Marathi literature - Madhurani CH- 54 भूतकाळ

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

संध्याकाळचे सात वाजले असतील. मधूराणी आपल्या गॅलरीत आरामखुर्चीवर आरामात बसली होती. तेवढ्यात तीचा एक कार्यकर्ता तिच्याजवळ येवून उभा राहाला.
'' काय आहे?'' तिने चाहूल लागताच, त्याच्याकडे न वळता विचारले.
'' राणीसाहेब... खाली एक माणूस आपल्याला भेटायचा आग्रह करतो आहे..'' तो कार्यकर्ता म्हणाला.
'' भेटण्याची वेळ संपलेली आहे .. आणि यावेळी मी कुणालाही भेटत नाही.. '' मधूराणी म्हणाली.
'' पण तो जात नाही आहे... वाद घालतो आहे... भांडण करतो आहे.. अगदी मारावरीवरसुद्धा आला होता तो.. माफ करा पण.... सारखा मला मधीला भेटायचं... मधीला भेटायचं असं ओरडतो आहे...'' तो कार्यकर्ता म्हणाला.
'' मधी...'' या शब्दाने मधूराणीच्या काळजात कालवाकालव केली.
या नावाने तिला एकच जण संबोधत असे. पण फार पुर्वी. तिने जेव्हा नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता तेव्हा.
तिचा भूतकाळ तिच्या डोळ्या समोरुन सरकू लागला.
मधूराणी आपल्याच विचारात मग्न झाल्याचं पाहून, मधूराणी आता कुणालाही भेटणार नाही याची खात्री समजून तो कार्यकर्ता तिथून जावू लागला. तो खाली उतरण्यासाठी जिन्याजवळ पोहोचला असेल. त्याला मागून मधूराणीचा आवाज आला, '' थांब... ''
तो कार्यकर्ता ब्रेक लागल्यागत थांबला.
'' त्याला वर पाठवून दे..'' मधूराणीने आदेश दिला.
'' जी'' त्या कार्यकर्याने होकार दिला आणि तो वेगात जिने उतरु लागला.
थोड्या वेळात मधूराणीला पुन्हा चाहूल झाली. ती तिकडे तोंड करुनच येणाऱ्या माणसाची वाट पाहत होती. येणारा अगदी तिच्याजवळ येवून उभा राहाल्याचे तिला जाणवले. तिच्या अंगात रोमांच उभे राहात होते.
'' मधी...'' तिला आता आवाज आला.
तोच आवाज ... तिच आर्तता...
तिने वळून पाहाले. तिच्या समोर तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम उभं होतं. शंकर त्याचं नाव. पण आता त्याच्यातही वयोमानाप्रमाणे खुप बदल झाला होता. तब्येतीनेही तो अशक्त वाटत होता. इतका वेळ उभा राहूनही कदाचित तो थकला होता आणि मटकन बाजुच्या खुर्चीवर बसला.
'' शंकर...'' मधूराणीच्या तोंडून निघाले.
आणि भूतकाळातील एक एक प्रसंग जसाच्या तसा तिच्या डोळ्यासमोरुन जावू लागला.

... त्यांच्या त्या पहिल्या आणि कोवळ्या प्रेमाच्या आठवणी ...
... तिने शंकरला आपण त्याच्यापासून प्रेग्नंट असलेले सांगितल्याचा प्रसंग...
... त्यानंतर तो गावातून गायब होवून महिने होवून गेले. आणि तरीही ती वेड्या आशेने त्याची वाट पाहत असल्याचे प्रसंग...
... बापाला ही बातमी कळल्यानंतर तिला त्याने झिपूट्या धरुन धरुन झोडल्याचा प्रसंग...
... बापाने कुठून तरी पैशाची व्यवस्था करुन तिला शहरात नेवून तिचं ऍबॉर्शन केल्याचा प्रसंग...
... ऍबॉर्शन करुनही समाजात अफवा पसरल्यामुळे... जागोजागी नातेवाईक टोमणा मारत असलेले प्रसंग...
... बापाने शर्थीने प्रयत्न करुन उजनी गावातल्या एका दुकानदाराशी तिचे लग्न जुळवून लग्न लावल्याचा प्रसंग...
... पहिल्या रात्री... अंधारात झालेली तिची सुहागरात्र... आणि सकाळच्या उजेडात तिने रात्र ज्याच्यासोबत घालवली तो तिचा नवरा नसून... गावचा पाटील होता हे माहित झालेला प्रसंग...
... नंतर वेळोवेळी रात्री पाटील येवून तिच्यासोबत रात्र घालवत असलेले अगणीत प्रसंग...
... तिचा नवरा तिला हात लावत नसे. कारण त्याला तशी परवानगी नसावी. आणि मग तिने तिच्या नवऱ्याला तिची पहली नर मधूमाशी बनविल्याचा प्रसंग...
... तिने तिच्या नवऱ्याला आपल्या यौवनाने भूरळ पाडून त्याला तिच्यावर जबरदस्ती करायला लावल्याचा प्रसंग... आणि त्याच वेळी पाटील तिथे आला तेव्हा तिचा नवरा समागमाच्या उत्त्यूच्च क्षणात असल्यामुळे त्याने पाटलाला जुमानले नव्हते. पाटील त्याच्यावर ओरडत होता पण तो एकण्याच्या मनस्थितीत नव्हता म्हणून पाटलाने खोलीतच ठेवलेल्या खलबत्त्याच्या बत्याने त्याच्यावर प्रहार करुन त्याचा जिव घेतल्याचा प्रसंग...
.. नंतर पाटलाने तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाला गावापासून दुर रस्त्यावर नेवून टाकून तो दारूच्या नशेत त्याच्या जिपसमोर आला अशी स्वत:होवून पोलिस स्टेशमधे केलेली कबूली... आणि पाटील त्या प्रकरणातून सहीसलामत सुटल्याचा प्रसंग...

सगळा मधूराणीचा एका हृदयाच्या कप्प्यात लपवून ठेवलेला भविष्यकाळ एखाद्या चलचित्राप्रमाणे तिच्या समोरुन सरकत होता.

क्रमश:...This Novel in English

Next Chapter Previous Chapter

3 comments:

  1. Tumhi tar dhakkach dila ya post madhe

    ReplyDelete
  2. bap re kiti bhayanak ghadlay tya bai barobar....tya nantar ti jagli tech phar modi ghost ahe......

    ReplyDelete
  3. bapre kiti bhayanak aahe madhuranicha bhutkal

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network