Marathi pustak vishva - Madhurani - CH-45 जाळी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi pustak vishva - Madhurani - CH-45 जाळीरात्रभर तो विचार करून करून तळमळत होता. जावं अन् तिचा गळा घोटून तिचा जीव घ्यावा असं गणेशला वाटत होतं. किंवा आपल्यावर जे गुदरलं ते सगळ्या गावाला घशाला कोरड येईपर्यंत ओरडून ओरडून सांगावं असं त्याला वाटत होतं.
पण आपण जर ओरडायला लागलो ...
तर आपल्यासोबत ओरडणारे इतरही कितीरी लोक असतील कदाचित...
पण पहिली गोष्ट आपल्यावर गुदरलेलं सत्य लोकांना सागण्याची छाती आहे का आपल्याजवळ...
पण सांगूनही काय होणार?...
आपलेच हसे होणार...
मग काय नुसते चूप राहाणे...
या शिवाय आपल्याजवळ काहीच पर्याय नव्हता का?...
का आपण तिला समजावून सांगावे?..
की बाई असं करीत जाऊ नकोस...
ती अशा प्रकारात निर्ढावलेली बाई आहे...
ती काय ऐकणार आपलं?...
तिही आपल्याला मुर्खात काढेल...
आपल्या नवऱ्याला मारलेल्या माणसासोबत जी हातमिळवणी करु शकते...
ती बाई काहीही करु शकते...
तिला आपण तेव्हाच ओळखायला हवं होतं...
गणेशला वाटत होतं आता बस. आता जास्त विचार आपण नको करायला. नाही तर पागल व्हायची वेळ यायची. त्याचं डोकं दुखत होतं आणि फट् फट् करायला लागलं होतं. पण ते विचार होते. ना येतांना विचारत होते. ना जातांना विचारत होते.
म्हणूनच त्यांना कदाचित विचार म्हणत असावेत..
दोन दिवस झाले. गणेशचं कशातच लक्ष लागत नव्हतं. दोन दिवसापासून त्याने स्वत:ला त्याच्या खोलीत अक्षरश: कोंडून घेतले होते. दोन दिवसापासून अंघोळ नाही की दाढी नाही. दोन दिवसाचे दाढीचे खुंट वर आले होते. त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला होता. आता त्याला कळत होतं की माणूस मजनु होतो म्हणजे नक्की काय होते. त्याने वही आणि पेन घेतला. त्याला आता शायरी लिहिण्याची प्रेरणा होवू लागली होती. त्याने दोन ओळी लिहिल्या...
... वा वा काय ओळी आहेत...
पण हे काय ह्या तर कोणत्यातरी सिनेमाच्या गाण्यासारख्या वाटताहेत....
हो बरोबर आहे हे कोणत्यातरी जुन्या सिनेमाचं गाणं....
हे जर गाण आधीे लिहिलं गेलं नसतं तर हे महान कार्य कदाचित आपल्या हातूनच झालं असतं.... .
त्याला वाटून गेलं. मग तो दुसऱ्या ओळी शोधू लागला. दोनतीन ओळी लिहून खोडल्या. त्या कोणत्याना कोणत्या सिनेमाच्या गाण्याशीच जूळत होत्या.

सोचा था जी लेंगे तेरे प्यार के सहारे
लेकीन अब हम प्यार मे हारे
तो जी लेंगे नफरत के ही सहारे
मरेंगे नही जी लेंगे.
छोडेंगे सब लेकिन
जिना नही छोडेंगे.

काहीतरी तो लिहित होता. कदाचित शब्द साथ देत नव्हते पण त्या शब्दात त्याच्या भावना उतरत होत्या. त्याला थोडं मोकळं वाटलं. मन हलकं हलकं वाटलं. आपण शायरी लिहू शकतो याचा आनंदही झाला. कदाचित माणूस असाच दुःखातही आनंद शोधत असावा.
दोन दिवस शनिवार रविवार होते म्हणून कुणी गणेशकडे तेवढं लक्ष दिलं नाही. कदाचित बऱ्याच जणांना वाटलं असेल की तो तालूक्याला आपल्या घरी गेला असेल. पण आज सोमवार, गणेश ऑफिसकडेसुध्दा फिरकला नाही. त्यामुळे त्याच्याकडे सरपंच आले.
" काय गणेशराव ... आज ऑफिसला आले नाय म्हणे...काय तब्येत गिब्येत ठिक हाय ना..."
" हो जरा ... अंगात कणकणल्यासारख होत आहे "
" काय ताप गीप आला का काय... " सरपंचांनी त्याच्या पाठीवर थाप मारीत आणि सोबतच अंगाचा ताप बघत म्हटलं.
" ताप तर दिसत नाय ... लई दिस झाले कुटुंबाला भेटून नाय आले... म्हणून होत आसल आसं" सरपंच गालातल्या गालात हसून म्हणाले.
" हो ... म्हणजे तसं काय नाही" गणेश म्हणाला.
ही घरी जाऊन यायची आयडीया पण सरपंचानी चांगली दिली...
तेवढाच हवापालट होईल...
असं किती दिवस एकटंच पडून राहणार आहोत आपण...
मग मास्तर, डॉक्टर, बरीच मंडळी येऊन गेले. पण मधुराणी काही आली नव्हती. एवढं सगळं होऊनही गणेशला वाटत होतं की मधुराणी यावी.
तिचे ती नटखट नजर...
मधुर हास्य...
आणि सगळे शीण घालविणारा तो मुलायम स्पर्श...
नाही आता हे सगळं बंद व्हायला पाहिजे...
गणेशने ठरवून टाकले की आता मधुराणीसोबतचे सगळे सबंध तोडून टाकायचे. आता या सगळ्यावर हा एकच मार्ग उरला.
तसे आपले तिच्या सोबत काय सबंध होते?...
आपल्या मनानेच कातीनीने विणल्यासारखी ती जाळी होती...
कातीन दुसऱ्याला अडकविण्यासाठी जाळी विनते इथे आपण स्वत:च त्या जाळीत अडकलो होतो एवढाच फरक...
नाही अजूनही वेळ गेलेली नाही...
आपण आपल्याला सावरायला पाहिजे...
गणेश निर्धाराने उठला. आणि तालूक्याच्या ठिकाणी आपल्या घरी जाण्यासाठी आपली बॅग भरु लागला.
पण हे काय? ...
त्याला कशातच उत्साह वाटत नव्हता.
घरी बायकोला भेटायला जायचे म्हणजे तरी आपल्याला उत्साह वाटायला पाहिजे...
कदाचित आपण या मधुराणी प्रकरणात जास्तच अडकल्यामुळे असं होत असेल...
पण आता तर आपण ठरविलं ...
ते मधुराणी प्रकरण संपलं...
हो कायमचं संपायला हवं...
क्रमश:....This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network