंधळ तर नाही घातला?...

जसजशी गर्दी जवळ येवू लागली तिला स्पष्ट दिसू लागले की गर्दीतले चार लोक स्ट्रेचरसारखं काही तरी धरुन येत होते. आणि हो ते तिच्याच घराकडे येत होते.

दारु पिऊन पडून यांना काही झालं तर नाही?...

का आपल्या पोराला विजयला तर काही झालं नाही?...

अचानक तिच्या डोक्यात विचार आला आणि आता तिला धडधडायला लागलं होत. एव्हाना लोक आवाराचं फाटक उघडून स्ट्रेचर घेवून आत आले. त्यांनी स्ट्रेचर अंगणात ठेवला. स्ट्रेचरवर पाढऱ्या कापडात गुंडाळलेलं कुणाचं तरी शरीर होतं. पण ते कापड बाजुला सारुन ते शरीर कुणाचं आहे हे बघण्याची तिची हिम्मत होईना.

शरीर जिवंत आहे की?...

विजेसारखा एक प्रश्न तिच्या डोक्यात येवून गेला. तिला काय करावे काही कळेना. भांबावलेल्या स्थितीत ती त्या लोकांना सामोरी गेली. ती गर्दीतल्या प्रत्येकाकडे कुणीतरी तिला काय झालं हे सांगेल या आशेने पाहत होती. पण तिची नजरानजर होताच प्रत्यके जण आपली नजर चुकविण्याचा प्रयत्न करीत होता. प्रकार काहीतरी गंभीर आहे याची तिला आता जाणीव होवू लागली होती. तेवढ्यात गर्दीतला एकजण तिच्या समोर आला. त्याने कापडाचे एक गाठोडे उघडून तिच्या समोर धरले.

'' हे सामान तुमच्या पोराचंच ना?'' त्या माणसाने विचारले.

विजयच्या आईने एकदा त्या सामानाकडे आणि नंतर त्या खाली ठेवलेल्या स्ट्रेचरकडे पाहत विचारले, ''काय झालं माझ्या पोराला? ''

तरीही कुणी काहीच बोलत नाही हे पाहून ती त्या स्ट्रेचरवर पांघरलेला पांढरा कपडा बाजुला करण्याचा प्रयत्न करु लागली तेव्हा त्या गर्दीतला एक जण बोलला, '' माफ करा... त्याचा ऍक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला आहे...ह्या त्याच्या सामानात सापडलेल्या पत्यावरुन आम्ही त्याला इथे घेवून आलो''

विजयच्या आईच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. ती स्ट्रेचरजवळ उभी होती तिथेच ती मटकन खाली बसली. तो धक्का तिच्यासाठी एवढा अनपेक्षीत आणि मोठा होता की जणू तिच्या सर्व इंद्रीयांनी काम करणे बंद केले होते. ना तिला काही एकू येत होते, ना काही दिसत होते ना ती काही बोलत होती ना रडत होती. थोड्या वेळाने त्या धक्यातून सावरल्यावर तिने पुन्हा प्रेतावरचा पांढरा कपडा बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. पण तो बाजुला झाला नाही कारण तो पुर्णपणे पक्का त्या प्रेताला बांधला होता.

मग ती तो कपडा जोरजोराने ओढून काढण्याचा प्रयत्न करु लागली तेव्हा कुणीतरी तिला अडवित म्हटले, '' त्याची बॉडी आणि चेहरा पुर्णपणे चेपलेला आहे... चेहरा पण ओळखू येत नाही ''

'' माझ्या पोरा ... देवा...'' विजयची आई हंबरडा फोडून रडायला लागली.

कदाचित बाहेरच्या आवाजामुळे विजयची बहिण शालीनी घराच्या बाहेर आली. ती येताच गर्दीतल्या बऱ्याच जणांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ते जणू वाट पाहत होते की आता ही या सगळ्या प्रसंगावर कशी रिऍक्ट करते. पण शालीनीने बाहेर आल्या आल्या आपल्या रडणाऱ्या आईवर निर्वीकारपणे एक नजर टाकली आणि मग ती त्या कपड्यात बांधलेल्या प्रेताजवळ गेली. प्रेताजवळ जावून खाली बसून ती त्या प्रेताला हळू हळू गोंजारत होती की त्या प्रेताला सोडण्याचा प्रयत्न करीत होती - सांगणे कठिण होते. कदाचित बिचारीला काय झाले हे सगळे कळत होते. पण ते सर्व व्यक्त करण्यास कदाचित तिच्या भावना तिला साथ देत नव्हत्या.

क्रमश:...

Tragedy delights by affording a shadow of the pleasure which exists in pain.
... Percy Bysshe Shelley
It is restful, tragedy, because one knows that there is no more lousy hope left. You know you're caught, caught at last like a rat with all the world on its back. And the only thing left to do is shout -- not moan, or complain, but yell out at the top of your voice whatever it was you had to say. What you've never said before. What perhaps you don't even know till now.
.... Jean Anouilh

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

8 comments:

 1. ohh.
  vijaychya aaichi aani bahinichi avstha baghun vait vatty.

  plz. pudhchi post lagech kara.

  ReplyDelete
 2. mala nahi watat vijay mela asel.....to mela tar novel la kahi arthach nahi.....tyachi bag gheun palun janara chor mela asel...

  ReplyDelete
 3. ase vachunch aganvar kata yeto pan pratyaksha jyachyavar he vel yete teva tya gharatil pratek manus apli sahanshakti harwun baslela asto tyaveli to kahich react nahi karu shakat.........pan please tumhe storycha end sad karu naka evde sagle vachun mala vijaychya aai baddal khup dukha hote aahe..........

  ReplyDelete
 4. khup sundar valan ghetale story ne khup kasa tari jhale hi post vachtana pan mang kharach vijay mela ka bichari tyachi Aai ani kharach kasa asata na konache nashib vijay kay hota tyachi hi kay dasha jhali kharach khup vait vatatay
  Next Post plz

  ReplyDelete
 5. ashi niyati daivane denyapeksha... janmach deu naye... kharach DEV hi sankalapana hya jagat aahe ka..??? asa prashna padto jevha ashi katha athva asha katheshi hubehub milnari vyaktirekha kharya aayushyat samor yete... DEV kharach harwla aahe... kharach...

  apratim likhan.. dolyatle ashru thambayche navach ghet navhte... kharach hruday drawak vishleshan kelay aapan...

  ReplyDelete
 6. I think, Vijay chya Aaicha Ha Ek Bhaas Asel...

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network