Marathi literature - Black Hole CH 53 जाकोब दिसला का?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Famous quotes -

Do just once what others say you can't do, and you will never pay attention to their limitations again.

James R. Cook


जेव्हा स्टेला हॉस्पीटलमधे जात होती तेव्हा तिला डॉ. स्टिव्हन दारातच बाहेर येतांना भेटले. एकमेकांच्या समोरासमोर येताच, '' जाकोब दिसला का?''

दोघांचाही एकच प्रश्न होता.

स्टेला थोडी काळजीत दिसू लागली.

'' मी त्याला अपघाताच्या जागी, सुझानच्या घरी, माझ्या घरी... सगळीकडे शोधले... पण तो कुठेच नाही आहे'' स्टेला म्हणाली.

'' मला तर आता काळजी वाटत आहे ... की एवढ्या प्रयत्नानंतर कसेतरी मी त्याला शोधले होते... आणि आता मी त्याला पुन्हा गमावते की काय?'' स्टेलाने आपली काळजी व्यक्त केली.

'' काळजी करु नकोस ... आपण त्याला शोधूया ...'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

मग अचानक काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे त्यांनी विचारले, '' तु त्याला त्या वाड्यात शोधले का?''

'' नाही.'' स्टेला म्हणाली.

'' मला खात्री आहे... तो तिथेच असावा'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

आता कुठे स्टेलाला थोडं हायसं वाटलं.

'' सुझान कशी आहे?'' स्टेलाने विचारले.

'' नाही मला कल्पना नाही... मी सुध्दा आत्ताच इथे आलो आहे.'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

सुझान हॉस्पिटलच्या एका रुममध्ये बेडवर झोपलेली होती आणि डॉक्टर तिची तपासणी करीत होते. सुझानचा पती डॅनियल आणि स्टेलाची अदृष्य आकृती तिथेच सुझानच्या बाजुला उभे राहून डॉक्टर काय सांगतात याची अस्वस्थतेने वाट पाहत होते. डॉक्टरांनी तपासणी संपवली आणि खोलीच्या बाहेर जायला लागले. स्टेलाची आकृती आणि डॅनियल डॉक्टरांच्या मागे मागे जायला लागले.

'' डॉक्टर ... कशी आहे ती?'' डॅनियलने डॉक्टरांच्या मागे चालता चालता विचारले.

'' सगळं व्यवस्थित आहे... तसं काळजी करण्यासारखं काही नाही आहे...'' डॉक्टर समोर चालता चालता म्हणाले.

स्टेलाची आकृती सुझानकडे परत गेली. डॉक्टर खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले. डॅनियलही त्यांच्या मागे मागे खोलीतून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर डॉक्टरांच्या चालण्याची गति कमी झाली.

'' खरं म्हणजे... मला तुम्हाला एक महत्वाचं बोलायचं होतं'' डॉक्टर म्हणाले.

अचानक डॅनियलच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली.

'' तसं काळजी करण्यासारखं काही नाही .... या इकडे माझ्यासोबत या'' डॉक्टरांनी त्याला आश्वस्त करीत म्हटले.

डॉक्टर आपल्या कॅबिनमध्ये शिरले आणि डॅनियलही त्यांच्या मागे मागे कॅबिनमध्ये गेला.

डॅनियल आणि डॉक्टर जेव्हा कॅबिनमध्ये गेले तेव्हा तिथेच सुझानच्या खोलीच्या बाहेर डॉ. स्टिव्हनची आकृती बसलेली होती.

स्टेला सुझानच्या खोलीतून बाहेर आली आणि तिथेच बाजुला खुर्चीवर बसलेल्या डॉ. स्टिव्हनच्या आकृतीजवळ गेली. डॉ. स्टिव्हनने उठून उभे राहत विचारले, '' कशी आहे ती?''

तेवढ्यात घाईघाईने डॅनियल डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडला आणि जवळ जवळ धावतच सुझानच्या खोलीत शिरला.

'' सगळं व्यवस्थित तर आहेना?'' डॉ. स्टिव्हनने डॅनियलला सुझानच्या खोलीत धावतांना जात असलेला पाहत काळजीने विचारले.

'' ती बरी आहे... धोका टळलेला आहे... त्याच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद ओसंडतो आहे'' स्टेला म्हणाली.

स्टेला आणि डॉ. स्टिव्हनही डॅनियलच्या मागे मागे सुझानच्या खोलीत शिरले.

डॅनियलने सुझानच्या खोलीत येताच सुझानकडे प्रेमाने ओथंबलेल्या नजरेने पाहत तिच्या केसांवरुन अलगद हात फिरवला. स्टेला आणि डॉ. स्टिवनच्या आकृत्या डॅनियलच्या बाजुला जावून उभ्या राहात सुझानकडे पाहू लागल्या.

'' ओ माय गॉड!'' तेवढ्यात अचानक, काळजीच्या सुरात डॉ. स्टिव्हनच्या तोंडून निघाले.

डॉ. स्टिव्हनच्या चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलत होते, कधी आश्चर्याचे, कधी भितीचे तर कधी काळजीचे भाव दिसू लागले.

'' काय झाल?'' स्टेलाने डॉ. स्टिव्हनच्या चेहऱ्याकडे पाहून काळजीच्या सुरात विचारले.

'' शेवटी तेच झालं... ज्याची मला शंका होती'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

'' असं कोड्यात बोलण्यापेक्षा... तुम्ही मला जरा सांगाल... की झालं तरी काय?'' स्टेलाने अधिर होवून विचारले.

'' बघ ... ती गर्भवती आहे ... आणि तुझा जाकोब तिच्या गर्भात अडकलेला आहे'' शेवटी डॉ. स्टिव्हनने स्टेलाच्या निर्देशनात आणून दिले.

स्टेला ताबडतोब सुझानच्या गर्भात लक्ष देवून पाहू लागली. खरोखरच तिला जाकोबची एकदम सुक्ष्म आकृती सुझानच्या गर्भात अडकलेली दिसू लागली. असं वाटत होती की ती सुक्ष्म आकृती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होती पण स्टेलाला काहीही ऐकू येत नव्हते. स्टेलाने त्याला गर्भातून काढण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! अचानक सुझानच्या गर्भातला मांसाचा गोळा आता जाकोबला ओढून आपल्यात सामावून घेत होता.

'' बघ... तो आता आत ओढल्या जात आहे'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

जाकोब आता एका नलीकेतून वेगाने प्रवास करु लागला होता.

'' बघ तो आता त्या नलीकेतून आत जात आहे'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

स्टेला आश्चर्याने आणि गोंधळून तो सगळा प्रकार असाहायतेने पाहात होती. शेवटी जाकोबची ती आकृती सुझानच्या गर्भाशयात वाढणाऱ्या त्या गर्भात पोहोचली आणि अचानक नाहीशी झाली.

'' आता त्याची सुटका नाही... तो पुर्णपणे तिथे अडकला आहे... ते ही एकप्रकारचे ब्लॅकहोल आहे... ती एक वेगळी दुनिया आहे... जेथील सर्व नियम वेगळे आहेत...'' डॉ. स्टिव्हन बोलत होते.

'' ब्लॅक होल... वेगळी दुनिया?'' स्टेलाच्या तोंडून आश्चर्याने निघाले.

'' हो ब्लॅक होल... एका वेगळ्या जगाचे प्रवेशद्वार...'' डॉ. स्टिव्हन म्हणाले.

स्टेलाच्या चेहऱ्यावर आता विरहाचे दु:ख दिसायला लागले. तिला पुरते समजले होते की तिचा जाकोब... तिचा गिब्सन तिच्यापासून दुर... खुप दूर गेलेला आहे...

तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.


क्रमश:...


Famous quotes -

Do just once what others say you can't do, and you will never pay attention to their limitations again.

James R. Cook


Marathi books, Marathi literature, Marathi suvichar, Marathi axioms, Marathi phrases, Famous books, comedy books, romantic novels, thriller novels, mystery books, entertaining books, Marathi varta

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

 1. Amezing story !!!!!!!!
  There has to be a movie on this.
  What happens next?
  Does it end here?

  ReplyDelete
 2. 'Kalpanashkti cha akhand zulzulta zara' ...........
  'Budhikawshalyache afaat pradarshan'.............
  'Chivitra Shevat'..........
  Amezing Yaar!!!!!!!!!!!!!!!!!!!

  From: Akshay Yeram

  ReplyDelete
 3. jabardast..!!!!! :)

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network