kadambari vishva - Madhurani - CH-39

Next Chapter Previous Chapter

This Novel in Englishkadambari vishva - Madhurani - CH-39 प्रकरणावर पडदाजड पावलांनी गणेश आपल्या खोलीकडे चालू लागला. खोलीच्या समोर येताच त्याने एकदा मधुराणीच्या दुकानाकडे पाहिले. त्याने बघितले की मधुराणीही कदाचित आत्ताच भिक्याच्या घराकडून येऊन घराच्या दाराची कडी काढून आत गेली होती. तोही तिच्या मागे मागे जाऊ लागला.
चला आता मधुराणीच्या घरी कुणीही नाही ...
आता तिला माफी मागायला काय हरकत आहे...
एकदाचा या प्रकरणावर पडदा तर पाडणं आवश्यक आहे...
तो हळू हळू मधुराणीच्या घराकडे जाऊ लागला. त्याने चहुवार एक नजर फिरविली. आजूबाजूला कुणीही नव्हते. बहुतेक लोकांनी भिक्याच्या घरासमोर गर्दी केली होती.
गणेशने मधुराणीच्या दारासमोर उभं राहून कडी वाजवली.
" कोण?" आतून मंजुळ आवाज आला.
" मी..." गणेश म्हणाला.
" मी कोण? ... काही नाव बी हाय का नाय..." मधुराणी चिडून बोलत दारापर्यंत आली.
तसा तिने आपला आवाज ओळखला असावा....
मग हे काय..
अजून एक राग दाखविण्याचा प्रकार ... कदाचित..
" आवो तुमी गणेशराव ... मला वाटलं दुसरं कुणी हाय... या की ... लई दिसानं फिरकलास ... असे या की आत" मधुराणीचा अगदी गोंधळ उडाला होता.
किंवा ती तशी दाखवत असावी...
गणेश आत जावं की नाही या मनस्थितीत आत जाऊ लागला. मग मधेच तो थांबला.
" काय झालं? ... या की आत" मधुराणी म्हणाली.
" नाही एक काम होतं ... तुमच्याकडे.. म्हणजे तुझ्याकडं" गणेश तिथेच उभा राहून म्हणाला. तिला आदरवाचक अहोजाहो संबोधावं की ऐकेरीच संबोधावं.... गणेशला काही कळत नव्हतं.
" मंग बोला की ... " मधुराणी त्याच्या डोळ्यात डोळे टाकत म्हणाली.
" नाही म्हणजे त्या दिवशी ..."
मधुराणी अजूनही त्याच्या डोळ्यात पाहत होती.
" म्हणजे त्या दिवशी मी तुमचा हात धरला... त्याबद्दल मी तुमची माफी मागतो" गणेश सगळं काही पटकन बोलून मोकळा झाला.
मधुराणी अजूनही त्याच्याकडे बघत होती. एकदम लाजून तिने आपली मान खाली घातली.
" .. ही काय माफी मांगण्यासारखी गोष्ट हाय?...' मधूराणी रागाने बोलल्या सारखी बोलली. आणि नंतर एकदम लाजून नम्रपणे म्हणाली, '.. म्हंजे चालल की ..."
पहिल्या वाक्यात त्याला मधुराणीच्या आवाजात नाराजगी जाणवली आणि दुसऱ्या वाक्यात पुन्हा निमंत्रण. गणेश पुन्हा गोंधळला होता.
" या की आत ... चहा बिहा घ्या की" ती म्हणाली.
गणेशला काही सुचत नव्हते.
" नको आता नको ... येईन पुन्हा कधीतरी" गणेश म्हणाला आणि मागे वळून तरातरा चालत घराच्या बाहेर पडू लागला. त्याने दारात थांबून वळून मधुराणीकडे बघितले.
ती त्याच्याकडे पाहून हसली, लाजली आणि गर्रकन वळून आत धावत गेली.
गणेशचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले
आता काय समजायचं...
कदाचित मागच्या वेळी आपण तिचा हात पकडण्यात फारच दांडगेपणा केला असावा...
जरा हळुवारपणा दाखवायला हवा होता...
त्याचं ह्रदय धडधडायला लागलं होतं.
आपण आलो खरं प्रकरणावर पडदा टाकायला...
पण प्रकरण आता पुन्हा सुरु होणार असं दिसतं....
गणेशच्या चेहऱ्यावर एक हास्य विखुरलं. तो परत वळला आणि आनंदी ह्रदयाने आपल्या खोलीकडे चालू लागला.
गणेशचा आणि मधुराणीचा आता पुन्हा साद प्रतिसाद सुरु झाला होता. गणेश आवर्जून तिच्या दुकानावर जात असे. तिच्या दुकानावर जाण्याचा एकही मौका तो दौडत नसे. मग तिथे दुकानावर पुन्हा सामान घेण्याच्या पैसे देण्याच्या निमित्ताने ते एकमेकांच्या हाताला स्पर्श करीत असत. गणेशला एक जाणवत होतं की तिच्या हातात काय जादू होती कुणास ठावूक की तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याचा पूर्ण शीण क्षणात गायब होत असे आणि मग तो नव्या जोमाने कामाला लागत असे.
मधुराणीलाही असेच काही होत असेल का?...
हो नक्कीच होत असणार ...
नाहीतर ती सुध्दा आपल्याला स्पर्श करण्याचा एकही मौका कसा दौडत नाही...
आधीे तर आपण दांडग्या वाघासारखा तिच्यावर हल्ला चढवला होता...
आता आपल्याला फार हळुवार आणि सावधतेने पावले उचलावी लागतील...
एकदा मिठीत येईपर्यंत बायका अशाच नखरे करतात...
पण एकदा का मिठीत आल्या की मग पूर्णपणे समर्पण करतात...
त्याला कुठेतरी वाचलेले किंवा कुणीतरी सांगितलेले आठवत होते.

... to be continued..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. samrpan: mhanje bus mileparyant tichya pathi dhavayach milali ki kay aplich ahe...ha ha lolz...Vinay

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network