Marathi kadambari -Mrugjal - ch 3 स्वभाव

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi kadambari -Mrugjal 
- Based on a true story - 
- Sometimes reality is more dramatic than a fiction -

Ch 3 स्वभाव

विजयच्या त्याच्या मित्रांच्या गृपमधे गप्पा चालल्या होत्या खऱ्या पण त्याचं पुर्ण लक्ष त्या स्त्रीयांच्या गृपकडे होतं, जिथे प्रिया उभी होती. तिचीही तिच स्थिती होती. तिही मारायला गप्पा मारत होती पण तिचंही पुर्ण लक्ष विजयकडेच होतं. प्रियाच्या शेजारीच विजयची आई आणि बहिण उभ्या होत्या. विजयच्या आईने प्रियाचा हात आपल्या हातात घेतला आणि ती आत्मीयतेने तिच्यासोबत काहीतरी बोलत होती. विजयच्या लक्षात आले की हा मौका चांगला आहे. आईशी बोलण्याचं निमित्त करुन तो तिथे जावू शकतो आणि मग प्रियाशीही बोलू शकतो.

"" एक्स्कुज मी'' म्हणत विजय त्या गृपमधून निसटला.

"" यू आर एक्स्कुजड '' त्याचा एक मित्र गमतीने त्याची फिरकी घेत म्हणाला.

पण विजयने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो थेट त्याच्या आईजवळ गेला. तो त्याच्या आईजवळ गेला आणि कुण्या एका मैत्रीणीने प्रियाच्या हाताला धरुन ओढत तिला दुसरीकडे नेले. विजयचा निरस झाला होता.

"" काय?'' त्याच्या आईने त्याला विचारले.

आता तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या आईशी काहीतरी बोलणे आवश्यक होते.

"" आई तु सारखी उभी का आहेस तिकडे खुर्च्या ठेवल्या आहेत तिकडे जावून बस ... नाहीतर तुझे घुटणे दुखतील बघ ... नेहमीसारखे'' तो म्हणाला.

"" हो जाते.... थोड्या वेळाने'' त्याची आई त्याच्याकडे दुर्लक्ष करीत म्हणाली आणि पुन्हा इतर स्त्रियांशी गप्पा करीत बसली.

शालीनीचा स्वभाव लाजरा बुजरा आणि ती मुळातच मितभाषी त्यामुळे तिला कुणाशी काय बोलावे काही कळत नव्हते. आणि तिथे कुणीही तिच्या विशेष ओळखिचे वाटत नव्हते. तिने तिच्या आईकडे पाहाले. तिची आईमात्र कुणी ओळखीचं असो किंवा नसो तिचा आपला तोंडाचा पट्टा सुरु होता. शालीनीला आता 'बोअर' होवू लागलं होतं. ती आजुबाजुला काही बसण्यासाठी मिळतं का ते शोधू लागली. खुर्च्या होत्या पण त्या खुप दुर होत्या. तिला आईलाही सोडून जायचं नव्हतं. मग बाजुलाच एक खांब होता तिथे जावून ती त्या खांबाला रेटून उभी राहाली. ती आपल्यातच गुंग थोडावेळ त्या खांबाला रेटून उभी राहाली असेल. तेवढ्यात तिला शेजारच्या इमारतीच्या पायऱ्यावर उभ राहून कुणीतरी खुणावत आहे असं जाणवलं. तिने तिकडे वळून पाहालं तर एक तरुण तिथून हातवारे करीत तिलाच बोलावत होता.
हा ओळखीचा तर वाटत नाही...
मग का बोलावत असावा मला?...
तिने वळून आई जिथे बोलत उभी होती तिकडे पाहाले. पण आई तिथे नव्हती.
आता तर होती इथे?...
एवढ्यात कुठे गेली?...
तिने सभोवार एक नजर फिरवली तिला तिची आई कुठेच दिसत नव्हती. आणि भाऊही कुठे दिसत नव्हता. तिने पुन्हा एकदा सभोवार पाहून खात्री केली तेव्हा तिला भाऊ दिसला. पण तो खुप दुर उभा होता. पुन्हा तिने त्या पायऱ्यांवर उभ्या असलेल्या युवकाकडे पाहाले. तो अजुनही हातवारे करीत तिला बोलावत होता.
तो कशासाठी बोलावत होता काही कळत नव्हतं...
आणि आई किंवा भावाला सांगितल्याशिवाय त्याच्याकडे जावं हेही तिला योग्य वाटत नव्हतं...
तेवढ्यात तो युवकच तिच्या जवळ आला,

"" वर तुला तुझी आई बोलावते आहे'' तो युवक म्हणाला.

आताकुठे तिच्या जिवात जिव आला.
नाहीतर किती नाना प्रकारचे प्रश्न आणि शंका त्या युवकाबद्दल तिच्या मनात उठल्या होत्या.
आपला स्वभावच या गोष्टीस कारणीभूत आहे...
आपला भाऊ आपल्याला नेहमी सांगतो की जरा लोकांत मिसळायला, बोलायला शिक...
असं एकलकोंड्यासारखं राहून आपलीच मानसीक आणि सामाजीक प्रगती खुंटते...
त्याचं बरोबर आहे...
आपण जर मोकळं राहून लोकांत मिसळलं तर असे विचित्र विचार आपल्या डोक्यात येणारच नाहीत कदाचित...
कदाचित आईनेच मी एकटीच, कुणाशीही न बोलता इथे उभे आहे यासाठी मला वर बोलावलं असणार...
किंवा कुणाशी ओळख करुन देण्यास तिने बोलावलं असणार...
ती विचार करता करता त्या युवकाच्या मागे मागे चालायला लागली.



क्रमश:..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments: