Marathi online publication - Madhurani - CH-55 त्या जुन्या भावना

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


शंकर काही क्षण खुर्चीवर बसला आणि एकदम उठून मधूराणीच्या पायाशी लोळण घेवू लागला, '' मलं माफ कर मधे... मले माफ कर... म्या माह्या कर्माचे फळं भोगले हायत आता... गावातून गेलो तव्हापासून वन वन भिकाऱ्यासारखं फिरतूया...आताबी बघ चार दिस झाले पोटात एक अन्नाचा कन नाय...''
मधूराणीला त्याने जे केले त्याबद्दल ना राग होता ना कोणत्या दुसऱ्या प्रकारच्या भावना होत्या. तेव्हापासूनच तर तिने भावनांना कधी थारा दिला नव्हता, नव्हे भावनेला थारा न द्यायचं ती शिकली होती. मधूराणीने त्याला खांद्याला धरुन उठून उभे केले. तिला जाणवले की त्याच्या खांद्यावर हात ठेवताच त्या जुन्या भावना तरंगांनी तिच्या मनावर पुन्हा ताबा केला होता. तिने आपसूकच त्याला आपल्या बाहुपाशात ओढून घेतले. कदाचित त्या जुन्या भावना ती पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करीत असावी की ज्या तिला नंतर कधीही अनुभवायला मिळाल्या नव्हत्या. पण तिच्या लक्षात आले की त्या भावना आहेत तर आनंददाई पण त्या तिला कमकुवत बनवित होत्या. पण ती आज जी मजल दर मजल करीत इथपर्यंत येवून पोहोचली होती. इथे त्या भावनांना थारा नव्हता. कमकुवतपणाला तर नव्हताच नव्हता. त्याला बाजुला करुन त्याच्या खांद्याला धरुन ती त्याला तिच्या शयनगृहात नेऊ लागली. तिने मनाचा पक्का निश्चय केला होता की त्या तिच्या मनाला कमकुवत बनविणाऱ्या भावनांचा आज कायमचा बिमोड करायचा.
अजुन उजाडायचंही होतं. सकाळच्या अंधारात मधूराणीच्या बंगल्याच्या आवारात एक पोलिस जिप आणि ऍम्बूलन्स येवून थांबली. पोलिस जिपमधून लगबगीने एक लेडी इन्सपेक्टर आणि तिचे खास जवळचे सहकारी उतरले आणि सरळ मधूराणीच्या बंगल्यात घुसले. सरळ ते दुसऱ्या मजल्यावर गेले. मधूराणी हॉलमधे त्यांची वाट पाहातच बसलेली होती. मधूराणीने उंची मखमली ओव्हरकोटसारखा गाऊन घातलेला होता. इन्सपेक्टर आणि तिचे सहकारी येताच मधूराणी उठून उभी राहाली आणि त्यांना तिच्या बेडरुमधे घेवून गेली. बेडरुममधील दृष्य पाहताच एवढे एकावरुन एक भयानक प्रसंगातून जावून निर्ढावलेले ते पोलिससुध्दा अवाक होवून त्या दृष्याकडे पाहत होते. बेडरुममधे बेडवर एखाद्या अबलेवर एखाद्या नरपशूने रात्रभर जबरदस्ती करुन तिचे जे हाल व्हावे तश्या अवस्थेत शंकर बेडवर उताना पडलेला होता.
इन्सपेक्टरच्या सहायकाने शंकरजवळ जावून त्याची नाडी बघितली तर तो जिवंत होता. त्याने त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तर तो वेदनेने विव्हळला.
'' यांना काय झाले?'' लेडी इन्स्पेक्टरच्या तोंडून निघाले.
'' काही नाही... आमच्या ते फार पुर्वीचे ओळखीचे गृहस्थ... काल तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही त्यांना इथे झोपण्यास सांगितले.... पण सकाळी बघते तर त्यांचे हे हाल झालेले...'' मधूराणी म्हणाली.
लेडी इन्सपेक्टर काय समजायच्या त्या समजल्या. आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला उचलून खाली नेवू लागल्या. त्याला पकडून जसे ते सगळेजण पायऱ्या उतरु लागले तसा मधूराणीने आवाज दिला, '' इन्सपेक्टर''
लेडी इन्सपेक्टरने मधूराणीकडे बघितले आणि त्या काय समजायच्या ते समजून वरच थांबत म्हणाल्या, '' तुम्ही पुढे व्हा ... मी आलेच''
ते सगळेजण खाली उतरताच मधूराणी लेडी इन्सपेक्टरला म्हणाल्या, '' बसकी....''
लेडी इन्सपेक्टर सोफ्यावर बसली आणि मधूराणी तिच्या समोरासमोर सोफ्यावरच बसली.
'' काय व्यवस्थित आहे ना?'' मधूराणीने तिच्या डोळ्यात पहात विचारले.
'' जी मॅडम'' लेडी इन्सपेक्टर म्हणाल्या.
'' तुझं प्रमोशन कधी यावर्शी ड्यू आहे?'' मधूराणीने सहजच विचारल्यासारखे विचारले.
'' नाही ... पुढच्या वर्षी'' ती लेडी इन्सपेक्टर म्हणाली.
'' अच्छा...'' मधूराणी म्हणाली.
'' बरं याला ... ताबडतोब सरकारी दवाखाण्यात भरती करा ... आणि माझं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घ्या...'' मधूराणीने आदेशवजा सुचना दिली.
'' जी मॅडम..'' लेडी इन्सपेक्टर म्हणाली.
'' काय आहे ... आजकाल... तुला माहित आहेच... मेडीयाचं कसं असते ते... बातमीपेक्षा... ती बातमी किती विकाऊ आहे याला महत्व दिल्या जातं ... मग ती बातमी खरी असो की खोटी'' मधूराणी म्हणाली.
'' हो मॅडम ... बरोबर आहे तुमचं'' ती लेडी इन्स्पेक्टर म्हणाली.
आत्तापर्यंत मधूराणीने त्या लेडी इन्सपेक्टरच्या डोळ्यावरुन आणि हावभावावरुन हेरले होते की ती कितपत तिला सहकार्य करण्यास इच्छुक आहे. आणि तिच्या पुर्ण सहकार्याची शाश्वती होताच ती सोफ्यावरुन उठून उभी राहाली. तिच्या समोर बसलेली इन्सपेक्टरही उठून उभी राहाली आणि जिन्याकडे जात म्हणाली, '' बराय मॅडम .. तुम्ही काही काळजी करु नका''
मधूराणीने तिला नुसता हात दाखवून तिचा निरोप घेतला आणि त्या लेडी इन्सपेक्टरच्या बुटाचा पायऱ्या उतरतांनाचा आवाज येवू लागला.


त्या दिवसानंतर जवळपास चार पाच दिवस झाले असतील. मधूराणी पार्टीच्या मिटींगमधे होती. तेवढ्यात मधूराणीचा एक सहाय्यक मधूराणीच्या कानाजवळ झूकून कुजबुजला,
'' मॅडम आपल्यासाठी.. सरकारी दवाखाण्यातून इन्सपेक्टर शिंदेंमॅडमचा फोन आहे...''
'' कशासाठी?...'' मधूराणी.
'' तो त्या दिवशी भरती केलेला गृहस्थ आत्ताच वारला.. असं त्या सांगत होत्या'' तो सहाय्यक पुन्हा कानाशी हळू आवाजात पुटपुटला.
'' तिला सांग .. मी एका महत्वाच्या मिटींगमधे आहे... आणि पुन्हा त्या बाबतीत मला कुणाचाही फोन आला नाही पाहिजे असं बजाऊन सांग तिला'' मधूराणीने आदेश दिला.
'' जी मॅडम'' तिचा सहाय्यक तिच्याजवळून निघून फोनकडे गेला.

क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. Ara rs mi hitta jitta hai ki rao
    Asa kasa marala mala

    ---------------Shankar

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network