Marathi sahitya - Madhurani - CH-50 या गोष्टीचा आपण काही फायदा घेऊ शकतो का?...

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

रात्रीचे बारा एक वाजले असतील गणेशराव गच्चीवर नुसत्या येरझारा घालत होते. अचानक एक विचार त्यांच्या मनात डोकावला.
पाटलाच्या खुनात मधुराणीचा आणि मधूकररावचा हात आहे हे नक्की...
आणि ही गोष्ट फक्त आपल्यालाच माहित आहे...
म्हणजे मधुराणी आणि मधूकररावच्या व्यतिरिक्त...
या गोष्टीचा आपण काही फायदा घेऊ शकतो का?...
का नाही आपण या गोष्टीचा नक्कीच फायदा घेऊ शकतो...
ही गोष्ट आपल्याला माहित झाली म्हणूनच तर मधुराणीची आपल्याशी वागण्याची तऱ्हा अचानक बदलली...
मधुराणीने नाडी तपासण्याच्या निमित्ताने आपल्या हातात आपला हात दिला...
तेही आपण काहीही न करता...
म्हणजे आपण तिला ब्लॅकमेल केले तर...
तर ... ती आपल्यासाठी कदाचित काहीही करु शकेल...
काहीही म्हणजे अगदी काहीही ...
गणेशरावच्या चेहऱ्यावर एक हास्य तरळले. ते आता मोठ्या ऐटीत गच्चीवर चकरा मारायला लागले.
आणि तिने आपल्याला पुन्हा येण्याची ऑफरही दिली आहे...
म्हणजे आपण इतके दिवस तिच्या कामगार मधमाशीच्या कळपात होतो...
आता आपण तीची नर मधमाशी बनन्याचा प्रयत्न केला तर...
पण ... पण...
पण... त्यात धोका आहे...
आपला नाहक जीवही जाऊ शकतो...
मधुराणीच्या नवऱ्याचा आणि पाटलाचा गेलाच की...
तिच्या शरीराच्या बदल्यात त्यांना जीवानं मुकावं लागलं...
त्यांना तिची एक एक गोष्ट आठवू लागली.
तिची नटखट नजर...
तसंच ते गोड हास्य....
तिचा तो मुलायम स्पर्श...
कसा जीव ओवाळून टाकावासा वाटतो तिच्यावर....
एक नर माशी जेव्हा राणी मधमाशीशी समागम करते तेव्हा तिला माहित असतेच की यानंतर तिला प्राणाला मुकावे लागणार आहे...
कारण आधीही बऱ्याच नर मधमाश्या त्यांच्या प्राणाला मुकलेल्या असतात...
तरीही ती राणी मधमाशीशी समागम करण्यास तयार होतेच की...
फक्त तो एक आनंदाचा क्षण मिळविण्यासाठी...
त्या एका क्षणात कसा जीवनाचा आनंद समावलेला असतो...
पूर्ण जीवनाचा आनंद जर एका क्षणात मिळत असेल ...
तर.. मग पूर्ण जीवनाची तमा का बाळगायची?...
आणि आपल्या जीवनात तरी काय उरलं आहे आता?...
तो बिनकामाचा धोंड्यासारखा मठ्ठ अन् दांडगा पोरगा ...
आणि आपल्याला कधीही न समजू शकणारी अडाणी बायको...
त्यांच्यासाठी आपला जीव आणि आपले जीवन वाया घालविण्यापेक्षा...
मधुराणीवर आपण आपला जीव ओवाळून टाकला तर काय हरकत आहे...
झालं गणेशरावने आपल्या दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळल्या. जबडे कसून आवळले आणि ते निर्धाराने गच्चीच्या खाली उतरले.
contd...This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. ganeshrao tumchakadun hi apeksha navti

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network