Indian Novel - Madhurani CH-47 श्रेष्ठींशी भेट

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Indian Novel - Madhurani CH-47 श्रेष्ठींशी भेट

......... गणेशराव आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांनी आजूबाजूला बघितले. हॉल जवळजवळ रिकामा झाला होता. म्हणजे बरेच लोक श्रेष्ठींना भेटून घरी परतले होते. गणेशरावांचा मुलगा विण्याही कुठे दिसत नव्हता. गणेशरावांनी हॉलच्या बाहेर येऊन डोकावून बघितले. विन्या बाहेरही नव्हता.
गेला असेल कंटाळून बिचारा घरी ...
आजकालच्या पोरांना कसली जाण...
नोकरी मिळविण्यासाठी किती सोशीकता लागते...
उंबरठेच्या उंबरठे झिजवावे लागतात...
तेवढ्यात पुकारा झाला... गणेशराव गावंडे...
गणेशरावांचा चेहरा आनंदाने उजळला. आनंदाच्या भरात आपल्या सामानाची थैली घेण्यासाठी गणेशराव आपल्या खुर्चीकडे लगबगीने जायला लागले.
" गणेशराव गावंडे... कोण आहे?" पुन्हा पुकारा झाला.
" मी ... मी ... गणेशराव गावंडे... " गणेशराव आपली थैली घेऊन लगबगीने दरवाजाकडे जात म्हणाले.
" मग ओ द्या की हो ... इथं ओरडून ओरडून आमच्या घशाला कोरड यायची वेळ आली... " तो माणूस गणेशराववर खेकसला.
गणेशराव ओशाळल्यागत त्या माणसाकडे पाहून हसण्याचा अविर्भाव करण्याचा प्रयत्न करु लागले.
" इथं येणारे लोक म्हणजे एक एक नमुना असतो... आता यांना बघा ओ द्यायलासुध्दा फुरसत नाही ... यांना वाटते ... आपण ... आपल्याला सगळे लोक ओळखतात... स्वत:ला काय फिल्म स्टार समजतात की काय कोण जाणे..." तो माणूस श्रेष्ठींना भेटायला आलेल्या एका दुसऱ्या माणसाला म्हणाला.
वस्तुत: हे जे तो बोलला हे त्यालाही लागू होत होतं पण आपण त्यातले नाही अशा अविर्भावात तो म्हणाला " हो ना..."
गणेशरावांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि ते श्रेष्ठींना भेटण्यास दरवाजा उघडून आत गेले.
गणेशराव मऊ मऊ गालीच्यावरून चालत समोर गेले. समोर अजून एक मोठे भारदस्त दार होते. गणेशरावांना ते भव्यदिव्य दार पाहून उगीच वाटून गेले की...
आपण ते दार ढकलून आत जाण्याच्या लायकीचे आहोत की नाही.... भितभितच त्यांनी ते दार आत ठकलले. आत डोकावून बघितले. समोरच एका मुलायम सोफ्यावर पहुडलेली मधुराणी त्यांना दिसली. श्रेष्ठी म्हणजेच मधुराणी. गावातून एक दूकानदार मग ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून सरपंच नंतर पंचायत समितीची निवडणूक असं करता करता ती आमदार पदाला येऊन पोहोचली होती. तिच्या शेजारीच बाजूला पाटील पहुडले होते. तिच्या या गगनचूंबी झेपेत तिला पाटलाची नक्कीच मदत झालेली असणार. तीचे लक्ष इकडे दाराकडे नव्हते. ती पाटलांशी काहीतरी बोलत होती. गणेशरावांनी हळूच दार अजून आत ढकलले. जेमतेम आपण जाऊ शकू एवढी फट तयार केली आणि ते आत गेले. ते आत गेले तरी त्यांची दखल कुणी घेतली नाही. ते दोघेजण अजूनही काहीतरी चर्चा करण्यात मग्न होते. गणेशराव तिथेच समोर ठेवलेल्या एका खुर्चीजवळ जाऊन अवघडल्यासारखे उभे राहाले.
आपणहोऊन कसं बसणार...
उगीच कुणी अपमान केला तर...
जो झाला तो अपमान काय कमी होता का?...
आत चिठ्ठी पाठवूनही मधुराणीने आपल्याला बोलविण्यास येवढा वेळ लावला...
त्यांच्या बोलण्यावरून गणेशला एक गोष्ट जाणवली की मधुराणीने आपल्याला परिस्थितीनुसार बरेच बदलविले होते. त्याचं उदाहरण म्हणजे तिची भाषा. एखाद्या अस्सल शहरी माणसाला लाजविल अशी तिची भाषा शुध्द झाली होती. उलट गणेशरावांना मधे मधे जाणवत होते की त्यांनी इकडे तिकडे खेड्यावर काम केल्यामुळे त्यांच्या भाषेवर थोड्या प्रमाणात का होईना अशुध्दता येऊन परिणाम झाला होता. त्यांचा पेहराव पँट शर्टवरून सदरा आणि पायजामा असा खेडवळ तर झालाच होता.
माणसाने कसं प्रगतीच्या मार्गाने चाललं पाहिजे...
मधुराणीसारखं...
आपल्यासारखं.. अहोगतीच्या मार्गाने नाही...
तिच्या वागण्यात आणि हावभावांत तसा विशेष फरक जाणवत नव्हता. तसं तिचं वागणं तर आधीपासूनच भारदस्त एखाद्या राणीसारखं राहिलं होतं.
हळूहळू पाटलांच्या आणि मधुराणीच्या चर्चेचा सुर बदलून त्याचे रुपांतर वादात होवू लागले. मधुराणी आपली बाजू जोर देऊन मांडण्याचा प्रयत्न करीत होती तर पाटील ते खोडून काढण्याचा निकषाने प्रयत्न करीत होते. वाद वाढतच होता.
आपण चूकीच्या वेळी तर नाही ना आलो?...
आपण यांच बोलणं थांबण्याची वाट पहायला हवी होती...
चला बाहेर जाऊन थांबणंच योग्य...
गणेशराव बाहेर जाण्यासाठी वळणार तेवढ्यात अचानक बोलता बोलता मधुराणीचं गणेशरावकडे लक्षं गेलं.
" या गणेशराव बसा" मधुराणी म्हणाली.
तिला भेटून मधे इतके दिवस गेल्याचा तिच्या बोलण्यावर आणि हावभावांवर बिलकूल परिणाम दिसत नव्हता. गणेशरावांना मधुराणीच्या सानिध्यात घालविलेले ते तारुण्यातले दिवस जणू कालचेच वाटत होते.
तेच अवखळ हसू, तीच नटखट नजर फक्त वयाप्रमाने किंवा पदाप्रमाणे त्यात थोडा गंभीरपणा, मुरब्बीपणा आलेला जाणवत होता. तिच्या चेहऱ्यावरचे वाद चालू असतांनाचे नाराजीचे भाव एकदम खर्रकन विरले होते. तसं तिचं क्षणासरशी चेहरावरचे भाव एकदम बदलण्याचं कसब गणेशरावांना अनुभवून माहित होतं.
गणेशराव अवघडल्यासारखे मधुराणीच्या समोर ठेवलेल्या सोफ्यावर बसले.
" बऱ्याच दिवसांनी भेटलात... ' मधूराणीच्या बोलण्यात खोचकपणा जाणवत होता.
गणेशराव ओशाळल्यागत नुसते हसले.
' बोला काय काम काढलं..." मधुराणी म्हणाली.
पाटलांनी ओळखसुध्दा दाखविण्याची तसदी घेतली नाही . पाटील रागाने खाड्कन उठले आणि पाय आपटत तिथून निघून गेले. मधुराणीने आपल्या तिरप्या नजरेने पाटलांना जातांना बहुधा टिपले असावे.
" मधुराणी .... मॅडम " नुसतं मधुराणी म्हणणं योग्य नाही हे कळून गणेशरावांनी समोर 'मॅडम' जोडलं.
गणेशराव थांबले. मधुराणीनंही काहीच आपत्ती घेतली नाही.
" हं बोला.. बोला"
" मॅडम ते माझ्या बदलीचं जरा बघायचं होतं... "
" म्हणजे बदली करायची की रोखायची..."
" रोखायची..."
" बरं बरं... एका कागदावर तुमची पोस्ट, ऑफिसर, इलाका सगळं सविस्तर लिहून द्या.... आम्ही बघू काय करायचं ते..."
गणेशरावने चटकन आपल्या खिशातून एक कागद काढला आणि मधुराणीच्या समोर करीत म्हटलं ," मी आणलं आहे सगळं लिहून..."
" नको माझ्याजवळ नको ... बाहेर दरवाज्यावर आमचे सेक्रेटरी आहेत त्यांनाच द्या..."
" धन्यवाद मॅडम..."
" असं काय करता ... गणेशराव ... तुम्ही आम्हाला लाजवता..." मधुराणी म्हणाली.
" पण काम होईल ना मॅडम..."
" होईल होईल ... काही काळजी नको..." मधुराणी म्हणाली.
मधुराणीचा इशारा समजत गणेशराव तिथून जाण्यास निघाले.
क्रमश:...
This Novel in English

Next Chapter Previous Chapter

6 comments:

 1. What a twist!Faarch chan.Keep it up.Waiting for next post.

  ReplyDelete
 2. Excellent Twist. But one request, please confirm one time to post the page. Because we are waiting the new page regularly.

  ReplyDelete
 3. Good One !!!What Next ? waiting for next ch.

  ReplyDelete
 4. This was the best chapter in the whole story. What a climax. I liked it very much.

  ReplyDelete
 5. post chya surwatila khadkan jage vhave aasih surwat keli mi tar mhatarpan visarunach gele hote tyanche waw kay twist hota

  ReplyDelete
 6. kahani asa kay valan gheil vatalach navat....................Vinay

  ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network