Marathi Serial Novel - Madhurani - CH - 37 तिला राग तर नाही आला?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

sponsered link - Other literature

Marathi Serial Novel - Madhurani - CH - 37 तिला राग तर नाही आला?

त्या घटनेपासून मधे आठवडा निघून गेला. गणेश जेवढे शक्य होईल तेवढे मधुराणीला टाळू लागला. एखाद्या वेळेस नाईलाजाने दोघे समोरासमोर आले तर त्याची तिच्या नजरेला नजर देण्याची हिम्मतच होत नसे. एक दिवस अचानक तिची आणि त्याची नजरानजर झाली. त्याने बघितले ती रागाने गाल फुगलेल्या अविर्भावात त्याच्याकडे पाहत होती.

तिला राग तर नाही आला? ...

बर राग आला म्हणावं तर कशाचा राग आला?...

आपण तसे वागल्याचा की आपण आता तिला टाळतो याचा...

काही कळायला मार्गच नाही...

गणेशला अपराध्यासारखं वाटायला लागलं.

आपण उगीचंच तसं केलं...

पण तिही तर आपल्याला प्रोत्साहनच देत गेली...

बिचारी विधवा...

आपल्या भावना आवरतांना बिचारीचा गोंधळ होत असणार...

काहीही असो शेवटच्या क्षणी तर ती आपल्या भावना आवरण्यास समर्थ ठरली...

आपल्याला तिची माफी मागायला पाहिजे...

गणेश आपला धीर एकवटण्याचा प्रयत्न करु लागला.

पण माफी अशी सर्व माणसांत कशी मागायची?...

लोक काय अर्थ काढणार?...

आणि ती आडवी तिडवी काही बोलली तर ..

आपलीच नामुष्की व्हायची...

माफी मागाण्यासाठीसुध्दा एखाद्या एकांताच्या क्षणाची वाट पहावी लागणार ...

नाहीतर पुन्हा एकांतात आपण माफी मागायला जायचो तर पुन्हा तिचा गैरसमज होणार ...

चोर चोरी करतांना तर नाही पकडल्या गेला पण वस्तू परत नेवून ठेवतांना पकडल्या जावा अशी आपली स्थिती व्हायची...

काहीही असो एकदा माफी मागून आपण या प्रकरणावर पडदा टाकनं आवश्यक आहे...

आज सकाळी गणेशला उशीराच जाग आली. आणि तीही बाहेर काहीतरी गडबड चालली होती तो आवाज ऐकून. गणेशने उठता उठता खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. चांगले उण पडले होते. मग त्याने हातातल्या घड्याळीत पाहिले.

बापरे .. सकाळचे 10 वाजले...

आणि हा बाहेर कसला गोंधळ चालला...

कुणीतरी सकाळी सकाळी पीदाडून बडबडत असेल...

सदा तर नसावा...

पण त्याचीतर संध्याकाळची वेळ ठरलेली...

पण नाही हा काहीतरी वेगळाच आवाज दिसतो...

मुका अन् मुकीच्या प्रकरणाने तर नाही ना पुन्हा डोकं वर काढलं?...

त्याला वाटून गेलं. घाईघाईने कपडे चढवून तो बाहेर जाण्यासाठी तयार झाला. एक क्षण थांबून त्याने विचार केला की तोंड वैगेरे धूवून चूळ भरुन बाहेर पडावं. त्याला खिडकीतून काही लोक आवाज येत होता त्या दिशेने धावतांना दिसले.

पण नाही नको... तोंड नंतरच धूवूया...

प्रकरण काहीतरी गंभीर दिसते...

पटकन तो बाहेर पडला आणि दाराला कडी चढवून कुलूप न लावताच तोही तिकडे घाईघाईने जाऊ लागला.

contd..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network